दासगाव मोहल्यात घरावर दरड कोसळली मात्र जीवित हानी टळली

महाड तालुक्यात मागील चार दिवसापासून मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी

जनदूत टिम    23-Jul-2024
Total Views |

महाड (मिलिंद माने) : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महाड तालुक्यातील दासगाव गावातील इब्राहिम गुलाम हुसेन शेख यांच्या घरावर डोंगरातील मला मोठा दगड कोसळून घराचे प्रचंड नुकसान झाले असले तरी मात्र जीवित हानी टळली आहे.

 
Dasgav

महाड तालुक्यात मागील चार दिवसापासून मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी होत आहे या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते खचले असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर चिखल झाल्याने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोठा अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यातच आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील दासगाव गावात राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला असणाऱ्या मोहल्यातील 11 घरांपैकी इब्राहिम गुलाम हुसेन शेख यांच्या घरावर डोंगरावरील भला मोठा दगड आल्याने घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे

दासगाव गावातील इब्राहिम गुलाम हुसेन शेख यांच्या घरात पाच जणांचे कुटुंब आहे मात्र डोंगरावरील दगड कोसळण्याचा आवाज होताच घरातील सून आणि सासरा त्या दगडाच्या आवाजाने घराबाहेर पडले त्यामुळे ते बालम बाल बचावल्याचे सांगितले जात आहे याबाबत महाडचे प्रांताधिकारी ज्ञानोबा बानापुरे यांनी महाड तशिलदारांच्या पथकांना जाऊन या या घराच्या झालेल्या नुकसानीबाबत पंचनामे करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे एकंदरीत दासगाव गावात पुन्हा 2005 च्या पुनरावृत्तीची आठवण दासगावकरांना या निमित्ताने झाली आहे