कोकण पदवीधर मतदारसंघात वीस वर्ष पदवीधरांची फसवणूक

जनदूत टिम    30-May-2024
Total Views |
कोकण पदवीधरमध्ये मनसेने काय दिवे लावले?
 
 
कोकण पदवीधर मतदारसंघात वीस वर्ष पदवीधरांची फसवणूक करणाऱ्यांची टोळीच आमदार पदावर बसल्याने पदवीधरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुंबई पदवीधर असेल की कोकण पदवीधर असेल या ठिकाणी या प्रस्थापित पक्षांनी तरुणांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केलेली आहे. ज्या नोकरदार तरुणांनी मतदान केले आहे त्यांच्याही समस्यांना कधीच वाचा फोडलेली नाही. तरुणांच्या जीवन मरणाचा प्रश्न म्हणजे मुंबई कोकणात जाणारी रेल्वे, रस्ते मार्ग या विषयांमध्ये सुद्धा यांनी कधी लक्ष घातलेले नाही.
 
मनसेनेही काय दिवे लावले आहेत असा प्रश्न पदवीधर विचारू लागले आहेत. उमेदवार दिला म्हणजे विकास केला असं होत नाही. विकास होईल असे होत नाही. कोणत्याही पोस्ट समस्या सोडवण्यासाठी मनसेने कोकण विभाग पदवीधर मतदार संघात कोणतीही ठोस पाऊले उचलली नाहीत असा मतदारांचा सुर आहे.

कोकण पदवीधर मतदारसंघा
 
कोकणात जाणाऱ्या महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत काय केले यावर मनसेकडे कोणतेही उत्तर नसणार आहे. राष्ट्रीय महामार्गासाठी रस्त्याबाबत या राज्यस्तरीय विजन असलेल्या, विकासाची कास धरलेल्या राज ठाकरे यांच्या पक्षाने कोकणातील महामार्गाबाबत कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही.
 
त्याचप्रमाणे कोकणातील मोठ्या प्रोजेक्ट बाबत केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या वादावादीमध्ये कोकणातील मोठमोठ्या प्रोजेक्टमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांमध्ये, जनआंदोलन मध्ये या पक्षाच्या भूमिकेकडे संशयाने पहिले जात आहे. त्यामुळे तरुण पदवीधर यांचा होणारा विकास या प्रकल्पांच्या माध्यमातून झाला असता तो गेले वीस वर्षे होऊ शकला नाही. त्यामुळे राज ठाकरे यांच्या पक्षाने त्यावर तकलादू भूमिका घेऊन या प्रकल्पांच्या कधी विरोधात तर कधी बाजूने बोलले होते.
 
भारतीय जनता पार्टी चे आमदार निरंजन डावखरे यांच्या निष्क्रियतेमुळे कोकण पदवीधर मतदार संघातील मतदारांच्या नैराश्येला खतपाणी घालण्याचे काम यांनी केले. ठाण्यासारख्या शहरात राहून उच्चभ्रू मित्रांच्या सहकार्याने यांनी आमदारकीचे वर्ष आनंदाने उपभोगले आहेत. त्यामुळे पदवीधरांच्या मूळ समस्येपर्यंत कधीच यांनी गांभीर्याने पाहिले नाही. त्यामुळेच या निवडणुकीत निरंजन डावखरे यांच्या उमेदवारीला विरोध होत असून त्यांना निवडून येणे हे भारी पडणार आहे अशी शक्यता निर्माण झालेली आहे.
 
शिवसेनेच्या नेहमीच्या धरसोड वृत्तीमुळे उद्धव ठाकरे गटाकडून कोकणातील पदवीधरांच्या मूळ समस्येला यामध्ये ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांतील पदवीधर बेरोजगार तरुणांच्या समस्येला ठाणे जिल्ह्याचे भाग्यविधाते कर्मवीर आनंदी दिघे साहेब यांच्या नंतर न्याय मिळेल अशी कोणीही ठोस भूमिकां न घेतल्याने या ठिकाणच्या तरुणांना प्रचंड प्रमाणात बेरोजगारीला सामोरे जावे लागत आहे. या ठिकाणी काम करणारा या ठिकाणच्या स्थानिक असताना विविध कंपन्यांमध्ये मोठ्या मोठ्या उद्योजकांकडे बाहेरील राज्यातील तरुणांना नोकऱ्या मिळतात आणि स्थानिक तरुणांना नोकऱ्यां न मिळतमिळत असल्यामुळे प्रचंड नाराजी शिवसेनेत आता ही वाढलेली आहे.
 
या ठिकाणच्या कोकण विभागाच्या पदवीधर मतदार संघाच्या जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल त्यांनी तर गेल्या वीस वर्षात सत्तेच्या भरोशावर समस्यांकडे कधीच लक्ष दिले नाही यांच्या पक्षाचे कार्यकर्ते हे स्वतःचे व्यावसायिक लागेबंधे जोपासत समस्यांना प्राधान्य न देता आपल्या व्यवसायाला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील बेरोजगार पदवीधर तरुण यांच्या पक्षापासून फारच दुरावलेला आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
 
त्यामुळे कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात मनसेने आपला उमेदवार जाहीर करून काही खूप मोठे तीर मारल्यासारखे भूमिका प्रसिद्धी माध्यमांमधून दिसत आहे. त्यामुळे या ठिकाणच्या वृत्तपत्रांना उमेदवाराच्या जाहीर करण्याने कसले समाधान मिळते हेच समजत नाही. सबंध मीडियाने विकासाच्या मुद्द्यांवर, बेरोजगार पदवीधरांच्या समस्येवर प्रकाश झोत न टाकता उमेदवारी वरती प्रकाश टाकून जनतेच्या मतदारांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करून मूळ मुद्द्याला बगल देण्याचा उद्योग प्रसिद्ध माध्यम ही वापरत आहेत. त्यामुळे या सर्व घटनेला प्रसिद्धी मध्यमही तितकाच जबाबदार असून विकासाला अडचणीचा भागच ठरत आहे, असे म्हटल्यास चूक ठरणार नाही.