ठाणे जिल्हयातील कल्याण ग्रामीण परिसरातील कोसले या गावचे मुजोर इसम महादू (उर्फ संदू) पाडुरंग तारमले याने शेतकऱ्यांचा वाडवडलांपासून सुरु असलेला येण्याजाण्याचा रस्ता ट्रॅक्टरने दगडी टाकुन पूर्णपणे बंद केला आहे. ग्रामस्थ व शेतकऱ्यांचा हा रस्ता अडवल्यामुळे शेतकऱ्याने पिकवलेल्या भाजीपाला ने आण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या आहेत. रस्त्याच्या पलीकडे लोकवस्ती असल्यामुळे पर्यायी कुठलाही रस्ता नसल्याने ग्रामस्थांना या आडदांड माणसामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शेती करण्यासाठी इतर कुठलाही पर्यायी रस्ता नसल्यामुळे शेतकऱ्याला त्याच्या जागेत शेती उपयुक्त अवजारे, ट्रॅक्टर व इतर वाहन नेण्यास असंख्य गोष्टींचा अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जगाचा पोशिंदा शेतकरी आहे. म्हणून शेतकरी जगला पाहिजे यासाठी शासन वेगवेगळ्या योजना व मदतीद्वारे शेतकऱ्याना सहकार्य करीत आहे.
याची आई ही आमच्याच एकत्र कुटुंबातील होती. याचे आजोबा रघु हरि पालवी यांनी शेतकऱ्यांच्या खोट्या सह्या कबुली जबाबाने फसवणूक करून संपूर्ण पालवी कुटुंबाची जमीन हडपली आहे. यासंदर्भात लवकरच संपूर्ण पालवी कुटुंब याविरुद्ध कायदेशीर दावा कोर्टात दाखल करणार आहेत. याच्या जमिनीवर हा एकलौता वारस असून त्याला इतर कुणीही वाली वारस नाही असे सांगून घरसुद्धा स्वतःच्या नावावर करून याने ग्रामपंचायत व शासनाची फसवणूक केली आहे. तसे बहिणीने ग्रामपंचायत कोसले येथे वारस पंचनामा रद्द करून घरावर आमचीही नावे लागावीत यासाठी पत्रव्यवहार केला आहे.
या जमिनीचे मुळमालक आमचे वंशज रघु हरि पालवी याने आमच्या जमिनीच्या कागदपत्रांमध्ये खाडाखोड करून स्वतःची जमीन तेवढी वेगळी करून इतर आमच्या जमिनीवर सामाईक शंभर नावे कशी काय राहिली या संदर्भात संपूर्ण पालवी कुटुंब याच्याविरुद्ध कोर्टात दावा दाखल करणार आहोत. याचे हे सर्व प्रताप लवकरात लवकर लोकांसमोर येतील याची कल्पना आल्यामुळे हा शेतकऱ्यांना नाहक त्रास देत आहे. ईश्वराच्या काठीमध्ये आवाज नसतो. याच्या या कर्माची फळ याच्या कुटुंबाला लवकरच भोगावी लागतील. या धूर्त व लबाड खोटारड्याच्या घरात सदगुरूंचे अधिष्ठान आहे. संपूर्ण कुटुंब बैठकीला जातो. याची पत्नी रस्त्यावर उभी राहून शेतकऱ्यांना घाण घाण शिवीगाळ करीत असते याची पोर शेतकऱ्यांना मारण्याची धमक्या देतात. हा संघटनेची धमकी देऊन शेतकऱ्यांना ब्लॅकमेलिंग करून ग्रामस्थांवर खोट्यानाटे गुन्हे दाखल करून त्यांना कायद्यात अडकवण्याचा प्रयत्न करीत आहे. जो व्यक्ती सख्ख्या बहिणीला फसवून तिची संपूर्ण जमीन स्वतःच्या नावावर करू शकतो, जो शेतकऱ्यांचे रस्ते अडवतो, अशा व्यक्तींना सदगुरू कसे अधिष्ठान देऊ शकतात हे सर्व सामान्यांना पडलेला मोठा प्रश्न आहे.
या संपूर्ण घटने संदर्भात ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी याविरुद्ध राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री, तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक यांना रस्ता मोकळा करण्यासाठी यावर कायदेशीर कार्यवाहीसाठी आमरण उपोषणाचा इशारा दिला असून त्यावर तात्काळ कायदेशीर कार्यवाही करण्याचे निवेदन दिले आहे.
प्रतिक्रिया:- श्री. अरुण काथोड पालवी (शेतकरी) मु. कोसले
आम्हां ग्रामस्थ व शेतकऱ्यांना घराकडे व शेती मालाची ने आण करण्यासाठी पर्यायी रस्ता नसल्यामुळे शासनाने अशा मुजोर, गावगुंड, खोटारड्या इसमाला योग्य तो समस देऊन आम्हांला रस्ता मोकळा करून योग्य ती तात्काळ कायदेशीर कार्यवाही करावी.