महायुतीच्या घोषणांनी शहापूर तालुका दुमदुमला

जनदूत टिम    08-May-2024
Total Views |
कपिल पाटील यांची शहापुरातील रॅली....!!!!
 
शहापूर, दि. ७ (प्रतिनिधी) : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या रॅलीला शहापूर तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहापूर शहरात काढलेल्या भव्य रॅलीने शहापूर शहर मोदीमय झाले होते. शहराबरोबरच तालुक्याच्या ग्रामीण भागात पोचलेल्या रॅलीचे ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले.वाडा तालुक्यात रॅलीला सोमवारी जनतेने प्रतिसाद दिल्यानंतर, शहापूर शहरासह तालुक्यात आज काढलेल्या रॅलीचे शहापूरमध्ये उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला कपिल पाटील यांनी पुष्पहार अर्पण केला. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील स्मारकाला पुष्पहार घालून वंदन केले. शहापूरातील मुख्य रस्ता हा कार्यकर्त्यांच्या घोषणांबरोबरच सनईचे सूर, ढोल-ताशे आणि बॅंजोने दुमदुमून गेला होता. यानिमित्ताने शहापूर शहरातील वातावरण मोदीमय झाले होते. तत्पूर्वी मनसेच्या कार्यालयाला भेट दिली. तसेच रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्विकारल्या. कुणबी सेनेच्या कार्यकर्त्यांनी कपिल पाटील यांचे स्वागत केले.

kapil patil
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून झालेल्या शहापूरच्या विकासाला नागरिकांनी पसंती दिली असल्याचे रॅलीला मिळालेल्या प्रतिसादावरून दिसत आहे. यंदा २०२४ मध्ये होणारी ही निवडणूक देशाच्या भविष्यासाठी असल्याने, पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याचा जनतेने निर्धार केला आहे, अशी प्रतिक्रिया महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी व्यक्त केली.
 
kapil patil
 
या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार श्री. दौलत दरोडा, शिवसेनेचे उपनेते श्री. प्रकाश पाटील, कुणबी सेनेचे प्रमुख श्री. विश्वनाथ पाटील, मनसेचे भिवंडी लोकसभा अध्यक्ष श्री. शैलेश बिडवी यांच्यासह महायुतीचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
शहापूरपाठोपाठ कसारा शहर व परिसरातील नागरिकांकडून महायुतीच्या रॅलीचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. भरदुपारच्या कडक उन्हातही महायुतीचे कार्यकर्ते रॅलीत उत्साहात सहभागी झाले होते. कसारा शहरानंतर वाशाळा फाटा, डोळखांब नाका, कूलवंत नगर, शेणवे, किन्हवली येथेही यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला.
 
गेल्या १० वर्षात शहापूर तालुक्यात केलेल्या विविध विकासकामांची माहिती महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी दिली.