शिवराज्याभिषेक दरम्यान झालेल्या मृत्यूंची उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या मार्फत चौकशी...

शिवराज्याभिषेक दरम्यान झालेल्या मृत्यूंच्या घटनांची उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या एकसदस्यीय समितीमार्फत . पंधरा दिवसात येणारा चौकशी अहवाल 72 दिवसानंतर ही गुलदस्त्यात?

मिलिंद माने    28-Aug-2023
Total Views |
Raigad : Mahad ;
तिथीनुसार दि. 2 जून व तारखेनुसार दि.6 जून 2023 रोजी किल्ले रायगडावर आयोजित करण्यात आलेल्या 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान दि.2 जून 2023 रोजी ओमकार दिपक भिसे, वय 19 वर्षे रा. संकेश्वर ता. हुकेरी जि. बेळगाव यांचा व दि.4 जून, 2023 रोजी प्रशांत गुंड, वय 28 वर्षे रा. पुणे यांचा मृत्यू झाला..

शिवराज्याभिषेक दरम्यान झालेल्या मृत्यूंची  उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या मार्फत चौकशी  
या मृत्यूंच्या घटनांची तीव्रता पाहता या घटनांची समितीमार्फत सखोल चौकशी होणे आवश्यक आहे, यानुषंगाने जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,रायगड डॉ.योगेश म्हसे यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा - 2005 अन्वये त्यांना प्राप्त अधिकारानुसार या घटनांची चौकशी करण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी, महाड यांची एकसदस्यीय समिती गठीत केली . करून पंधरा दिवसात अहवाल देण्यात सांगितले मात्र आज या घटनेला 72 दिवस झाले तरी देखील अहवाल गुलदस्त्यात असल्याचे चर्चा ऐकण्यास मिळत आहे.
 
महाड येथील उपविभागीय दंडाधिकारी यांनी नमूद दोन्ही घटनांची सखोल चौकशी करुन अहवाल त्यांच्या अभिप्रायासह तातडीने पंधरा दिवसांत सादर करण्याचे निर्देश चार जून रोजी रायगड जिल्हाधिकारी योगेश म्हसे दिले आहेत.
महाड प्रांताधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी म्हणून तत्कालीन प्रांताधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड या होत्या त्यानंतर त्यांची बदली झाली व त्यांच्या बदलीने नव्याने नियुक्त झालेले प्रांताधिकारी ज्ञानोबा बानापुरे यांनी पदभार स्वीकारला मात्र रायगड जिल्हाधिकारी यांनी महाड प्रांताधिकारी यांना दिलेल्या निर्देशामध्ये प्रांताधिकारी यांनी
  • घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने सर्व स्तरावर सखोल चौकशी करणे.   
  • शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने घेतलेल्या महाड बैठकांमध्ये दिलेल्या सूचनांची सर्व संबंधित विभागांनी अंमलबजावणी केली अगर कसे? याबाबत चौकशी करणे.
  • सर्व संबंधितांचे म्हणणे दाखल करुन घेणे.
  • सदर घटना या कोणत्याही व्यक्ती अथवा यंत्रणांच्या चुकी अथवा हलगर्जीपणामुळे घडल्या की हा अपघात होता, याबाबत निरीक्षण नोंदविणे.
  • सदर घडलेल्या घटनेचा चौकशी अहवाल आपल्या स्पष्ट अभिप्रायासह सादर करणे, अशा सूचना देण्यात आल्या होत्या
  • रायगड किल्ल्यावर झालेल्या तिथीनुसार दोन जून व सहा जून 2023 च्या या सोहळयाच्या नियोजनामध्ये सहभागी असलेल्या कोणत्याही शासकीय विभागाच्या विभाग प्रमुखास चौकशी अधिकाऱ्यांनी साक्ष देण्यासाठी अथवा अहवाल सादर करण्यास बोलाविल्यास त्यांनी तात्काळ हजर राहणे अथवा अहवाल सादर करणे अनिवार्य असेल. असे करण्यास कुचराई केल्यास संबंधितांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा - 2005 मधील कलम 51, 55 व 56 अन्वये कारवाई करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही जिल्हाधिकारी डॉ.म्हसे यांनी सूचित केले होते
रायगड किल्ल्यावरील शिवराज्याभिषेक सोहळा होऊन व चौकशी अहवाल पंधरा दिवसात देणे कटिबद्ध असताना या सर्व कालावधींचा विचार केल्यास आज या घटनेला 72 दिवसांचा कालावधी झाला मात्र अध्यापि हा अहवाल रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाला अद्याप सुपूर्त केला नसल्याचे समजते.
 
रायगड जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्देशानुसार महाड प्रांताधिकारी यांनी याबाबत सखोल चौकशी करून संबंधित यंत्रणेमधील कोणता अधिकारी याबाबत दोषी ठरतो हे या अहवालाच्या कारवाईवरूनच सिद्ध होणार आहे या अहवालानुसार जर कारवाई झाली तर भविष्यात रायगड किल्ल्यावरील शिवराज्याभिषेक सोहळ्या दरम्यान कोणत्याही कामा त शासकीय अधिकाऱ्याची हलगर्जीपणा दिसणार नाही व भविष्यात शिवराज्याभिषेक सोहळा दरम्यान येणाऱ्या शिवभक्तांचे मृत्यू रोखण्यास मदत होईल.
 
याबाबत या प्रकरणाची चौकशी करणारे महाडचे उपविभागीय दंडाधिकारी ज्ञानोबा बानापुरे यांच्याशी संपर्क साधला असता अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अहवाल सादर झालेला नाही असे सांगण्यात आले