कॉलेजांमध्ये राबविणार 'सुदृढ भारत' मोहीम.

विद्यापीठ अनुदान आयोगाचे निर्देश...

जनदूत टिम    06-Nov-2023
Total Views |
Maharashtra : Mumbai ; 
केंद्र सरकारच्या विविध योजना, मोहिमांना बळ देण्यासाठी संतत महाविद्यालये आणि विद्यापीठांवर उपक्रमांचा करणाऱ्या "विद्यापीठ मारा अनुदान आयोगाने (युजीसी) आणखी दोन उपक्रमांचा भार उच्च शिक्षण संस्थांवर टाकला आहे. यापैकी म्हणजे उद्योग विभागाची "एक जिल्हा, एक उत्पादन मोहीम", तर दुसरी आहे "सुदृढ भारत" मोहीम.

कॉलेजांमध्ये राबविणार सुदृढ भारत मोहीम  
उद्योग विभागाच्या "पीपल्स चॉइस" या कार्यक्रमांतर्गत "एक जिल्हा, एक उत्पादन" हा उपक्रम गेले काही दिवस राबविला जात आहे. आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी भौगोलिक मानांकन (जीआय) लाभलेल्या उत्पादनांना प्रोत्साहन मिळावे, असा विचार यामागे आहे. त्याचप्रमाणे देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये संतुलित प्रादेशिक विकासाला चालना मिळेल आणि स्थानिक कारागीर स्वयंपूर्ण बनतील, असा उद्देश आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातून एक उत्पादन निवडले जाते. त्याचे ब्रॅंडिंग करून उत्पादनाच्या विक्रीसाठी प्रोत्साहन दिले जाते. यामध्ये हातमाग आणि हस्तकला यासह विविध क्षेत्रांचा समावेश असतो.
 
१५ नोव्हेंबरपासून .... ■ केंद्राच्या या मोहिमेला बळ
  • देण्यासाठी महाविद्यालयांनी स्थानिक उत्पादनांवर आधारित ब्लॉग लेखन स्पर्धा आयोजित कराव्यात, अशा उत्पादनांवर व्हिडीओ तयार करून ते विद्यार्थ्यांना दाखवावे, स्थानक कारागिरांची ओळख विद्यार्थ्यांना करून द्यावी, अशी जबाबदारी महाविद्यालयांवर टाकण्यात आली आहे.
  • याशिवाय १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरदरम्यान "सुदृढ भारत" नावाची मोहीम राबविण्यास सांगण्यात आले आहे. या महिनाभरातील कोणतेही चार ते सहा दिवस निवडून आठवडा" कॉलेजांना राबवायचा आहे.
  • विद्यार्थ्यांनी सुदृढ राहावे, यासाठी व्यायाम, संतुलित आहार, योगासने आदी गोष्टींवर आधारित उपक्रम महाविद्यालयात राबवायचे आहेत... २०१९पासून ही मोहीम राबविली जात आहे. नेहमीप्रमाणे उपक्रम घेतल्यानंतर त्याची छायाचित्र, चित्रीकरण करून ते युजीसीच्या संकेतस्थळावर अपलोड करायचे आहेत.
 
उपक्रम कोणते ?
याआधी युजीसीच्या सूचनेवरून चंद्रयान प्रश्नमंजुषा, खासी महोत्सव, स्वच्छता अभियान, मेरी माटी, मेरा देश असे काही उपक्रम महाविद्यालयात राबविले गेले होते.