State Commission for Women ;
आज राज्य महिला आयोगाचा पदभार स्विकारून दोन वर्षाचा यशस्वी व समाधानकारक प्रवास पुर्ण झाला. पदभार घेतल्यानंतर जाणवले की सर्वच प्रश्न महत्त्वाचे आहेत.
त्यात बालविवाह, विधवाप्रथा, कौंटुबिक हिंसाचार, कामाच्या ठिकाणी होणारा शारिरीक व मानसिक छळ व तो रोखण्यासाठी असलेल्या ICC कमिटी, काॅलेजवयीन तरुणींचे प्रश्न व ते सोडविण्यासाठी त्यांच्याशी पालक शिक्षक संघटनेच्या माध्यमातून संवाद, मोठ्या प्रमाणात मिसिंग केसेससाठी शाळकरी विद्यार्थींनींसाठीचे दामिनी पथक व बीट मार्शल कार्यरत करणे, तृतीयपंथीयांचे आरोग्याचे प्रश्न व ते सोडविण्यासाठी सतत पाठपुरावा करून सुरू केलेले महाराष्ट्रातील पहिले २५ खाटांची सुसज्ज व्यवस्था असलेले ससून हाॅस्पिटल, मुलींचा जन्मदर कमी होत असताना अनाधिकृत गर्भनिदानचाचणी रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणातील धाडीसत्र….असे अनेक प्रश्न मार्गी सोडविले पण ते सोडविताना शहरी भागाबरोबरच ग्रामीण भाग, आदिवासी वाड्या, पाडा, खेडा यांच्यापर्यंत जाऊन प्रभावी काम करण्यासाठी ३३ जिल्हयात सर्व यंत्रणेला सोबत घेऊन घेतलेल्या “जनसुनावणी” व त्यातून जवळपास २२,८४०केसेस निकालात काढल्या हे आयोगाचे यश.
कायद्याच्या चौकटीतून आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी तीन बलात्कारीत आरोपींच्या फाशीच्या शिक्षेसाठी पाठपुरावा केला, त्यात दोघांना दुहेरी जन्मठेप व तिसऱ्या आरोपीची न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे.
प्रश्न सोडवत राहू आणि सगळे एकत्र येऊन लढा देत राहिलो तर “माणसांच्या कळपातील हिंस्र श्वापदांचा नाशही करू” हाच आयोगाचा संकल्प.
दोन वर्षातील सर्वात समाधानकारक क्षण म्हणजे आखाती अनेक वर्षापासून होत असलेली महिला व मुलींची मानवी तस्करी रोखन्यासाठी उचलेली पावले… अँटी ह्युमन ट्राफिकींगचा जनजागृतीच्या माध्यमातून व राज्य महिला आयोगाच्या दोन वर्षाच्या पाठपुराव्यातून तब्बल २४ मुली व महिला मस्कत, ओमान व सौदी अरेबियामधून सुखरूप परत घेऊन आलो.
ज्या एजंटच्या माध्यमातून हि फसवणूक केली गेली त्यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रात प्रथमच अशी कारवाई होत आहे. यासाठी भारतीय दूतावास, केंद्रीय विभाग यांच्याशी सातत्याने पाठपुरावा करत होतोच पण अनेक सामाजिक संस्थेने आणि माझ्या आयोगाच्या सर्व टिमने चांगले प्रयत्न केले.
दोन वर्षाच्या आयोगाच्या या प्रवासात आपल्या सर्वांचे सहकार्य लाभले. सत्तेत नसतानाही राहिलेले आयोगाचे पद, हि कामाची पावती.
सामाजिक मानसिकता बदलण्यासाठी आता आपणच आपल्यापासून सुरूवात करू..चला नवरात्रीच्या नवदुर्गेचा सन्मान घरापासून करू.
इतिहास के पन्ने फिर ना दोहराएंगे,
इतिहास के पन्ने फिर ना दोहराएंगे,
शस्र उठाओ द्रोपदी
अब कृष्ण ना आएंगे..!!