शिर्डी साईबाबा, सिद्धीविनायक, लालबागचा राजा या देवस्थानांत करोडोच्या वर्गणी चे काय होते? : नाना पाटेकर

जनदूत टिम    04-Oct-2023
Total Views |
नाना पाटेकर यांचा ब्लॉग वाचायलाच हवा. ब्लाॅग असा आहे:
  • शिर्डी साईबाबा
प्रत्येक वर्षीचे मिळणारे डोनेशन - ३५० करोड + सोने ३२ करोड, + गुंतवणूक ४२७ करोड.
  • सिद्धीविनायक, मुंबई:
पैसे - २०० करोड , FD : १२५ करोड.
  • लालबागचा राजा:
१८ करोड कमाई फक्त गणपतीच्या १० दिवसातली.

देवस्थानांत करोडोच्या वर्गणी चे काय होते 
गावाकडे दोन रुपये हरवले तर पोराला घेऊन भर उन्हात तो अर्धा दिवस हुडकत बसणारे शेतकरी /मजूर मी स्वतः पाहिलेत अन त्याच मजुरांना देवाच्या दानपेटीत सढळ हाताने 5-10 रुपये टाकतानाही पाहिलंय.
 
फक्त 3 देवस्थानांची वेल्थ हजार करोडच्या आसपास आहे. 12-12 हजारासाठी आत्महत्या करणारे शेतकरी एका बाजूला अन अडीच हजार करोड एकट्या कुंभमेळयाला ‘अलोकेट’ करणारे आमचेच सरकार एका बाजूला.

देवस्थानांत करोडोच्या वर्गणी चे काय होते 
स्वतःची अजिबात परिस्थिती नसूनही देवाला साडी-चोळी-पोषाख करणारे, दान टाकणारे, आजवर देवांच्या दानपेट्या भर-भरून देणारे गरीब शेतकरी स्वतः जेव्हा त्रासून दुर्दैवाने आत्महत्येच्या निर्णयाला पोचतात तेव्हा हिच देवस्थाने आरामात आपला बँकेत ठेवलेल्या FDचे व्याज चाखत बसलेली असतात!!
 
मग ह्या गरीबांना मरताना सुद्धा २ रुपयाची मदत न करणाऱ्या विठ्ठल-तुळजाभवानी-स्वामी समर्थ-सिद्धिविनायक देवस्थानांना मी 'भिकारी' का म्हणू नये?
 
मी पत्रकार नाही, जो विचार मनात जन्मला तो आहे असा Raw स्वरुपात समोर मांडला.
एखाद्या पत्रकार अथवा सच्च्या समाजकारण्याने जर या सगळ्या मंदिरांचा आतापर्यंत फुकट मिळालेला पैसा अन गुंतवणूक बाहेर काढायचं ठरवलं तर जो आकडा समोर येईल तो Digest करायची आपल्या कोणात ताकद आहे का?

देवस्थानांत करोडोच्या वर्गणी चे काय होते 
मुळात एवढा पैसा आला कोठून? पुजारी कामाला गेले होते की मंदिरांच्या विश्वस्तांनी कामाला जाऊन हे करोडो रुपये घाम गाळून कमवून आणले?
 
लोकांचाच पैसा ना हा? मग आता दुष्काळात, गरज असताना लोकांनाच हा पैसा थोडासा मदत म्हणून दिला तर काय फरक पडणार आहे?
 
ही तर फक्त ३ देवस्थानांची नावे होती.
आळंदी- देहू- भीमाशंकर- अष्टविनायक- महालक्ष्मी- सप्तशृंगी- शनी अन शिखर शिंगणापूर-सिद्धेश्वर यांचा आजवरच्या दानपेटीतला पैसा किती असेल???
 
अन छोटी-छोटी तर हजारो मंदिरे आहेत आपल्या देशात, राज्यात. त्यांचे पैसे किती?
मुळात म्हणजे हा पैसा नेमका कोणाचा आहे? देव स्वतःकडे ठेवतो का हा पैसा? कि बाकीचेच लोक वर्षानुवर्षे देवाच्या नावावर हा पैसा हाणतात?
 
दोन मिनिट असं मानलं कि भक्तांची सोय करतात, तर तसंही नाही.
अक्कलकोट, पंढरपूर, गाणगापूरचे, गावातले सोडा नुसते मंदिरा शेजारचेच रस्ते पहा, देवाच्या गावात असूनही तोंडातून आपसूक शिवी निघून जाईल अशी परिस्थिती!
 
माझ्या इथं ओरडण्याने काहीच होणार नाही याची पुरेपूर जाणीव आहे मला.
पण एक दिवस आज जन्मलेल्या या विचाराचा फायदा या पैशांच्या खऱ्या मालकांना, गरीब शेतकऱ्यांना १०० टक्के मिळवून देईन हे मात्र नक्की.
 
- नाना पाटेकर