नांदन नांदन होत रमाच नांदन महिलांचे प्रेरणा गीत.

27 May 2023 17:22:44
    नांदन नांदन होत रमाच नांदन,भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण हे आज महिलांचे प्रेरणा गीत झाले आहे.गीतकार प्रकाश पवार यांनी लिहलेल हे गीत आनंद शिंदे यांनी गायलेलं व हर्षद शिंदे यांनी स्वरबद्ध केलेले गीत आज घराघरात आवर्जून वाजत असते.प्रत्येक महिलांच्या तोंडी ह्या दोनतीन ओळी हमखास असतात. घरगुती लग्न सोहळा असो कि जाहीर सभा कोणताही कार्यकम असो त्याठिकाणी हे गीत हमखास लावल्या जाते.ते सर्वांचेच आकर्षण असते.त्याची शब्द रचनाच डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संसाराचे चित्र डोळ्या समोर उभे करते.त्यामुळेच कष्टकरी महिलांना हे गीत कायम प्रेरणादायी असते.या गीताला आज पर्यंत युट्यूबला ११ फेब्रुवारी २०२१ पासून आज पर्यंत ३७ लाख लोकांनी हे गीत लाईक केले आहे.तर ४५ लाख १९ हजार ६९३ लोकांनी ते पहिले आहे.हे गीत आनंद शिंदे यांनी ते गायिल्या मुळेच अजरामर झाले आहे.कडूबाई खरात डी जे च्या तालावर आता युट्युब वर अनेक गायकांनी ते परत परत गाऊन लाखो लोकांना गुणगुणायला व शरीर हलव्याला मजबूर करते.राज्यातील अनेक गायकांनी ते गायिले आहे.सर्व महिला वर्गात ते लोकप्रिय झाले आहे.

DR. 
 
नांदन नांदन होत रमाच नांदन
नांदन नांदन होत रमाच नांदन
भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण
भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण
भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण
नांदन नांदन होत रमाच नांदन
अग नांदन नांदन होत रमाच नांदन
भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण
भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण
भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण
धनी असता मुलखातीरी
पार पाडी कर्तव्य सारी
धनी असता मुलखातीरी
पार पाडी कर्तव्य सारी
पाणी श्रमान शेंदन असं रमाच नांदन
पाणी श्रमान शेंदन असं रमाच नांदन
भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण
भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण
नव्हती गरीबी तीजला नवी
होती परिचित माहेर गावी
नव्हती गरीबी तीजला नवी
होती परिचित माहेर गावी
कंबर कसून बांधन असं रमाच नांदन
कंबर कसून बांधन असं रमाच नांदन
भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण
भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण
कण्या शिजवून सांजेला नटवी
पाणी डोळ्याला लावुन पोर उठली
कण्या शिजवून सांजेला नटवी
पाणी डोळ्याला लावुन पोर उठली
कोंड्या मांड्याच रांदन असं रमाच नांदन
कोंड्या मांड्याच रांदन असं रमाच नांदन
भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण
भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण
होती कष्टाच जीवन जगत
सुख प्रकाश भावी बघत
होती कष्टाच जीवन जगत
सुख प्रकाश भावी बघत
नाव अंतरी गोंदण असं रमाच नांदन
नाव अंतरी गोंदण असं रमाच नांदन
भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण
भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण
नांदन नांदन होत रमाच नांदन
अग नांदन नांदन होत रमाच नांदन
भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण
भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण
भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण
भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण
भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण
 

DR.
 
नांदन नांदन होत रमाच नांदन महिलांचे प्रेरणा गीतामधून कष्टकरी महिलांनी प्रेरणा घेतली आहे.म्हणूनच कष्टकारी महिला नेहमी आपल्या घरातील कर्त्या पुरुषाला सर्वच कामात सतत मदत करीत असतात अशा महिलांचे प्रेरणा स्थान म्हणजे माता रमाई आहेत. माता रमाई बाबत आज प्रयन्त अनेक प्रकारचे लिखाण हे भावनिकच झाले आहे.रमाबाईच्या कष्ट त्यागाला भावनिक केल्या गेले आहे. भिमराव आंबेडकर यांना जी साथ मिळाली ती भावनिक कधीच नव्हती ती पतीच्या कर्तव्य दक्षतेला मना पासुन पत्नीची साथ होती.ती प्रेरणा खेडया पड़यातील व शहरातील झोपड़पट्टीत राहणाऱ्या कार्यकर्त्याच्या पत्नीनी घेतली म्हणुन ते आंबेडकर चळवळीतील प्रत्येक जन आंदोलनात पति पत्नी सहभागी होतात.विशेष ते सर्वच असंघटित कामगार असतात.पण असंघटित कामगार म्हणुन ते कोणतेही आंदोलन करीत नाही.त्याची त्यांना जाणीव नाही.रमाबाई आणि भिमरावचे सर्व नातलग कोणते कामगार होते?.तो इतिहास डोळ्यासमोर ठेवून शिक्षणाला महत्व देऊन संघटीत झाले पाहिजे.
 
रमाबाई बदल जेवढा आदर अडानी असंघटित महिला करतात,तेवढा सुशिक्षित सुरक्षित नोकरी करणाऱ्या आणि सुरक्षित ठिकाणी राहणाऱ्या महिला करत नाही. अशा महिला आपल्या पतीला बिनपगारी कोणतेही काम करू देत नाही.(देत असतील अशा त्या महिलांचे हार्दिक अभिनंदन आणि माफी सुद्धा ) आज प्रयन्तचा इतिहास आणि अनुभवा वरुन हे मी लिहतो. अन्यता आंबेडकर चळवळीत आज जी लेटरहेड वर जागणाऱ्याची जी संख्या आहे.ती राहली नसती.प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे एका महिलाचा हात असतो तसाच एका अपयशस्वी पुरुषा मागे एका महिलांचा हात असतो.मग घराघरत असलेल्या आंबेडकर चळवळीतील गटागटच्या नेत्यांच्या महिलाचे प्रेरणा स्थान कोणते?. नांदन नांदन होत रमाच नांदन,भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण हा आदर्श असू शकत नाही.
 
रमाबाई ह्या बाबासाहेब याच्या प्रत्येक आंदोलनात मनाने सहभागी होत्या पण शरीराने नाही.मुलगा आजारी आहे घरात पैसा अदला नाही.नवरा तिकडे समाजसेवा करतो.असे सहन करणारी महिला आज शोधून सापडणार नाही.त्या आजारात मुलगा मरण पावतो तरी ती महिला विचलीत होवुन नवरया बदल राईचा पर्वत बनवित नाही.परिस्थिती समजुन घेते.याला भावनिक मुद्दा कसा म्हणता येईल?.हा समंजस पणा, दूरदृष्टिपणा होता. त्याला दुरदुष्टी म्हणता येईल.हा संदेश आज महिलांनी घेणे गरजेचा आहे.आज समाज ज्या अवस्थेत आहे त्याच अवस्थेत त्याचे (बाबासाहेबाचे) कुटुंब आहे.त्याकाळी बाबासाहेब आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बदलावी यासाठी शिकत नव्हते तर समाजाची एकूण सर्व परिस्थिती बदलण्या करीता शिकत होते.हे माता रमाबाई समजू शकत होती.आजची एकही माता असा विचार करणारी दिसणार नाही.रमाबाई वर असे प्रसंग किती वेळा आले.संपूर्ण देश बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात होता.पुणे करार हा महात्मा गांधी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर या राजकीय नेत्यांमध्ये २४ सप्टेंबर १९३२ रोजी झाला.त्यापूर्वी गांधी पुण्याला उपोषणाला बसले तेव्हा ते त्यात मरणार अशी परिस्थिती देशभरात निर्माण झाली होत. त्याचा संपूर्ण राग माझ्या समाजावर निघणार याची कल्पना बाबासाहेब यांना होती.पण रमाबाईची मानसिक परिस्थिती काय असेल.घरात आणि बाहेर होणाऱ्या चर्चा पेपरात येणारया बातम्या रमाबाईला अस्वस्थ करीत होत्या. पण काय वर्णन करून ठेवले आल्या थोर विचारवंतांनी??
 
रमाबाईचे पतीनिष्ठ उदाहरण द्रुष्टी समोर ठेवून बाबासाहेब नेहमी जाहीरपणे सांगत असत. स्री हा समाजाचा अलंकार आहे.आपल्या कुटुंबाचे आणि कुळाचा नांव लैकिक स्रियाच्या शिलावरच अवलबून असतो. स्री हि जशी गृहिणी तशी सुसंस्कारित समाज निर्माण करणारी माता ही असते. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैवाहिक जीवनात सुरवात पासून शेवट प्रयन्त रमाबाईनी हाल अपेष्ट,दुख गरिबी यांच्याशी सतत संघर्ष करीत राहिल्या त्यामुळे त्या नेहमी आजारी राहत होत्या पण त्यांनी बाबासाहेबाकडे तक्रार केली नाही.म्हणूनच नांदन नांदन होत रमाच नांदन,भिमाच्या संसारी जस टिपुर चांदण असे वर्णन गीतकार करतात. त्यांचा जन्म कुठे झाल.आईवडील काय करीत होते त्यांच्या दुखाचे वर्णन करण्यापेक्षा त्यांच्या त्याग,कष्टाची नोंद घेतली पाहिजे.तोच आदर्श महिलांनी डोळ्यासमोर ठेवला पाहिजे.रमाबाई भीमराव आंबेडकर यांचा जन्म ७ फेब्रुवारी १८९८,आणि मृत्यू २७ मे १९३५ झाला. रमाबाई ह्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्‍नी होत्या.२७ मे १९३५ ला त्यांचे दुखद निधन झाले. अशा त्यागमूर्ती रमाईच्या ८८ व्या स्मृतिदिना निमित्य त्यांच्या त्याग,कष्टाला कोटी कोटी प्रणाम.
 सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.
 
Powered By Sangraha 9.0