सोनुभाऊ बसवंत महाविद्यालयात ‘भारतीय ज्ञान परंपरा’ या विषयावर ऑनलाईन शॉर्ट टर्म कोर्स यशस्वीरीत्या संपन्न

भारतीय ज्ञान परंपरेची व्यापकता आणि सद्यस्थितीतील उपयोजन याबाबत मार्गदर्शन

जनदूत टिम    29-Nov-2024
Total Views |
सोनुभाऊ बसवंत महाविद्यालयात ‘भारतीय ज्ञान परंपरा’ या विषयावर ऑनलाईन शॉर्ट टर्म कोर्स यशस्वीरीत्या संपन्न

college
युजीसी, मालविय मिशन टीचर ट्रेनिंग सेंटर (UGC-MMTTC), मुंबई विद्यापीठ, युजीसी, मानव संसाधन विकास केंद्र(UGC-HRDC) मुंबई विद्यापीठ व ज्ञानवर्धिनी संस्थेचे सोनुभाऊ बसवंत कला व वाणिज्य महाविद्यालय, शहापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. ११ नोव्हेंबर, २०२४ ते सोमवार, दि.१८ नोव्हेबर, २०२४ या कालावधीत ‘भारतीय ज्ञान परंपरा’ (Indian Knowledge System) या विषयावर ऑनलाईन शॉर्ट टर्म कोर्सचे आयोजन करण्यात आले. भारतीय ज्ञान परंपरेची व्यापकता आणि सद्यस्थितीतील उपयोजन याबाबत मार्गदर्शन करणे या हेतूने या कोर्सचे आयोजन करण्यात आले. सदर कोर्सच्या उद्घाटन सत्राच्या अध्यक्षीय भाषणात मुंबई विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रो. रवींद्र कुलकर्णी यांनी भारतीय ज्ञान परंपरेची विविध विषयांतील भूमिका याबाबत मार्गदर्शन केले. मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेच्या माननीय प्र.अधिष्ठाता प्रो. कविता लगाटे या प्रमुख अतिथी तर, ज्ञानवर्धिनी संस्थेच्या कार्यकारी समितीचे माजी अध्यक्ष माननीय श्री. सतीश गुजराथी हे विशेष अतिथी म्हणून लाभले. तसेच मुंबई विद्यापीठाच्या युजीसी, मालविय मिशन टीचर ट्रेनिंग सेंटर (UGC-MMTTC) च्या प्र.संचालिका प्रो.विद्या वेंकटसन यांची विशेष उपस्थिती लाभली. या कोर्समध्ये उच्च शिक्षण संस्थांमधील ६८ प्राध्यापक सहभागी झाले होते. या कोर्समध्ये प्रो. विद्या वेंकटसन, प्रो. नमिता निंबाळकर, डॉ. रविकांत सांगुर्डे, प्रो. नचिकेता तिवारी, प्रो. ज्योती वोरा, डॉ. मौशमी दत्ता, प्रो. इंदुमती काटदरे, प्राचार्य डॉ. उमा शंकर, प्रो. दिपेश कटारी, प्रो. उपेंद्र त्रिपाठी, डॉ. मुरलीधर चांदेकर, प्रो. आदित्य माहेश्वरी, प्रो.आशिष पांडेय, प्रो. राघव कृष्णा, प्रो. गौरव गाडगीळ, डॉ. प्रसाद भिडे, डॉ.गौरी माहुलीकर आणि SNDT महिला विद्यापीठाच्या माननीय कुलगुरू प्रो. उज्वला चक्रदेव या भारताच्या विविध भागातील नामवंत शैक्षणिक संस्थांमधील तज्ञांनी भारतीय ज्ञान परंपरा आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, गणिताच्या मर्यादा आणि न्यायदर्शनातील तर्कशास्त्र, भारतीय ज्ञान परंपरा आणि वाणिज्य, भारतीय मंदिर वारसा, भारतीय ज्ञान परंपरेचे सार यांसारख्या विविध विषयांवर सहभागींना मार्गदर्शन केले. या कोर्सच्या समारोप सत्राच्या अध्यक्षीय भाषणात मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्राचार्य अजय भामरे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामधील भारतीय ज्ञान परंपरेचे महत्व याबाबत मार्गदर्शन केले. समारोप सत्रासाठी साठ्ये कॉलेजचे प्राचार्य डॉ. माधव राजवाडे व मुंबई विद्यापीठाच्या युजीसी, मालविय मिशन टीचर ट्रेनिंग सेंटर (UGC-MMTTC) च्या प्र. संचालिका प्रो.विद्या वेंकटसन हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानवर्धिनी संस्थेच्या विश्वस्त आणि कार्यकारी समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य, मुंबई विद्यापीठाच्या मानव्य विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता, कोर्सचे समन्वयक आणि महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य प्रो. अनिल सिंह, मुंबई विद्यापीठाच्या युजीसी, मालविय मिशन टीचर ट्रेनिंग सेंटर (UGC-MMTTC) च्या प्र. संचालिका प्रो. विद्या वेंकटसन, कोर्सचे सह-समन्वयक आणि महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संतोष गायकवाड, मुंबई विद्यापीठाच्या UGC-MMTTC चे प्रो. प्रशांत नाईक आणि त्यांचे सर्व सहकरी, महाविद्यालयाच्या IQAC चे समन्वयक आणि ग्रंथपाल प्रो. डॉ. शहाजी वाघमोडे, महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागातील सहाय्यक प्राध्यापिका डॉ. अश्विनी ओव्हाळ, महाविद्यालयाच्या इतिहास विभागातील सहाय्यक प्राध्यापिका डॉ. सीमा परटोले, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सर्व सहभागी प्राध्यापकांनी सक्रीय सहभाग घेवून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.