Thane : Bhiwandi ;
विविध पदार्थात भांग मिक्स करून त्याची विक्री करणाच्या व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली. सदर कारवाईत नवीन पनवेल सेक्टर १३ मधून २८ लाख, तर भिवंडी येथून १ कोटी ४५ लाखांचा एकूण १ कोटी ७३ लाख ९५ हजार ३८३ कोटीचा भांग जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई येथील राज्य भरारी पथकाने ही कारवाई केली असून या कारवाईत भांग वाहतूक करण्यासाठी वापरलेली चार वाहनेसुद्धा ताब्यात घेतली आहेत.
नवीन पनवेल सेक्टर १३ येथील नीलम जनरल स्टोर मधून भागमिश्रित पदार्थ विकत असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई येथील भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार भरारी पथकाने घटना स्थळी छापा मारला असता जनरल स्टोरमध्ये साठवून ठेवलेले २ हजार ३४० किलो ग्रॅम वजनाचा २८ लाख ८ हजार रुपये किमतीचा भांग मिश्रित पदार्थ आढळून आला. दुकानातील विशाल मन्नालाल चौरसिया (६१) बाला ताब्यात घेऊन त्याकडे अधिक चौकशी केली असता भिवंडी येथील एका कंपनीमधून हा माल येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
मिळालेल्या माहितीनुसार भरारी पथकाने भिवंडी तालुक्यातील मानकोली येथील श्रीराम कॉम्प्लेक्स गोदाम संकुलातील सेफ ट्रान्सपोर्ट कंपनी यांच्या गोदामावर छापा टाकला असता त्या ठिकाणी १ कोटी ४५ लाख ७७ हजार ३७६ रुपयांचा ७ हजार १३९ ग्रॅमचे भांगमिश्रित पदार्थ आढळले. येथील कंपनीचे मॅनेजर धर्मेद्र शुक्ला वाला ताब्यात घेऊन त्याकडे चौकशी केली असता त्याने नवीन पनवेल येथे पोर्टरद्वारे भांग पदार्थ असलेला माल पाठवल्याची कबुली दिली.
भरारी पथकाने केलेल्या कारवाईत मालाची वाहतूक करणारे ४ वाहने देखील जप्त केली आहेत, या प्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात करावाई करून गुन्हा दाखल केला आहे.
ब्रॅण्डेड कंपनीचे पाऊच बनवून विक्री अॅण्डेड कंपनीचे प्लास्टिक पाऊच करून ही भांग दुकानातून विकली जात होती, भिवंडी येथील कंपनीतून हा माल थेट नवीन पनवेलला पोहोचवला जात असे व त्यानंतर नवीन पनवेलमधील ग्राहकांपर्यंत पोहोचत होता.