आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार

आदिवासी विभागाअंतर्गत विविध योजनेच्या लाभार्थ्यांचा संवाद मेळावा जव्हार येथील राजीव गांधी स्टेडियम येथे आयोजित करण्यात आला होता.

जनदूत टिम    21-Jan-2025
Total Views |
आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार
- आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके

adivasi vikas 
पालघर दि. 17 : पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी सांगितले. आदिवासी विभागाअंतर्गत विविध योजनेच्या लाभार्थ्यांचा संवाद मेळावा जव्हार येथील राजीव गांधी स्टेडियम येथे आयोजित करण्यात आला होता.
पालघर जिल्ह्यात आदिवासी विभागाकडून विविध योजना राबविण्यात येतात परंतु या योजना आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचविण्यासाठी संवाद व प्रचार करुन आदिवासी विभागाअंतर्गत योजनांचे सादरीकरण करुन सकारात्मक विचार घेउन . यापुढे आदिवासी विभाग धावत राहणार कधीही थांबणार नाही. तसेच आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आज आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी जव्हार येथे आदिवासी मेळाव्यात केले.
या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, खासदार हेमंत सवरा, आमदार हरिश्चंद्र भोये, आमदार राजेंद्र गावित, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, डहाणू नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष भरतकुमार रजपूत, आदिवासी आयुक्त दिपक कुमार मीना, प्रकल्प अधिकारी करिश्मा नायर, सत्यम गांधी, जिल्हा परिषद सभापती संदीप पावरे, उपायुक्त दीप पोळ उपस्थित होते.
मंत्री श्री. उईके म्हणाले की मुख्यमंत्री यांनी सर्व विभागांना 100 दिवसाचे नियोजन करावे असे निर्देश दिले आहेत.हा कार्यक्रम आपण यशस्वी कराल यात शंका नाही. आदिवासी विभागामार्फत आश्रम शाळा व अनुदानित आश्रम शाळा चालविण्यात येतात परंतु बारावीनंतर विद्यार्थ्यांना वस्तीगृहाची गैरसोय होऊ नये यासाठी आदिवासी विभागामार्फत नवीन वसतिगृह बांधण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी आश्रम शाळा आहेत त्या ठिकाणी एकही विद्यार्थी वसतिगृहाशिवाय वंचित राहणार नाही असा विश्वास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी यावेळी सांगितले.
आदिवासी मुली व मुले आदिवासी विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांमधून पायलट आणि हवाई सुंदरी होतील अशी मला खात्री आहे. यासाठी आदिवासी विकास महामंडळाकडून योजना राबविण्यातचा संकल्प केला आहे. तो सार्थक होईल . कातकरी समाजासाठी आदिवासी विभागाकडून ज्या ज्या योजना आहेत त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे निर्देश मंत्री डॉ. अशोक उईके यांनी संबंधित अधिकारी वर्गाना दिले.
या वेळी मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते आदिवासी विकास विभागाअंतर्गत विविध योजनेच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधीकस्वरूपात धनादेशाचे वाटप करण्यात आले .
मंत्री डॉ.अशोक उईके यांनी आदिवासी विभागांचा आढावा घेऊन विभागाअंतर्गत येणाऱ्या विविध योजनां विषय अधिकारी वर्गांना निर्देश दिले.