पावसामुळे महावितरण यंत्रणेचे अतोनात नुकसान,

जनदूत टिम    20-May-2024
Total Views |
कर्जत तालुक्यात वादळ, पावसामुळे महावितरण यंत्रणेचे अतोनात नुकसान,
वीजपुरवठा पुर्ववत करण्याची कामे युध्दपातळीवर, ग्राहकांकडून सहकार्याचे महावितरणचे आवाहन.
 
 
दि.१३ मे २०२४ रोजी वातावरणात कमालीचा बदल झाल्यामुळे रायगड जिल्हा हवामान विभगाकडून खबरदारीच्या सूचना करण्यात आले होते. या दिवशी, कर्जत तालुक्यात अवकाळी पावसाने दमदार, वादळी वाऱ्यासह हजेरी लावल्याने,वीज पुरवठ्याची वाताहात होऊन, तालुक्यात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. बऱ्याच ठिकाणी उच्चदाब व लघुदाब वाहिनीचे पोल पडले होते, विद्युत रोहित्र निकामी झाले होते. अशा प्रसंगी महावितरण कर्जत तालुक्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम करून खंडित वीज पुरवठा पुर्ववत करण्याचे प्रयत्न करीत होते. सोमवारी झालेल्या पडझडीमुळे विस्कळीत झालेला वीज पुरवठा पुर्ववत करण्यात येत होता व बहुतांशी भागाचा वीजपुरवठा पूर्वपदावर आला असला तरी अजूनही प्रयत्न सुरु असल्याने ग्राहकांनी सहकार्य करावेत असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
 

कर्जत तालुक्यात वादळ  
दिनांक १३ मे रोजी वादळी वाऱ्यामुळे कर्जत तालुक्यात अनेक ठिकाणी विद्युत यंत्रणा कोलमडून पडली. यासह देखील नुकसान झाले. तर पुन्हा दि. १६ मे २०२४ रोजी संध्याकाळी अचानक अवकाळी पावसाने व घोंगावणाऱ्या वाऱ्याने कर्जत तालुक्यात पुन्हा जोरदार हजेरी लावल्यामुळे महावितरणचा विद्युत पुरवठा विस्कळीत झाला. त्यामध्ये प्रामुख्याने नेरळ इन्कमर उच्चदाब वाहिनीचे ७ पोल, कडाव उच्चदाब वाहिनीचे १७ पोल व अंजप उच्चदाब वाहिनीचे ७ पोल पडल्याच्या घटना संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास घडल्या होत्या. यासह लघुदाब वाहिनीचे अंदाजे ५० पेक्षा अधिक पोल पडले आहेत.
 
कर्जत तालुक्यात वादळ
 
या घटनेमुळे कर्जत तालुक्यातील बऱ्याच गावांचा वीजपुरवठा खंडीत झालेला होता. अशा परिस्थितीत वीज ग्राहकांना वीजपुरवठा विना गैरसोय झाली. परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे क्षतीग्रस्त वीजवाहिन्या, पोल, डीपी , इत्यादी महावितरण तर्फे सदर काम लवकरात लवकर करण्याचा अथक प्रयत्न चालू असून, सदर वीजपुरवठा पुर्ववत करण्याचे कामे युध्दपातळीवर सुरु आहेत. तरी कर्जत तालुक्यातील वीज ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरण भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांनी केले आहे. दरम्यान आतापर्यंत अनेक गावातील वीजपुरवठा सुरळीत सुरु झाला असल्याचे समजते.