New delhi: Mumbai ;
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात EPFO ने आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) खात्यांसाठी ८.१५ टक्के व्याज दर जाहीर केला आहे. याबाबत EPFO ने आज २४ जुलै रोजी परिपत्रक जारी केले आहे. देशभरात सुमारे ७ कोटी लोक ईपीएफओचे सदस्य आहेत. गेल्या वर्षी हा व्याजदर ८.१० टक्के होता. तो आता वाढवण्यात आला आहे.
EPFO ने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, “कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना, १९५२ च्या पॅरा ६०(१) अंतर्गत केंद्र सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाने, २०२२-२३ साठी ८.१५ टक्के व्याज दर प्रत्येक EPF सदस्याच्या खात्यात जमा करण्याची मंजुरी दिली आहे. त्यानुसार आपणास विनंती आहे की, सदर व्याज सदस्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी सर्व संबंधितांना आवश्यक सूचना द्याव्यात.”
पीएफ खात्यावरील जमा रक्कम तुम्ही चार पद्धतीने चेक करु शकता. उमंग ॲप, ईपीएफ मेंबर ई-सेवा पोर्टल, मिस्ड कॉल तसेच एसएमएस पाठवून पीएफ खात्यावरील रक्कम पाहता येते.