Maharashtra : Beed ;
शासनाकडून माता व बालमृत्यू रोखण्यासाठी प्रत्येक वर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात; परंतु अद्यापही त्यांना हा आकडा कमी करण्यात यश आलेले नाही. शहरापेक्षा ग्रामीण भागात बालमृत्यूचे प्रमाण अधिक आहे, तर मातामृत्यू हे शहरी भागात अधिक आहेत.
या जिल्ह्यांत सर्वात जास्त बालमृत्यू :
नंदुरबार, अमरावती, बीड, नाशिक, अहमदनगर या पाच जिल्ह्यामध्ये, माता मृत्यूमध्येही हेच जिल्हे आघाडीवर
बालमृत्यूची कारणे :
- न्यूमोनिया (श्वसन दाह)
- अतिसार
- जन्मत: व्यंग असणे
- अचानक बाळ मृत होणे
- जंतुसंसर्ग कुपोषण
माता मृत्यूची नेमकी :
कारणे काय?
अतिरक्तस्राव, उच्च रक्तदाब, गरोदरपणात रक्त गोठण्याच्या पद्धतीत बदल होणे, गरोदरपणातील विविध गुंतागुंत, जंतुसंसर्ग, शस्त्रक्रियेची गुंतागुंत, आरोग्य संस्थेत वेळेत न येणे, वाहतुकीची सोय न जास्त काळ घरीच थांबणे, प्रसूतिपश्चातच्या गुतागुंत, कमी रक्त असणाऱ्यांकडून नियमित रक्तवाढीच्या गोळ्या न घेणे
अन्वेषण समिती करते तरी काय?
माता व बालमृत्यू • झाल्यानंतर याचे अन्वेषण करण्यासाठी जिल्हा, तालुकास्तरावर समिती आहे
या समित्यांकडून कारणे शोधली जातात; परंतु भविष्यात अशा घटना घडू नये, यासाठी काय उपाययोजना केल्या? याची माहिती समोर येत नाही.
तांत्रिक अडचण असल्याने आरसीएच पोर्टलवर सर्वच मृत्यूची नोंद झाली नाही; परंतु, दोन दिवसांपूर्वीच तालुका आरोग्य अधिकारी ते उपसंचालक यांची ऑनलाइन बैठक घेऊन सूचना केल्या आहेत, आगामी काळात हा आकडा कमी होईल.
पु. ना. गंडाळ, उपसंचालक माता आरोग्य, पुणे