भिवंडी मध्ये हिंदूंचे ख्रिश्चन धर्मात परिवर्तन करण्याचा प्रयत्न..

05 Oct 2023 10:18:55
Thane : Bhiwandi ; 
देपोली (भवरपाडा)ग्रामपंचायत पिलंझे. ता. भिवंडी येथे पंजाब हरियाणा आणि झारखंड येथून 15 महिला पुरूष ख्रिश्चन मिशनरी आदिवासींचा धर्मांतर करण्यासाठी आले होते.

भिवंडी मध्ये हिंदूंचे ख्रिश्चन धर्मात परिवर्तन करण्याचा प्रयत्न 
तेथील पाड्यातील लोकांना प्रार्थनेला बोलावून रात्री जेवणाचा कार्यक्रम आखला होता. नंतर या सर्व आदिवासी बांधवांचा धर्मांतर होणार होते. ही माहिती मिळताच पिलंझे गावचे पोलीस पाटील हंसराज पाटील आणि आपल्या आदिवासी महिला कार्यकर्त्या विचारपूस करण्यासाठी गेले असता. त्यांना तिथे ख्रिश्चन महिलांकडून उद्धट उत्तरे व धमकी देण्यात आली. आणि नंतर त्यांनी तेथून पळ काढला.
 
बजरंग दल आणि संघाच्या कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक साखरोली गावातील स्वयंसेवकांनी सापला रचून त्यांना साखरोली फाट्यावर पकडण्यात आले. व त्यांच्या बॅग तपासण्यात आल्या. त्यामध्ये बायबल सापडले. पुन्हा चौकशीकेले असता त्या ख्रिश्चन महिलांची उडवा उडवीचे बोलणे चालूच होते. उद्धट बोलणे चालूच होते.
मग आपल्या महिला कार्यकर्त्या सोनीबाई भवर व त्यांच्या सहकारी महिला यांनी त्या सर्व महिला पुरुषांना चप्पलीने चांगलेच झोडपले.
 
व पोलिसांना कळवतात त्यांनी त्वरित येऊन सर्व महिला पुरुष ख्रिश्चन मिशनऱ्यांना ताब्यात घेऊन चांगलीच कारवाई केली व आपल्या सर्व कार्यकर्त्यांना सहकार्य केले.
विशेष म्हणजे या महिला कार्यकर्त्या सोनीबाई भवर वीस वर्षापासून ख्रिश्चन मिशनऱ्यांशी संघर्ष करतात सध्या त्यांचं वय आता ७५ आहे.
 
ही माहिती मिळताच संघ आणि बजरंग दल कार्यकर्ते घटनास्थळी कमी वेळेत जास्त कार्यकर्ते जमा झाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषद, बजरंग दल तेथील गावांमध्ये वर्षानुवर्ष कामं करतात म्हणुन जागरूकता आहे. नाहीतर तेथील आपले आदिवासी बांधव नक्कीच ख्रिश्चन झाले असते.
या वीस वर्षातील ही तेथील दुसरी घटना आहे.
पोलीस यंत्रणा आणि कार्यकर्ते पोलीस पाटील. यांचे आभार.
 
सतर्क राहू. दक्ष राहू.
जय श्री राम.
Powered By Sangraha 9.0