New Delhi ;
आता काळाची गरज पाहून राष्ट्रीय मराठी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री आनंद भैय्या रेखी यांनी आता नवे संशोधन करून प्रत्येक राज्यातील भाजप कार्यकारिणीत मराठी माणसांचा समावेश करण्यासाठी नवा बिगुल फुंकला आहे.
राजधानी दिल्लीत ४.५० लाख मराठी भाषिक लोक राहत असून राजकीय गणितं बदलवू शकतात याकडे आनंद रेखी यांनी भाजप चे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे लक्ष वेधले. इतर राज्यातही मराठी भाषिक लोकांची संख्या जास्त असल्यामुळे सर्व राज्यांच्या कार्यकारिणीत मराठी लोकांना स्थान द्यावे अशी विनंती रेखी नी केली. असे झाल्यास त्याचा फायदा येत्या निवडणुकीत भाजप ला नक्कीच मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
मला पद मिळो किंवा न मिळो, पण मराठी माणसाला प्रत्येक राज्यात न्याय मिळालाच पाहिजे आणि तुम्ही योग्य तो न्याय द्याल, याची मला खात्री आहे, असे मत राष्ट्रीय मराठी मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष आनंद भैय्या रेखी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांच्यासमोर ही मागणी ठेवली असता त्यांनी लगेचच दिल्ली प्रदेश कार्यकारिणीत मराठी माणसाला स्थान देण्याचे मान्य केले