नेट-सेट, पीएचडीधारक प्राध्यापक करताहेत वेठबिगारी !

25 Oct 2023 10:05:29
Education : 
पदवी महाविद्यालयात काम करणाऱ्या प्राध्यापकांची स्थिती वेठबिगारी सारखीच झाली आहे. या प्राध्यापकांना अतिशय तुटपुंजा पगार मिळत आहे. हे सर्व प्राध्यापक पोस्ट ग्रॅज्युएट असून नेटसेटधारक, तर काहींनी पीएच. डी. देखील मिळवली आहे.

नेट-सेट, पीएचडीधारक प्राध्यापक करताहेत वेठबिगारी 
कायमस्वरूपी प्राध्यापक एकीकडे तीन ते चार लाख रुपये पगार घेत असताना तासिका तत्वावरील प्राध्याकांची महिना १५ ते २० हजार बोळवण सुरू आहे. यातील काही प्राध्यापकांनी वेतनवाढीसाठी राज्यपालांसह उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांना निवेदन दिले असून महिना ५० हजार रुपये पगार देण्याची मागणी केली आहे.
 
वडाला येथील डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये प्राध्यापक नेटसेट व पीएचडी धारक आहेत. मात्र हे शिक्षक मागील कित्येक वर्षापासून तामिका तत्वावर तुटपुंजा पगारावर काम करीत आहेत. असे येथील प्राध्यापक डॉ. संजय खैरे यांनी सांगितले. महिना तीन से चार लाख रुपये पगार घेणाच्या प्राध्यापकाना जेवढा अभ्यासक्रम शिकवावा तेवढाच अभ्यासक्रम तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना शिकवावा लागतो. त्यामुळे ही एवढी मोठी आर्थिक विषमता एका कॉलेजमधील प्राध्यापकांच्या पगारात पाहायला मिळते असेही खैरे यांनी स्पष्ट केले.
 
तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना इतर प्राध्यापकांप्रमाणे प्रत्येक महिन्याला पगार मिळत नाही शैक्षणिक वर्ष संपण्याच्या वेळी वर्षभर भरलेल्या तासिकांप्रमाणे पगार दिला जातो. एखादी सुट्टी घेतल्यास तसेच दिवाण आणि उन्हाळी सुट्टीचा पगार इतर प्राध्यापकाप्रमाणे तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना मिळत नाही. या बारा महिन्यांत ३६५ दिवस असून प्राध्यापकांना १९२ दिवसांचा पगार मिळतो. उर्वरित १७२ दिवस सुट्ट्यांचा कालावधी समजून पगार मिळत नाही. त्यामुळे या सुट्टीच्या दिवसात काय खायचे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न प्राध्यापकांना पडला आहे.
 
ऐन दिवाळीत आंदोलनाचा इशारा :
प्राध्यापकांचा तुटपुंजा पगार महिना सात ते आठ हजार आहे आणि तोही प्रत्येक महिन्याला मिळत नसल्यामुळे अनेक प्राध्यापकांची लग्ने जमण्यास अडचणी येतात ज्यांचे विवाह झाले आहेत त्यांच्या घरात आर्थिक समस्येमुळे पत्नी सोडून गेल्याची प्रकरणे घडली आहेत. त्यामुळे तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून महिना पचास हजार रुपये तरी पगार देण्यात यावा. दिवाळीपूर्वी हा निर्णय घ्यावा अन्यथा ऐन आम्हाला रस्त्यावर उतरावे लागले, असा इशारा तासिका तत्वावरील प्राध्यापकांनी दिला आहे.
Powered By Sangraha 9.0