साडेसातशेहून अधिक ग्राम पंचायतीवर झेंडा फडकवत भाजप पहिल्या स्थानावर

महायुतीचे महाराष्ट्रात ४५ हून अधिक खासदार निवडून येतील - चंद्रशेखर बावनकुळे

जनदूत टिम    07-Nov-2023
Total Views |
कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळेच भाजपला घवघवीत यश- बावनकुळे
 
Maharashtra : Gram Panchayat Ellections ;
महाराष्ट्रातील ग्राम पंचायत निवडणुकीत महायुती सरकारला मिळालेले नेत्रदीपक यश हा या राज्यातील जनतेने या लोककल्याणकारी सरकारवर पुन्हा एकदा दाखविलेल्या विश्वासाचा मूर्तिमंत पुरावा आहे.

चंद्रशेखर बावनकुळे 
 
या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने दमदार कामगिरी करीत क्रमांक १ चे स्थान पटकाविले. या यशाचे संपूर्ण श्रेय भाजपाचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना आहे. त्यांच्या अथक परिश्रमामुळे भाजपा केवळ गावागावात नाही तर घराघरात पोहोचला आहे, ही बाब आजच्या निकालाने पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
 
देशाचे लाडके पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र जी मोदी यांच्या कल्याणकारी योजना, केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शाह यांचे खंबीर पाठबळ, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. जेपी नड्डाजी यांचे कुशल नेतृत्व आणि आमचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाची ही विजयी घोडदौड निरंतर सुरू आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत जनता महायुतीच्या पाठीशी राहील आणि ४५ हून अधिक खासदार निवडून येतील ही खात्री आहे.
 
आजचा विजय आनंदाचा आणि जल्लोषाचा असला तरी या निकालाने पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवरील जबाबदारी आणखी वाढली आहे. लोककल्याण आणि जनसेवेचे व्रत यापुढेही अखंडपणे सुरू राहील, असा विश्वास मला आहे.
 
पुन्हा एकदा भाजपाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधींचे मनापासून अभिनंदन.
सर्व नवनिर्वाचित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचे अभिनंदन.
राज्यातील मायबाप जनतेचे अंतःकरणातून आभार. 🙏🏻🙏🏻🙏🏻