निलेश सांबरे यांना कुणबी मते किती मिळतील यावर कपिल पाटलांचे भवितव्य अवलंबून.
भिवंडी लोकसभा निवडणुकीतील प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. मागे आम्ही म्हटल्याप्रमाणे तीन प्रमुख उमेदवारांपैकी माझा कोणाला म्हणावा असा प्रश्न जरी मतदारांना पडला असला तरी मतदानाचे पवित्र कर्तव्य त्यांना पार पाडायचे आहे त्या अनुषंगाने मतदार निश्चितच मतदान करणार आहे. अशा परिस्थितीत मतदारांचा कल नेमका कोणत्या बाजूला जाईल त्यावर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.
सध्या परिस्थितीत जात हा फॅक्टर निवडणुकीत महत्त्वाचा मानला जातो ठाणे आणि मुंबई परिसरात पूर्वी मतदानासाठी जात हा फॅक्टर वापरला जात नसला तरी सद्यस्थितीत तो वापरला जातो दिवसेंदिवस जातीचा अभिमान वाढत असेल दिसते त्याच अनुषंगाने सध्या भिवंडी लोकसभा मतदार संघात आगरी - कुणबी वाद वाढत असल्याचे दिसून येते त्याचे खरे कारण कपिल पाटील हेच आहेत. प्रत्येक निवडणुकीत जात फॅक्टर वापरण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.
एक तर जातींमध्ये अंतर्गत भांडणे लावून त्यातून निर्माण होणाऱ्या आगीवर पोळी भाजण्याचा प्रयत्न त्यांनी सतत केला आहे. त्या अनुषंगाने कुणबी असलेल्या किसन कथोरे यांना आणि लोकसभेमध्ये उमेदवार असलेले निलेश साबरे यांना त्रास देण्याचा केलेला प्रयत्न सर्वांना माहीत आहे. वाद लावून त्यांचा फायदा घेण्याचा प्रयत्न कपिल पाटील यांनी केला आहे आणि करत आहे. ही बाब आता लपून राहिलेली नाही.
त्यामुळे मागील लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या निवडणुकीत वातावरण बदलले आहे मी तर भिवंडीच्या उत्तर कडे असलेला कुणबी मतदार तसेच शहापूर मुरबाड मध्ये असलेला कुणबी मतदार जात म्हणून निलेश सांबरे यांच्याकडे जाण्याची शक्यता अधिक आहे निलेश सांबरे यांनी केलेले सामाजिक कार्य पाहत आहे. कुणबी समाजाला त्याचा खूप मोठा अभिमान असल्याचे दिसून येते तर दुसरीकडे ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाचे. कुणबी नेते किसन कथोरे हेदेखील नाराज असलेले उघड उघड नाही परंतु आतून कपिल पाटील यांना शह देण्याचा ते प्रयत्न नक्कीच करतील अशा परिस्थितीत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले कुणबी मते ते कपिल पाटील यांच्या विरोधात वापरण्याची जास्त शक्यता आहे.
राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो तसेच मित्रही नसतो असे म्हटले जाते परंतु किसन कथोरे आणि कपिल पाटील यांच्यातील शत्रुत्व राजकारणाच्या ही पलीकडे पोहोचले आहे. असे म्हणायला हरकत नाही ज्या किसन कथोरे यांच्याकडून राजकारणाचे धडे कपिल पाटील यांनी गिरवले त्याच किसन कथोरे यांना नामोहरण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ज्यावेळी किसन कथोरे ठाणे जिल्हा परिषदेत सदस्य आणि बांधकाम समिती सभापती होते, त्यावेळी कपिल पाटील ग्रामपंचायत सदस्य होते. त्यांच्यातील हा फरक याच गोष्टीवरून लक्षात येईल त्यावेळी किसन कथोरे कपिल पाटील यांच्यावर विशेष प्रेम करीत होते ही बाब देखील सर्वांना माहित आहे. थोडक्यात सांगायचे तर राजकारणाचे काही धडे कपिल पाटील यांनी किसन कथोरे यांच्याकडून निश्चितच गिरवले आहेत. परंतु त्याच किसन कथोरे यांना नामोहरण करण्याचा प्रयत्न कपिल पाटील यांनी केल्यामुळे कुणबी समाज खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर नाराज आहे.
काही मुठभर कुणबी नेते कपिल पाटील यांच्या पाठीमागे उभे राहत असले तरी आतील सत्य हे वेगळे आहे हे निश्चितच स्पष्ट सांगायचे तर अशा पद्धतीने नाराज असलेले कुणबी मतदार जर निलेश सांबरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले तरी ही बाब कपिल पाटील यांच्यासाठी निश्चितच धोक्याची ठरणार आहे.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कपिल पाटील आणि बाल्या मामा हे दोन आगरी उमेदवार उभे आहेत तर निलेश सांबरे हे एकमेव कुणबी उमेदवार उभे आहेत अशा परिस्थितीत कुणबी समाज निलेश सांबरे यांच्या पाठीमागे उभे राहण्याची दाट शक्यता आहे, त्या दृष्टिकोनातून विचार केला तर असे घडणार असले तरी याबाबत आणखी काही शक्यता निर्माण होऊ शकते पहिली गोष्ट निलेश सांबरे कोणतेही राजकीय पक्षातून उभे राहिलेले नसल्याने त्यांना मिळणारा पाठिंबा हा सीमित स्वरूपाचा आहे. जेव्हा एखाद्या राजकीय पक्षातून निवडणूक लढवली जाते त्याचा खूप मोठा परिणाम मतदारांवर होत असतो तसा परिणाम निलेश सांबरे यांच्या उमेदवारीमुळे होणार नाही. या निवडणुकीत नकारात्मक मतदान होईल याबाबतही आम्ही स्पष्टपणे लिहिले होते त्या दृष्टिकोनातून कपिल पाटील यांच्या विरोधातील मतदान जाईल की सुरेश म्हात्रे यांना जाहीर याबाबतही जनतेची मानसिकता वेगळी आहे
.
आपण दिलेले मत निवडून येणारे उमेदवाराला दिले पाहिजे असे जनतेला वाटते जे मत कपिल पाटील यांच्या विरोधात द्यायचे आहे ते विजयी उमेदवाराला द्यावे असा दृष्टिकोन वाढत आहे जर मत देऊन निलेश सांबरे निवडून येऊ शकत नसेल तर तर मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा कपिल पाटील यांना होईल हे करण्यास सद्यस्थितीत भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मतदार तयार असल्याचे दिसत नाही. जर कपिल पाटील यांना खरोखरच निवडून द्यायचे नसेल तर सद्यस्थितीत तुल्यबळ उमेदवार सुरेश उर्फ बाल्या मामा म्हात्रे हेच आहेत. त्या अनुषंगाने त्यांना मतदान करून निवडून आणावे असा विचारही जनतेमध्ये केला जात असल्याचे दिसते मात्र, याही परिस्थितीत निलेश सांबरे यांना किती कुणबी मते पडतात त्यावर पुढील विजय अवलंबून आहे.
आगरी समाजाची स्थिती त्याच पद्धतीची आहे दोन वेळा मतदान करून समाज उपयोगी असे कोणतेच काम कपिल पाटील यांच्याकडून झालेले नसल्याने आणि समाजातील लोकांवरच त्यांच्याकडून अन्याय होत असल्याने आगरी आणि खराडी हे मतदार कपिल पाटील यांच्या विरोधात असल्याचे दिसते सद्यस्थितीत या समाजातील मतदारांचा सुरेश उर्फ बाल्या मामा म्हात्रे यांना पाठिंबा दिसत आहे. काही अंशी समाजामध्ये सामाजिक कार्य केलेले आहेत त्यांना संधी दिली तर भविष्यात थोडेफार कार्य त्यांच्याकडून अपेक्षित धरून समाजाचा त्यांना पाठिंबा मिळत आहे. तर काही ठिकाणी दोघांवरही नाराज असलेले मतदार सामाजिक कार्याच्या दृष्टिकोनातून निलेश सांबरे यांच्याकडे वळलेले दिसतात.
निवडणुकीत निवडून येण्यासाठी विविध विषय कारणीभूत ठरत असतात परंतु या विषयांची चर्चा मतदारांमध्ये घडत असते त्या आधारेच कोणत्या उमेदवाराचे पारडे जड आहे आणि कोणत्या उमेदवाराचे पारडे कमकुवत आहे हे ठरवले जाते सद्यस्थितीत कपिल पाटील यांचे पारडे खूपच हलके होत असल्याचे दिसत आहे.