Thane :
काही महिन्यांपासून ठाणे जिल्ह्यातील कुणबी समाजाचा बुलंद आवाज व तमाम बहुजन समाजाला एकमेव कर्ता आधार केंद्र असलेल्या भाजपा आमदार किसनराव कथोरे साहेब यांच्या विरोधात भाजपचे बडे नेते शडडू ठोकून चितपट करण्याचा डाव टाकतांना दिसत आहेत.
काल याचा जिता जागता दाखला शहापूर ब्रेकींग न्युज या सोशल मीडिया वर मिळाला.भाजपा ठाणे जिल्हा ग्रामीण या पक्षीय अधिकृत ग्रुप मधून नवीन नियुक्त ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष मधुकर मोहपे मामा यांनी सरळ सरळ माजी अध्यक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण भाजपा आमदार किसनराव कथोरे यांच्या कट्टर समर्थक पदाधिकारी मंडळींना अपमानास्पद निर्णय घेऊन रिमुव करीत बाहेर फेकून दिले.
शहापूर ब्रेकींग न्युज या वाटसप मेसेज वर ठाणे भाजप ग्रामीण ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष
रवींद्र चंदे यांनी या जाहीर अपमानाचा निषेध व्यक्त केल्याने ही आपबिती उघड झाली.यांच्या सोबत
टिडिसी बैंकेचे दोन दिग्गज भाजप नेते अरुण पाटील व राजेश पाटील यांना ही" गेट आऊट" करताना मधुकर मामांनी मोठे धाडस कोणाच्या जिवावर केले आहे. .ये दुनिया सब जानती हैं..!.
किसनरावांची अख्खी टीमच काढून टाकली ना राव ,नव्या जिल्हा अध्यक्ष मधुकर मोहपे मामांनी .
ही बघा आणखी काही आऊटडोअर रिमुव नावं..
सुधीर तेलवणे, मुरबाड, प्रकाश कडव औफीस, शिवाजी कथोरे, रामभाऊ, सावंत सर आता बोला.!झाला ना इज्जतीचा भाजीपाला..
ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष रवींद्र चंदे यांनी सोशल मीडिया वर आपल्या संतापाची भावना जगजाहीर केली .तर कल्याण ग्रामीण भागातील भाजपचे नेते अरुण पाटील यांनी देखील आम्ही किसन कथोरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षीय वाढीसाठी दिवस रात्र लोकांसाठी काम करत आहोत.पक्षीय निर्णयावर ठाम असतांनाच कोणतेही पक्ष विरोधात काम न करता असा झालेला अपमान सहन करणार नसल्याचे सांगितले. शहापूर, बदलापूर,कल्याण.व भिवंडी ग्रामीण भागातील किसनराव कथोरे साहेब कट्टर समर्थकांचा अक्षरशः आगडोंब उसळला आहे. बस झाली ही घुसमट.किती अपमान सहन करावा. कधीपासूनच ही आग लागली आहे .तिचा भडका ,हा बहुजनांच्या प्रत्येक घरा घरात वणव्या सारखा सर्व दूर पेट घेणार आहे . अशी तिखट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
ठाणे जिल्हा ग्रामीण भाजपा अध्यक्ष मधुकर मोहपे मामा यांनी दुसरा ने शिकारीसाठी दिलेली आपल्या खांद्यावरची बंदूक उतरवून ठेवून दिली पाहिजे.मधुकर मामांनी धुसमुसळेपणे बदलापूर स्थित शहापूरकर जावाई वाघाची राजकीय शिकार करायला बघाल तर हा "सावज "नाही "सावध " किसनवीर ढाण्या वाघाचा विखारी जबडा लांबूनच बघितलेला बरा..!हा सर्कशीतल्या वाघा सारखा नाही. अगदी जवळ जाऊन नेम धराल तर.. शिकार राहिल बाजूला मधुकर मोहपे मामा. या वाघाने त्याच्या " पंजा"वरील
"घडयाळाची "भविष्यात त्यानं व त्यांच्या कट्टर समर्थकांनी "मशाली "काटे गुरकावत.. गुरकावत वेडीवाकडी फिरवली तर .. समझने को इशारा काफी है ..! मधुकर मोहपे मामांना.
शहापूर न्युज ब्रेकिंग सोशल मीडिया वर भाजपचे जिल्हा नेते रविन्द्र चंदे यांनी जाहीर निषेध व्यक्त केल्याने " हमारी बिल्ली और.. हम से ही म्याउं.". असं घडवत आहेत भाजपचे बडे नेते मंडळी. म्हणजे आपल्याच घरातील लोकांच्या कडील काठीने साप मारून कार्यभाग साधून पाप आपल्या लोकांच्या माथी घेण्यासारखे आहे . असो.
भाजपा ठाणे जिल्हा ग्रामीण मधील बिघडलेला हा कलगीतुरा बहुजन समाजाला जाम जिव्हारी लागला आहे.ही राजकीय घुसमट,मान अपमान नाटक काल शहापूर
न्यूज ब्रेकींग वाटसप मेसेज मुळे उघड झाला..
साहेबांनो,
होऊ द्या आता एकदाचाच
"सौ सुनार की ,एक लोहार की .."
..धाडदिशी..होऊ द्या.!