शहापूरात रक्षक पोलीसच झाले भक्षक !

12 Oct 2023 11:40:00
निर्भय महाराष्ट्र च्या ठाणे जिल्हा प्रमुखाला मारहाण करून केले खोटे गुन्हे दाखल...

शहापूरात रक्षक पोलीसच झाले भक्षक
 
स्वतंत्र मिळून गेली 75 वर्ष झाली आपण मोठ्या थाटामाटाट सुवर्ण वर्ष म्हणून साजरा देखील केला परंतु काही गुंड प्रवृतीच्या लोकांमुळे आपल्याला स्वतंत्रपासून वंचित ठेवायचं काम होत आहे. आणि विशेष म्हणजे ही लोक दुसरी तिसरी कोण नसून लोकांचे रक्षस असणारे लोकसेवकच आहेत अशा प्रवृतीला आळा घालने काळाची गरज आहे.
 
२५ फेब्रुवारी २०२१ रोजी मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाजे याने देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर बॉम्ब ठेऊन स्वतःच चौकशी करायचे नाटक केले आणि आपला गुन्हा उघड होईल या भीतीने खून देखील केला परंतु तत्कालीन विरोधी पक्षनेते व आत्ताचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान सभे मध्ये पुराव्यासहित माहिती दिली आणि केंद्रीय तपास यंत्रणांनी पुरावे आणि माहिती सादर केली त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.
 
परंतु अशे अनेक वाजे पोलीस दलात आजही कार्यरत आहेत त्याच उदा . शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे त्याच झालं अस की निर्भय महाराष्ट्र पार्टीचे राहुल काठोले हे त्यांच्या तक्रार अर्जाची विचारपूस करण्यासाठी दिनांक ११ ऑक्टोंबर २०२३ रोजी गेले होते व त्यांनी विचारपूस करताना फेसबुक लाईव्ह केला. खर तर सामान्य नागरिक म्हणून त्यांना तो पुर्ण कायदेशीर अधिकार आहे हे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे.
 
तरी देखील मिलिंद शिंदे यांनी त्यांच्यावर हल्ला चढवून त्यांना अटक केली व त्यांच्यावर खोटे गुन्हे देखील दाखल केले.अशा प्रकारे पोलिसच सामान्य नागरिकांचे रक्षण करायचे सोडून भक्षस झाले तर न्याय कोणाकडे मागायचा? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आपण आज जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशातील नागरिक म्हणून घेतो आणि दुसरीकडे मात्र लोकशाही जनतेचे सेवकच जनतेची छळवणूक व पिळवणूक करीत आहेत. याचा गांभीर्यपूर्वक विचार करुन आशा व्हाईट कॉलर गुंड प्रवृत्तीच्या माणसांवर कार्यवाही होणे काळाची गरज आहे.
Powered By Sangraha 9.0