Raigad : Mahad ;
बौद्ध समाजातील सुशिक्षित व्यक्ती सरपंचपदी बसू नये यासाठी मतदार यादीतून नाव वगळण्याचा अजब प्रकार महाड तहसील कार्यालयातील निवडणूक यंत्रणेमार्फत करण्यात आल्याचा आरोप सुषमा संदेश साळवी यांनी केला असून येत्या आठ दिवसात माझे मतदार यादीत नाव न आल्यास आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
महाड तालुक्यातील किंजळोली खुर्द या गावात ग्रामपंचायतीची निवडणूक असून सरपंच पद हे अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव असल्याने या गावात राहणाऱ्या सुषमा संदेश साळवी या सरपंच पदासाठी इच्छुक असून या सरपंच पदी विराजमान झाल्यास ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचार उघडकीस येईल या भीतीपोटी निवडणुकीपूर्वी त्यांचे मतदार यादीतून नाव घालण्याचा अजब प्रकार महाड तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेमार्फत करण्यात आला आहे.
किंजळोली खुर्द या गावातील मतदार यादीत नाव येण्यासाठी सुषमा संदेश साळवी यांनी डिसेंबर 2022 मध्ये सर्व कागदपत्रांची पूर्तता केली मात्र 10 ऑगस्ट 2023 रोजी हिंगोली खुर्द ग्रामपंचायतची पुरवणी मतदार यादी प्रसिद्ध झाली त्यामध्ये नाव समाविष्ट न करता सुषमा संदेश साळवी यांचे नाव नांदगाव बुद्रुक या गावात समाविष्ट करण्याचा प्रकार महाड तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेतील तथाकथित भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांनी केल्याचा आरोप सुषमा संदेश साळवी यांनी केला आहे.
किंजळोली खुर्द गावच्या रहिवासी सुषमा संदेश साळवी यांच्याबरोबर गावातील अन्य दोन व्यक्तींनी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज केला होता मात्र त्यांची नावे त्याच ग्रामपंचायतीच्या मतदार यादीत आली मात्र जाणीवपूर्वक सुषमा संदेश साळवे यांचे नाव वगळण्याचे काम याच ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक चंद्रकांत कदम हा मागील 22 वर्षापासून एकाच गावात ग्रामसेवक असून गावातील ग्रामपंचायतीमध्ये केलेला भ्रष्टाचार मी सरपंच पदी निवडून आल्यानंतर उघड होऊ नये यासाठी त्याने निवडणूक शाखेतील अधिकाऱ्यांना हाताशी धरून माझे नाव वगळण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला असून येत्या आठ दिवसात माझे नाव मतदार यादीत समाविष्ट न झाल्यास मी आत्मदहन करीन असा इशारा त्यांनी महाड शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निलेश महाडिक यांच्यासह महाड शहर अध्यक्ष राकेश शहा यांच्यासह बाळाराम साळवी ,अंकुश साळवी, सुशांत बांधवडकर, समीर कदम, राजेश जाधव इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.