बिहारच्या सभापतींनी घेतली उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची सदिच्छा भेट.

जनदूत टिम    26-Jul-2023
Total Views |
मुंबई दि.२५:
बिहार विधानपरिषद सभापती श्री. देवेशचंद्र ठाकूर यांनी आज विधानभवनातील दालनामध्ये विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची सदिच्छा भेट घेतली. डॉ. गोऱ्हे यांनी शाल, पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

बिहारच्या सभापतींनी घेतली उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची सदिच्छा भेट 
 
यावेळी, विधानपरिषद विरोधीपक्ष नेते श्री. अंबादास दानवे, मंत्री उदय सामंत, मंत्री संजय बनसोडे, आमदार श्री. कपिल पाटील उपस्थित होते.
 
अनेक वर्षे मुंबईत वास्तव्य तसेच पुणे आणि नाशिकमध्ये शिक्षण झालेले ठाकूर मूळचे बिहारी असले तरी त्यांच्यावर मराठीचा पगडा आहे. ते अस्खलित मराठी बोलतात. बिहार विधान परिषद सभापतीपदाच्या निवडणुकीत जनता दलाचे (यू) देवेशचंद्र ठाकूर यांची बिनविरोध निवड झाली आहे.