पनवेल जगाच्या नकाशावर !

17 Oct 2023 10:32:57
Maharashtra : Panvel ; 
कॉरिडॉर मुंबई व परिसराला दळणवळणाच्या माध्यमातून एकमेकांशी जोडला जाणारा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प म्हणून कॉरिडॉरच्या प्रकल्पाकडे पाहिले जात आहे. १० वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रियेने वेग धरला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच 'एमएमआरडीए'चा. हा प्रकल्प 'एमएसआरडीसी'कडे वर्ग करण्यात आला.

पनवेल जगाच्या नकाशावर 
एकूण १२८ किमी लांबीच्या या रस्त्याला १६ मार्गिका असतील. प्रकल्पासाठी 2200 हेक्टरहून अधिक जमिनीची गरज आहे. तर भूसंपादनासाठी सुमारे २२ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. एनएच ८. एनएच-३, एनएच-४, एनएच-१७, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे आणि अन्य रस्त्यांना जोडणारा हा मार्ग पनवेलमधून थेट मोरबे गावाजवळून बोगद्यातून अंबरनाथला जोडला जाईल. बोगद्याचे कामही अंतिम टप्प्यात आहे. पहिला टप्पा जेएनपीटी बंदराला जोडण्यासाठी नवघर ते जेएनपीटीजवळील चिरनेर गावापर्यंत ७९ कि.मी. लांबीचा आहे.
 
विरार, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, पनवेल, तयेगा व उरण या मुंबई महानगर क्षेत्रातील शहरांच्या काला यामुळे मिळणार आहे. नवी मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळ जेएनपीटी बंदर, मुंबई पारबंदर प्रकल्प (एमटीएचएल) व डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या विकासासाठीही हा मार्ग उपयुक्त व महत्त्वाचा असेल. या स्वतंत्र मार्गिकेमुळे विरार ते अलिबागदरम्यानच्या प्रवासाचा वेळही ५० टक्क्यांहून अधिक कमी होईल असा 'एमएसआरडीसीचा दावा आहे.
 
  • पनवेल उरणला देशाशी जोडणारा 'डीएफसी'
भारतीय रेल्वेचा महत्वाकांक्षी असलेला मालवाहतुकीचा स्वतंत्र रेल्वेमार्ग उभारण्याचे कामही सुरू आहे. मालवाहतुकीसाठी लागणारा वेळ कमी करण्याचा उद्देश त्यामागे आहे. त्याअनुषंगने रेल्वेकडून 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (डीएफसी) हा प्रकल्प देशभर राबवला जात आहे. सध्या देशभरात मालवाहतूक व प्रवासी वाहतूक एकाच रेल्वेमार्गावरून केली जाते. देशाच्या पूर्व भागातील राज्यांना जोडणारा ९०० किमीचा प्रकल्प पूर्ण झाला आहे. नवी मुंबईच्या जेएनपीटी बंदराला जोडणारा डीएफसी प्रकल्प हा डिसेंबर २०२३पर्यंत पूर्ण करण्याचा रेल्वेचा प्रयत्न होता. परंतु भूसंपादन इतर तांत्रिकमुळे रेल्वेला ही डेडलाइन पाळता येईल का, यावर प्रश्नचिन्ह आहे.
 
जेएनपीटी ते दादरीला जोडणाऱ्या प्रकल्पाची मार्गिका पनवेल रेल्वे स्थानकातून पुढे नियोजित आहे. त्याअनुषंगाने स्थानकातील कामाला सुरुवात झाल्यानंतर त्याचा फटका पनवेलच्या लोकल सेवेवर झाला. दोन वेळा मेगाब्लॉक घेऊनही आज सुद्धा लोकलचे वेळापत्रक पूर्णपणे 'ट्रैक वर आलेले नाही. परंतु इतर मार्गिकांना कोणताही अडान करता ही मार्गिका पुढील काही महिन्यांत पनवेल रेल्वे स्थानकातून मार्गस्थ व्हायला सुरुवात होऊ शकते. त्यामुळे देशाच्या कानाकोपन्यात कार्गो, मालवाहतूक, कोळसावाहतूक याला वेग येईल.
 
  • सीएसटी ते कर्जत व्हाया पनवेल
एकाच रेल्वे मार्गिकेमुळे अनेक वर्षे पनवेल व कर्जतला लोकलने जोडता आलेले नाही. या मार्गावर फक्त मालवाहतूक व लांब पल्ल्याच्या प्रवासी रेल्वे धावतात. मात्र, सध्या अतिरिक्त रेल्वेमार्गाचे काम ज्या वेगात सुरू आहे. ते पाहता २०२५पर्यंत पनवेल- कर्जत लोकल सुरू होणार असल्याचे आशादायी चित्र आहे. यामुळे पनवेल ते कर्जत अंतर फक्त चार स्थानकांवर येऊन ठेपणार आहे. कर्जतची लोकल पनवेलपर्यंत आली की साहजिकच पुढे सीएसटी अर्थात मुंबईसाठी अतिरिक्त जोडलो मिळणार आहे. शिवाय कर्जतच्या दिशेने जाणान्या प्रवाशांना पनवेलहून अवघ्या २० ते ३० मिनिटांत पोचता येणार आहे. शिवाय मुंबई-कर्जत प्रवासासाठी लागणारे २ तास १० मिनिटांचे अंतर अर्ध्या तासाने कमी होऊन एक तास ४० मिनिटांवर येईल. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गाला हार्बर मार्गाची अतिरिक्त व चांगली जोडणी त्यामुळे लाभणार आहे.
 
सध्या या प्रकल्पाचे काम वेगात सुरू आहे. पनवेल ते कर्जतदरम्यान चिखले, मोह, चौक व कर्जत ही चार स्थानके असतील. या मार्गावर राज्यातील सर्वाधिक लांबीचा बोगदा असण्याची शक्यता आहे. या लोकलमुळे पनवेल ते कर्जत परिसरात मोठ्या वेगाने नागरीकरण वाढण्याची सुचिन्हे आहेत रोवला मैना प्रकल्पाच्या मंजूर डीसीपीआरनुसार, चार हजार चौरस मीटर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या भूखंडांवरील सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत भूखंडाच्या एकूण क्षेत्रफळापैकी २० टक्के जागा ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (इडब्ल्यूएस) व अल्प उत्पन्न गटांच्या (एलजी सदनिकांसाठी खासगी विकासकामार्फत महिनाभरापूर्वी उपलब्ध करण्यात आली आहे.
 
त्यानुसार गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर एकूण १७१ सदनिकांची गृहनिर्माण योजना सादर करण्यात आली. यात 'इडब्ल्यूएससाठी सात तर, एलआयजीसाठी १६४ सदनिका असतील, 'मैना'कडून नियोजनबध्द विकास होणार असल्याने भविष्यात पनवेल तालुक्याचा पूर्वेकडील भागविमानतळाला साजेसे शहर म्हणून विकसित होईल. विमानतळावरून विमानोड्डाण सुरू झाल्यानंतर मुंबईची मेट्रो सिडकोकडून या प्रकल्पावर अधिक लक्ष केंद्रित होण्याची शक्यता आहे.
 
  • सागरी सेतूने पनवेल जोडणार मुंबईशी
नियोजनबाद पनवेलसाठी 'नैना' पनवेल तालुक्यात होऊ घातलेल्या विमानतळामुळे याभोवतीच्या परिसराचाही नियोजनबध्द विकास अपेक्षित आहे. म्हणूनच नवी मुंबई शहर विकसित करणाऱ्या सिडको महामंडळाच्या अधिपत्याखाली 'नैना' अर्थात नवी मुंबई विमानतळ प्रभावित अधिसूचित क्षेत्र विकसित केले मुंबईशी जाणार आहे. नैनाच्या अंतिम विकास आराखड्यात पनवेल तालुक्यातील २३ गावांसाठी ११ परियोजना राबविण्यात येणार आहेत. यातील १० परियोजना जाहीर करण्यात आल्या आहेत. या नैना प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया आणि त्याचा मोबदला यावरून वाद सुरू असला, तरी नैना प्राधिकरणाने कामे थांबवलेली नाही.
 
दोन दिवसांपूर्वीच बेकायदा बांधकामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी 'नैना'ने पहिला फलक रोवला मैना प्रकल्पाच्या मंजूर डीसीपीआरनुसार, चार हजार चौरस मीटर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या भूखंडांवरील सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत भूखंडाच्या एकूण क्षेत्रफळापैकी २० टक्के जागा ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (इडब्ल्यूएस) व अल्प उत्पन्न गटांच्या (एलजी सदनिकांसाठी खासगी विकासकामार्फत महिनाभरापूर्वी उपलब्ध करण्यात आली आहे. त्यानुसार गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर एकूण १७१ सदनिकांची गृहनिर्माण योजना सादर करण्यात आली.
 
यात 'इडब्ल्यूएससाठी सात तर, एलआयजीसाठी १६४ सदनिका असतील, 'मैना'कडून नियोजनबध्द विकास होणार असल्याने भविष्यात पनवेल तालुक्याचा पूर्वेकडील भागविमानतळाला साजेसे शहर म्हणून विकसित होईल. विमानतळावरून विमानोड्डाण सुरू झाल्यानंतर मुंबईची मेट्रो सिडकोकडून या प्रकल्पावर अधिक लक्ष केंद्रित होण्याची शक्यता आहे. # सागरी सेतूने पनवेल जोडणार मुंबईशी नवी मुंबईचा भाग असलेल्या पनवेल तालुक्याला एमटीएचएल या आणखी एका महत्त्वपूर्ण प्रकल्पाचा मोठा लाभ होणार आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईपर्यंतचे अंतर अवघ्या १५ ते २० मिनिटांवर येणार आहे. २१.८ किमीचा हा रस्ता देशातील सर्वात मोठा सागरी सेतू असणार आहे.
 
हा प्रकल्पही याच वर्षअखेर सुरू करण्याचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. राज्य सरकारने या सेतूला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृत्यर्थ शिवडी-न्हावा शेवा अटलसेतू असे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. पनवेल तालुक्यातील न्हावाशेवा गावातून सुरू होणारा हा मार्ग उरण जेएनपीटीतील उद्योग व रायगड जिल्ह्याला आर्थिक प्रगतीकडे नेणारा मार्ग ठरणार आहे. शिवाय सिडकोने विकसित केलेल्या उलवे, द्रोणागिरीशीही हा मार्ग जोडला जाईल. इतकेच नव्हे भविष्यात हा मार्ग पेट मुंबई-पुणे महामार्गाशी जोडण्याचे प्रस्तावित आहे. शिवाय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देखील जोडण्याचे नियोजित आहे.
 
  • 'पनवेल चे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ
आंतरराष्ट्रीय विमानतळ संपूर्णपणे पनवेल तालुक्यातील जमिनीवर विकसित होत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे या शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे. विमानतळाशी संबंधित रोजगार संधी वाढणार आहेत. भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊन विमानतळाच्या चारही बाजूंच्या रस्त्यांचा विकास करण्यात आला आहे. सिडको महामंडळाकडून तब्बल एक हजार १६० हेक्टर जमिनीवर हे विमानतळ विकसित केले जात आहे. या विमानतळाच्या पहिल्या टप्प्यातील सर्व कामे पूर्ण झाली आहेत. विमानतळाभोवतीच्या परिसराचे महत्त्व खूप वाढल्याने घर व जमिनींचे दर गगनाला भिडले आहेत.
 
  • पनवेलमध्ये धावणारी नवी मुंबईची मेट्रो
काम सुरू असलेली नवी मुंबई मेट्रो प्रकल्प देखील पनवेल तालुक्यातील नागरिकांना लाभदायी ठरणार आहे. सीबीडी बेलापूर सेक्टर ७ बेलपाडा, सिडको सायन्स पार्क, उत्सव चौक, खारघर सेक्टर ११. खारघर सेक्टर १४, खारघर सेंट्रल पार्क, पेठपाडा, खारपर सेक्टर ३४, पाचनंद आणि पेंधर आदी स्थानकांच्या माध्यमातून परिसरात दळणवळणाची व्यवस्था होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रस्तावित दौन्यादरम्यान या मेट्रोचे उदघाटन होण्याची चर्चा आहे.
 
Powered By Sangraha 9.0