पालघर (अ.ज.) लोकसभा छाननी अंती 13 उमेदवारांचे 21 नामनिर्देशनपत्र पात्र तर 4 उमेदवारांचे 5 नामनिर्देशनपत्र अपात्र

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024

जनदूत टिम    04-May-2024
Total Views |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024

-

छाननी अंती 13 उमेदवारांचे 21 नामनिर्देशनपत्र पात्र तर 4 उमेदवारांचे 5 नामनिर्देशनपत्र अपात्र
 
पालघर दि. 4 मे : 22 - पालघर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 26 नामनिर्देशनपत्र दाखल केले. त्याची छाननी आज करण्यात आली. त्यानुसार 13 उमेदवारांचे 21 नामनिर्देशनपत्र पात्र तर 4 उमेदवारांचे 5 नामनिर्देशनपत्र अपात्र ठरविण्यात आले आहेत.

palghar  lok sabha nivadnuk
जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत छाननी प्रक्रिया करण्यात आली. यावेळी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद बोडके, जनरल ऑब्झरवर अजयसिंह तोमर, अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) संजिव जाधवर, तहसीलदार सचिन भालेराव आदी उपस्थित होते.
 
छाननी अंती सुरेश गणेश जाधव (अपक्ष), परेश सुकूर घाटाळ (अपक्ष) 2 अर्ज, राजेश दत्तू उमतोल (अपक्ष), भावना किसन पवार (अपक्ष) यांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले. तर बळीराम सुकूर जाधव (बहुजन विकास आघाडी) यांनी अर्ज मागे घेतला.