आहारात घ्या हे फळं आणि किडनी स्टोनला लांब ठेवा.

जनदूत टिम    01-Sep-2023
Total Views |
Fruits to Avoid Kidney Stone :
तुम्हाला माहित आहे का तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास कधीही होऊ शकतो? पण काही फळे आहारात घेतल्याने ते टाळता येऊ शकते. हे कोणते फळ आहे जाणून घ्या.

आहारात घ्या हे फळं आणि किडनी स्टोनला लांब ठेवा  
 
बदलेल्या जीवनशैलीमुळे विविध रोग शरीरात मूळ धरतात. त्यापैकी एक किडनी स्टोन आहे. तुमच्या नकळत हा आजार किडनीमध्ये घर करू शकतो. पण काही फळे नियमित खाल्ल्याने आजार दूर राहू शकतो.
 
बेरी :
तुमच्या आहारात ब्लूबेरी आणि स्ट्रॉबेरीसारख्या फळांचा समावेश करा. या प्रकारच्या फळामध्ये ऑक्सलेटचे प्रमाण कमी आणि अँटी ऑक्सिडंटचे प्रमाण जास्त असते. तसेच किडनीचे आरोग्य चांगले राहते.
 
लिंबूवर्गीय फळे :
लिंबू, मोसंबी, संत्री इत्यादी लिंबूवर्गीय फळे तुम्ही नियमितपणे खाऊ शकता. या फळांमध्ये व्हिटॅमिन सी जास्त असते. ते किडनी स्टोन रोखतात.
 
डाळिंब : 
डाळिंबामध्ये भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडंट असतात. हे अँटी ऑक्सिडंट किडनी स्टोन तयार होण्यास प्रतिबंध करते. डाळिंब नियमित खाल्ल्याने या समस्येपासून लवकर सुटका मिळेल.
 
पाणी :
फळांच्या यादीत नसले तरी पाणी अत्यंत महत्त्वाचे आहे. हे किडनी स्टोनला सहज प्रतिबंध करते. त्याच वेळी ते पोल्युटंट्स धुवून टाकते.