Maharashtra : Pune ;
राज्यात २०२४ ते २०१९ या पंचवार्षिक बृहत आराखड्यास बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाच्या (माहेड) बैठकीत मान्यता देण्यात आली. या आराखड्यानुसार यावर्षी राज्यात १ हजार ४९९ नवीन कॉलेज सुरू केली जाणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्यादी अधितीगृह येथे राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाची बैठक पार पडली. या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विजय वडेट्टीवार, उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री मंत्री हसन मुश्रीफ, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, उच्च शिक्षण प्रधान उपस्थित होते.
सह्यादी अतिथिगृह येथे पार पडलेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेड्डीवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री मंत्री हसन मुश्रीफ, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास रस्तोगी, वैद्यकीय शिक्षण सचिव अचिनी जोशी, शालेय शिक्षण प्रधान सचिव रणजितसिंह देओल उपस्थित होते.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुविधाचे अधिनियमात राज्यात उच्च शिक्षणाच्या सर्वसमावेशक आणि समन्यायी वाटप करण्यासाठी कॉलेज आणि परिसंस्थांची स्थाने निश्चित करण्याची कार्यपद्धती ठरवून देण्यात आली आहे. विद्यापीठाने दर पाच वर्षांनी या योजनेस महाराष्ट्र माहेडने मान्यता घेण्यात येते. त्यानुसार सम्यक योजनेशी अनुरूप २०२४-२५च्या वार्षिक योजना प्रस्ताव आणि सन २०२४ ते २९ या पंचवार्षिक योजनेच्या बृहत् आराखडयावर या बैठकीत वर्षा करण्यात आली.
वर्ष २०२४ २०२९ वा पंचवार्षिक स्थळ आराखड्यामध्ये १ हजार ५३० नवीन प्रस्तावित ठिका होती, त्यापैकी १ हजार ४९९ ठिकाण पात्र ठरली असून, त्यांना मान्यता देण्यात आली. तर २०१९ २०२४ या पंचवार्षिक बृहत आराध्ये हजार ५९ स्थळबिंदूंचा समावेश होता. विद्यापीठांकडून ३ हजार १९३ नवीन प्रस्ताव आयोगाकडे सादर करण्यात आते होते, त्यापैकी २ हजार ८१९ स्थळबिंदूंना माहेडने मान्यता दिली होती. गेल्या पाच वर्षात ५९३ नवीन महाविद्यालयांना अंतिम मान्यता देण्यात आल्या आहेत.
'नॅक' नसणाऱ्या कॉलेजवर कारवाई देशात महाराष्ट्रात सर्वाधिक विद्यापीठे आणि कॉलेजना बैंक मानांकन मिळाले. आहे. मात्र कायम विनाअनुदानित कलिंजनी देखील नैक मानांकन मिळविण्यासाठी राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेकडे नोंदणीची कार्यवाही करण्याविषयी चर्चा करण्यात आली. जी कलिक मानांकनाची कार्यवाही करणार नाहीत त्या महाविद्यालयांविरुद्ध अधिनियमातील तरतुदीनुसार कारवाई करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.