झाडांचा डॉक्टर : विजयकुमार कट्टी
रस्त्यावरचा समाजशास्त्रज्ञ
कैलाश म्हापदी
ते डॉक्टर हीत, मात्र लोक त्यांना डॉक्टर म्हणतात. ते शास्त्रज्ञही नाहीत, मात्र लोक त्यांना शास्त्रज्ञ समजतात. ते आग्रहाने असं मला म्हणू नका म्हणतात, मात्रना या दोन्ही पदव्या लोक त्यांना उत्स्फूर्तपणे देतात. काहींचं जगणंच मुळात एक प्रबंध असतो, शास्त्र असतं. त्यांचं समाजातलं, रस्त्यावरचं भविष्यासाठी पेरलेलं आणि शिंपलेल काम इतकं भक्कम आहे, म्हणूनच या पदव्या त्यांच्या मागे मागे धावतात. कारण ते रस्त्यावरचे समाज शास्त्रज्ञ आहेत. सर्वसामान्य कुटुंबांप्रमाणे पोटापाण्यासाठी ठाण्यात आलेले विजयकुमार कट्टी हे त्यातलेच एक अबोल, प्रसिद्धीपराडमुख, स्थितप्रज्ञ, धीरगंभीर आणि जॉर्ज कार्व्हर सारखे सतत जमिनीचा, मातीचा, सृष्टीचा ध्यास लागून जगणारे व्यक्तिमत्व आहे. कट्टी यांचा आज 65 व्या वाढदिवशी आणखीन एक नवं पर्व सुरू होतंय. आयुष्याच्या सेकंड इनिंगमध्ये ते ही कितवी इनिंग खेळतायेत हे त्यांनाच माहिती. यावेळी झाडांसोबत रस्ता सुरक्षेच्या प्रबोधनाचा, शास्त्रशुद्ध उपाययोजनांचा काळाच्या पलीकडे जाऊन शिल्लक राहील असा नवा डाव त्यांनी मांडला आहे. त्यावरचं " ग्रँडमा रोहिणी स्टोरी ऑन रोड सेफ्टी " हे बहु आयामी, अल्पमोली बहुगुणी असं पुस्तक आज प्रकाशित होत आहे. महाराष्ट्रात, भारतातच नव्हे जगभरात तशा अँगलने झालेला हा पहिलाच प्रयत्न सुज्ञ सुशिक्षित पिढीने उचलून धरायला हवा.
अलीकडची पिढी पुस्तकांच्या पलीकडे गेली आहे, असं म्हटलं जात असताना कट्टींचे मराठी, हिंदी आणि इंग्रजी तीन भाषांमधलं हे पुस्तक ई - आवृत्ती आहे आणि जगभरात हे पुस्तक वाचलं जाईल असा तज्ञांचा दावा आहे. यासाठी त्यांनी निवडलेलं मटेरियल देखील अफलातून आहे. सोपं म्हणजे किती सोपं अतिसोपं, प्रचंड सोपं या पलीकडचाही शब्द कमी पडेल, इतक्या सोप्या पद्धतीने आजीबाईंच्या गोष्टी म्हणजे आजी आपल्या लहान नातवांना जितक्या सजग आणि सोप्या पद्धतीने गोष्टी सांगते तेवढ्या सोप्या पद्धतीने कुट्टी यांनी हे भांडार उघडं केले आहे. अगदी एक एक, छोटा छोटा धागा ओढत ओढत त्यांनी रस्ता सुरक्षा सारख्या किचकट विषयाची अक्की चादर विणून काढलेय. गमतीची गोष्ट म्हणजे आज अर्धशतकानंतर भारतातल्या कुठल्याही तज्ञाला किंवा या विषयात काम करणाऱ्या नोकरदाराला देखील सांगता येणार नाहीत अशा कित्येक गोष्टी या झाडाच्या डॉक्टरने रस्ता सुरक्षा संदर्भात सोप्या पद्धतीने सांगितल्या आहेत. आणि मुख्य म्हणजे या तिन्ही भाषांमधली ही पुस्तकं अर्थातच विनामूल्य आहेत. ते जास्तीत जास्त लोकांनी वाचावीत आणि इतरांनाही वाचायला लावावी. आई-वडिलांनी मुलांना, मुलांनी मित्रांना, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आणि शासनाने जनतेला हे वाचायला लावायला हवं, ते उपलब्ध करून द्यायला हवं.
बोलता बोलता किंवा लिहिता लिहिता ते विचारतात स्पीड बेकर म्हणजे काय, किती, ते कशासाठी, कसे, लांबी रुंदी, वजन, मटेरियल, शास्त्र काय माहित आहे अरे बापरे....स्पीडब्रेकर बाबतीत इतके प्रश्न असू शकतात. आपल्याला एक माहीत होतं, डांबराचा एक आडवा उंचवटा किंवा अलीकडच्या काळात आलेला फायबर रबराचा यापलीकडे काय, पण या पलीकडे एक अख्खं पुस्तक होईल एवढी माहिती स्पीड ब्रेकरची आहे, हे कळल्यावर धक्काच बसतो. हॉस्पिटलच्या शेजारी रस्त्यावरती असणारा स्पीडब्रेकर, शाळेच्या रस्त्यावरती असलेला स्पीडब्रेकर या दोन स्पीडब्रेकर मध्ये आकाश पातळाचा अंतर आहे, का आहे माहित नाही. हॉस्पिटल जवळचा स्पीड ब्रेकर हा सहा इंचाच्या छोट्या छोट्या पट्ट्यांचा कर्र आवाज करणारा परंतु सहज न जाणवणारा स्पीड बेकर आणि शाळेजवळचा मोठा यांची कारण ही पिढी वाचेल तर थक्क होईल.
रस्ता सुरक्षा हा तसा फारसा गांभीर्याने न घेतलेला विषय, कुणालाही त्याचे काही पडलेलं नाही. मात्र उभ्या पृथ्वीवरील सर्व जगातल्या सगळ्या भाषांना समांतर असलेली रस्ता सुरक्षेची भाषा किती प्रभावी आणि कशी गुंफली गेली असेल, कशी विकसित केली गेली असेल, याविषयी खरंच कुणाला कधी कुतूहल वाटलं नाही. कट्टी यांचे हे पुस्तक अशा शेकडो कुतुहालांचं भंडार आहे. रस्ता कसा ओलांडावा, रेल्वे कशी क्रॉस करू नये, सिग्नल या मोजक्या चार पाच गोष्टींच्या पलीकडे रस्ता सुरक्षा काय आहे, याविषयी खरंच जगाला खूप कमी माहित आहे. चिन्ह, निशाण्या, चित्र अशा अनेक गोष्टींना एकत्र करून जगाच्या पाठीवरती एकच धाग्यात समांतर असलेली आणि कुठल्याही भाषा आणि लिपीच्या बंधनात न अडकणारी रस्ता सुरक्षेची स्वतंत्र भाषा कट्टी यांनी अशा पद्धतीने उलगडली आहे की सर्वप्रथम शासनाने ती एखाद्या कायद्याच्या पुस्तकासारखी नव्हे तर जगण्याच्या धर्माचे पुस्तक समजून ती डोक्यावर घेतली पाहिजे. तिचा पॅटर्न संपूर्ण देशात लागू व्हायला हवा. दुसऱ्या महायुद्धात जितके लोक मेले नाहीत त्याच्या दुप्पट भारतात रस्ता अपघातात मरणाऱ्यांची संख्या आहे. उभ्या जगात सगळ्या युद्धांमध्ये जितका नरसंहार झाला नाही इतके लोक डास चावून मलेरिया, डेंग्यू होऊन मरतात. त्याच जगात रस्ता सुरक्षा केवळ 15 दिवसाचा पंधरवडा न ठेवता त्या संदर्भात लोकशिक्षण व्हायला हवं. कट्टीं सारख्या सोप्या भाषेत ते शालेय पुस्तकांपासून जर आलं तर मृतांच्या याद्यांची आकडेवारी नक्की कमी होतील यात वाद नाही.
झाड म्हणजे काय ?
गेली अर्ध शतकाहून अधिक काळ जगात " झाडे लावा झाडे वाढवा, " वृक्ष लिपी, ग्रीन झोन, याविषयी बोलले जात आहे. अनेक देश त्यावर प्रचंड पैसा खर्च करत आहेत. त्यातूनच ग्लोबल वॉर्मिंग ची नवीन भाषा आता जग भाषांतरित करतंय. भारताला तर वृक्ष पंढरीच लाभली आहे, मात्र तरीही भारतातला दिवसेंदिवस वाढणारा दुष्काळ हा वृक्ष अज्ञानामुळे आहे, असा दावा करणाऱ्या कट्टी यांचे अख्खं आयुष्य झाडांसाठी समर्पित आहे. जगाला एका कार्व्हर ने कृषी संजीवनी दिली. कट्टी हे भारताचे कार्व्हर चं आहेत. जगभरात त्यांची झाडांचा डॉक्टर म्हणून ओळख आहे. आज झाड म्हणजे काय, माणसासारखं त्याचंही एक आयुष्य आहे. त्याला ऑक्सिजन, कार्बन, पाणी, आयर्न, कॅल्शियम या सगळ्या गोष्टी लागतात. त्यालाही जखमा होतात. तोही नर्वस होतो. त्यालाही अनेक रोग आहेत. त्याच्यावरती सहज सोपी औषधं आहेत, फक्त पाणी तर कधी कधी जास्त पाणी पाजून झाड जगतं, या भोळ्या कल्पने शिवाय भारतीयांना झाडाविषयी फार कमी माहित आहे. आपल्या आसपास 100 ते 10 हजार पद्धतीच्या झाडांच्या जाती आहेत. मात्र स्वतःला आपण कितीसे झाड साक्षर आहोत, हा स्वतःने प्रश्न विचारायचा आहे. आपल्याला दहा वीस तरी झाडांच्या जाती माहित आहेत का, समोर उभ्या असलेल्या 100 झाडांपैकी किती झाडं आपण ओळखू शकतो हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा, त्यावरून ठरेल आपण वृक्ष साक्षर की निरक्षर. कट्टी यांनी मांडलेली अशी शेकडो निरीक्षणं, उदाहरणं एक शास्त्र आहे, स्वतंत्र पीएचडी चा विषय आहे, हे पाहायला कुतूहल म्हणून एकदा त्यांच्या घरी गेलो. सर्व सामान्यपणे टू बीएचके चा त्यांचा सतरा अठरा मजल्यावरचा फ्लॅट. मात्र छोट्याशा त्यांच्याच बेडरूम मध्ये वाटी, ग्लास, बाऊल, मग, कुंडी, मोठी कुंडी अशा अनेक गोष्टींमध्ये लावलेली साडेतीन हजार झाडे बघून ह्या झाडाच्या डॉक्टरला, ह्या रस्त्यावरच्या समाजशास्त्रज्ञाला खरंच या देशाने समजून घ्यायला हवं, एवढीच खंत मनात पाझरली. आज त्यांच्या 65 व्या जन्मदिनी हा झाडांचा डॉक्टर जगासमोर भविष्यातल्या येणाऱ्या संकटांच्या उपाययोजनांच्या चाव्या शोधतो आहे. एक फॅन म्हणून काळजाच्या देठापासून शुभेच्छा !!