मनसेच्या सहकार सेना ठाणे जिल्हा संघटकपदी दिलीप भोपतराव...

09 Nov 2023 15:14:57
Maharashtra : saralgaon ;
मनसेच्या सहकार सेना ठाणे जिल्हा संघटकपदी दिलीप भोपतराव यांची निवड झाल्याने मनसेच्या कार्यकत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

संघटकपदी दिलीप भोपतराव 
 
निवड मनसे नेते दिलीप बापू धोत्रे साहेब यांच्याअध्यक्षतेखाली राजगड येथे झाली असून त्यावेळी मनसे लोकसभा अध्यक्ष शैलेश बिडवीसाहेब,मनसे शहापूरतालुका अध्यक्ष विजयजी भेरे, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष विक्रांत मांजे हे उपस्थित होते 
 
एक परखड विचारांच्या व्यक्तीची निवड या पदावर मनसेने केल्याने सर्वच स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षांव होत आहे. अनेक वर्षे सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणारे नेतृत्व म्हणून त्यांची जनसामान्यांत ओळख आहे. ठाणे जिल्ह्यात मनसेचे विचार पोहोचवण्याचे काम ते अनेक वर्षे करत असल्याने मनसे कार्यकर्त्यांवर त्यांची सामाजिक पकड आहे.
 
ठाणे-पालघर जिल्हा महाराष्ट्रीय वैश्य समाजामध्ये ते अध्यक्ष, विश्वस्त, प्रमुख सल्लागारपदाची जबाबदारी पार पाडत आहेत. तसेच त्यांनी शहापूर येथे वैश्य समाजाचा भव्यदिव्य हॉल उभारणीत मुख्य भूमिका बजावली होती. व्हिजन असलेले काम करणे, सातत्याने मनसे पक्षाच्या कामासाठी तत्पर असणे या गुणांचा पक्षाने विचार करून त्यांची जिल्हा संघटकपदी नेमणूक केली आहे. ही जबाबदारी मी स्वीकारली असून त्याला न्याय देण्यास व पक्षाचा विश्वास संपादन करण्यास कटिबद्ध आहे, अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित संघटक दिलीप भोपतराव यांनी निवडीनंतर दिली.
Powered By Sangraha 9.0