Thane : Murbad ;
मुरबाड तालुक्याचे भुमिपुत्र,तथा अदिलासी क्रांतीसेनेेचे संस्थापक,ते ठाणेशहरातील यशस्वी उद्धोजक अनिल भांगले यांनी अचानक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने जिल्हयाच्या राजकारणात खळबळ माजली आहे,
ठाणे शहरात भुकेेलेल्याला भाकरीच्या शो़धात जाण्या ऐवजी भाकरच त्यांच्या ताटात आणायची व्यावस्था करणारे, रस्त्यावर राहणाऱ्या भुकेल्या जीवांच्याही पोटात दोन घास पडावेत, या उद्देशाने ज्ञानदेव बहुउद्देशीय संस्थेचे माध्यमातुन अनिल भांगळे यांनी "वाय बाईट्स" हे अॅप सुरू केले आहे. या अॅपच्या माध्यमातून अन्नचळवळ सुरू करण्यात आली आहे या अॅपचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यांत आले.
अनिल भंगाळ हे गेल्या अनेक वर्षांपासून अदिवासी क्रांतीसेनेच्या माध्यमातुन अदिवासी विकासासाठी त्यांच्या मुलभूत हक्कासाठी वेळ पडल्यांस रस्त्यावरील अंदोलन करीत न्यासासाठीचा लढा देतात मग अदिवासींचा रोजगार,आरोग्य ,शिक्षण ते त्यांना मुळभूत सुविधासाठी कार्यरत असता जिल्हाभर त्यांची क्रांतीसेनेचे हजारो कार्यकर्ते कार्यरत असून जिल्ह्यात त्यांनी चळवळ उभी केली आहे,राजकिय वलय असलेल्या अनिल भांगले यांनी अनेक स्वराजसंस्थावर निवडणूक लढवून विजयश्री खेचून आणली असता, ठाणेेचे एक यशस्वी अद्धोजक व लाखोअदिवासीची सोबत असलेले भांगले यांनी अचानक मातोश्री वर जाऊन शिवसेना प्रमुख श्री उद्घव ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकिय गोटत खळबळ माजली आहे,
या बाबत अनिल भांगले यांना संपर्क केला असता या बाबत हि सदिच्छा भेट असल्याचे सांगुन बोलण्याचे टाळले !मात्र या भेटीने २०२४ च्या विधानसभा निवडणूकीच्या पाश्वभुमिवरून राजकिय गोटात खळबळ माजली हे तीतकंत सत्य आहे,