वाढती महागाई व बेरोजगारीने कळस गाठल्याने गोर गरीब, मजूरा सह शेतकरी व मध्यमवर्गीय जनता हल्ली बेजार आहे. नेहमिच्या पावसाच्या असंतूलनामूळ शेतकऱ्यांच्या ऊत्पादनात दिवसेंदिवस घट होत आहे.
सरकारी शाळांत सक्तीच्या शिक्षणाचा अभाव आहे. शिकून नौकऱ्यां नाहीत. बेरोजगारीमुळं हाताला काम नाही. एकंदर अशी भयावह परीस्थिती ऊदभवली असतांना सोशल मिडीयावर जंगली रम्मीपे आवोना महाराज असा एक मोकाट ट्रेन्ड चालू आहे. हा ट्रेन्ड आता हळू हळू सुशिक्षित तरुणांच्या भवीतव्यावर टांगती तलवार होऊन बसला आहे. त्याला सर्व शिकलेले तरुण मोठ्या प्रमाणात बळी पडताहेत यावर सरकार मौन आहे प्रशासनानीने त्वरीत बंदी घालून जगली रम्मी खेळ त्वरीत बंद करावा असी मागनी केली आहे.
खाजगीकरणामुळं शेकडो कंपन्यांना कुलपं लागली आहेत. कामा निमित्तानं शहरात गेलेला ग्रामिण भागातला सुशिक्षित तरुण आज खेड्यात येऊन बेरोजगार झाला आहे. असे असतांना सोशल मिडीयावर अन्नू कपूर, अजय देवगण व कपिल शर्मा या सारख्या अनेक सीलेब्रिटीनं ऑनलाईन रम्मी व लूडो खेळन्यासाठी लोकांना प्रवृत केलं आहे. या खेळाचा प्रचार करतांना त्याशी किती करोड लोक जूळले हे देखील सांगताहेत. सदर खेळ सांभाळून खेळा त्याची लत लागण्याची जोखीम आहे अशी वार्निंग देत असतांना ते स्पीड जास्त करुन सांगतात म्हणजे लोकांनी ते ऐकलं नाही पाहिजे असच. सगळं हे मोकाट चालू असतांना सरकार जाहिरात करनाऱ्यांवर कार्यवाही करनं अपेक्षित असतांना ते मौन असल्यामुळं हा सरकार प्रायोजीत कार्यक्रम आहे असच वाटतं.
ईकडे राष्ट्रिय बँका पिक कर्जाशिवाय गरजूंना कुठलं कर्ज द्यायला तयार नाहीत अन् सोशल मिडीयावर एका मिनिटात थेट कर्ज असाही प्रचार चालू आहे. मेन स्ट्रीम मिडीया मात्र विकासा वाबद सरकारला जाव विचारन्या ऐवजी विरोधी पक्षाला जबाबदार ठरवतं अस सध्याचं चित्र आहे. नोटबंदीमुळं प्रत्यक्षात सर्वच तरुणांच्या हातावरच काम पळालं असलं तरी, जंगली रम्मी आणि लूडोच्या माध्यमातून इतरत्र सोडा परंतू तालूक्यातल्या असंख्य तरुणांच्या हाताला मात्र काम मिळालं आहे. याचा वाईट परीणाम गोर गरीबांच्याच मुलावर जास्तीचा होत असून अशा वाम प्रचारावर सरकारनं प्रतीबंध घालावा अशी थेट जनतेत चर्चा आहे