Maharashtra : Palghar
जव्हार ता. पालघर श्री गजानन महाराज कॉलेजसंदर्भात गंभीर तक्रारीची गंभीर दखल घेत राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने या महाविद्यालयाची करून स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल सादर करन्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण विभाग, आयुष आणि महाराष्ट्र राज्य नर्सिंग बोर्ड या तीन विभागाच्या सांचलकांना दिले आहेत.
तपासणीबाबत शंका ;
श्री गजानन महाराज नर्सिंग कॉलेज महाराष्ट्र राज्य नर्सिंग बोटांच्या प्रबंधक छाया लाड यांच्या आप्तस्वकियांचे असल्याचे कॉलेजला क्षमता वाढ परवानगी देताना लाड यांनी पदाचा दुरुपयोग केल्याने शेख यांनी तक्रारीत म्हटले होते.
आताही लाड या पदावर कायम असून, कॉलेजची तीन यंत्रणांकडून होणारी चौकशी निपक्षपाती होण्या एनजीओ नर्सिंग असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. राहुल जवंजाळ यांनी शंका उपस्थित केली आहे. ही चौकशी पूर्ण होईपर्यंत लाड यांना निलंबित किंवा बडतर्फ करावे, अशी मागणीही डॉ. जवंजाळ यांनी केली आहे.
श्री गजानन महाराज नर्सिंग कॉलेजला नियमबाह्य पद्धतीने क्षमता वाढीची परवानगी देण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता. ही परवानगी देताना महाराष्ट्र राज्य नर्सिंग व पॅरामेडिकल शिक्षण मंडळाच्या प्रबंधक छाया लाड यांनी आप्तस्वकियांना फायदा मिळवून देण्यासाठी पदाचा दुरूपयोग केल्याचे शेख अयाज अहमद शेख रियाज (बल्लारपूर, चंद्रपूर) यांनी शासनाकडे केलेल्या तक्रारीत म्हटले होते.
सोबतच ही परवानगी मागताना कॉलेजने कॉटेज हॉस्पिटल शंभरऐवजी २०० खाटांचे दाखवणे, संलग्न रुग्णालय ३० किमी अंतराच्या आत असण्याचा नियम डावलून हे रुग्णालय १०० किमी अंतरावरील दाखवणे, असे प्रकार संस्थेने केल्याचेही तक्रारीत नमूद होते. या तक्रारीनंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी वैद्यकीय शिक्षण आयुक्तांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.
त्या संदर्भात प्रक्रिया सुरू असतानाच आता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या कक्ष अधिकारी यांनी पत्र काढून तक्रारीत दाखल मुद्द्यांच्या अनुषंगाने या कॉलेजची तपासणी करावी आणि स्पष्ट अभिप्रायासह अहवाल तत्काळ सादर करावी, असे आदेश काढल्याने खळबळ उडाली आहे.