पर्यावरणाची काळजी असेल तर 'ही' एक गोष्ट नक्की करा; बराच फरक पडेल !

15 Jul 2023 13:09:15
ठळक मुद्दे :-
  • लँडफिल करण्यात आलेले प्लास्टिकचे कोणतेही प्रमाण पर्यावरणाला हानीकारक आहे.
  • जर प्लास्टिकचा पुनर्वापर करणे निवडले तर आपण लँडफिलची जागा कमी करू शकतो.
  • प्लॉस्टिकचा पुनर्वापर हे भविष्य आहे, म्हणून आपण याला स्वीकारूया.
पर्यावरणाची काळजी
 
कल्पना करा की, एक कचऱ्याचा ट्रक नदी किंवा समुद्राच्या किनारी थांबला आहे. त्या ट्रकमधील प्लास्टिक कचरा पाण्यात सोडण्यात येत आहे. जसे की, जवळपास आपण दररोज असे काहीतरी करत आहोत? आपण दररोज कमीतकमी 8 दशलक्ष टन प्लास्टिक समुद्रात टाकतो आणि इको सिस्टीमला धक्का देतो. प्रत्यक्षरित्या पाहिले तर आकाशगंगेतील ताऱ्यांपेक्षा आपल्या समुद्रात जास्त मायक्रो प्लास्टिक असल्याचे दिसून येते.
 
भारतीय दरवर्षी सरासरी 11 किलो प्लास्टिक वापरतात, तर अमेरिकन सरासरी दहा पट वापरतात. ते दरवर्षी तब्बल 109 किलो प्लास्टिकचा वापर करतात. मात्र, प्लास्टिक स्वभाविकरित्या वाईट नाही. त्याचे चुकीच्या पद्धतीने विल्हेवाट लावण्याची आपली मूळ समस्या आहे. सर्व प्लास्टिकचा पुनर्वापर केला जाऊ शकतो. परंतु फक्त 60% प्लास्टिक पुनर्वापरासाठी जाते तर उर्वरित 40% लँडफिलमध्ये किंवा खड्ड्यात गाडले जाते. पण, 40% ही कमी टक्केवारी नाही, असे माहितीमध्ये दिसून येते.
लँडफिल करण्यात आलेले प्लास्टिकचे कोणतेही प्रमाण पर्यावरणाला हानीकारक आहे. कचरा गोळा करणे, त्याचे विभाजन करणे आणि पुनर्वापर करण्यात अपयश येणे, हीच खरी समस्या आहे.
 
सर्वांत वाईट म्हणजे 2050पर्यंत जवळपास 12 अब्ज टन प्लास्टिक लँडफिलमध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्लास्टिकचा पुनर्वापर करणे हाच एक उपाय आहे. आपण स्वतः हे लक्षात ठेवण्याची गरज आहे की, बहुतेक प्रकारच्या प्लास्टिकचा पुनर्वापर केला जाऊ शकतो. मात्र, स्टायरोफोम, कचरा पिशव्या, झिप पाऊच, बबल रॅप, अन्नधान्य बॉक्स प्लास्टिक, क्लेअर प्लास्टिक रॅप, बटाटा चिप्स बॅग्ज, काही डिपार्टमेंट स्टोअर प्लास्टिक बॅग्ज, कँडी रॅपर्स, 6-पॅक प्लास्टिक आणि मातीच्या प्लास्टिक बॅग्ज अशा प्रकारच्या प्लास्टिकचा पुनर्वापर केला जाऊ शकत नाही.
 
याचाच अर्थ असा आहे की पॉलिस्टीरिन (कॉम्पॅक्ट डिस्क, प्लॉस्टिक काटे इ.), पॉलीप्रोपोलीन (औषधांसाठी वापरल्या जाणाऱ्या बाटल्या), विनाइल पॅकेजिंग, कमी घनता पॉलिथिलीन (डिस्पोजेबल कप्स) आणि उच्च घनता पॉलिथिलीन (दूधाच्या बाटल्या) अशा प्रकारच्या प्लास्टिकचा पुनर्वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे याचा पुनर्वापर अनिवार्य केला पाहिजे.
 
याचबरोबर, कार्पेट्स, गादी, कपडे आणि शूजसाठी वापरण्यात येणाऱ्या सूत किंवा फॅब्रिक्समध्ये सर्वाधिक जास्त पुनर्वापर प्लास्टिकचा वापर येऊ शकतो. इतर प्लास्टिकचा वापर फर्निचर, स्टोरेज टँकसाठी केला जाऊ शकतो. टाकाऊ प्लास्टिकचे पॉली इंधनात रूपांतर केले जाऊ शकते. केरोसीनसाठी हा एक चांगला पर्याय आहे. याशिवाय, खते, वीजनिर्मिती आणि बिटुमेनमध्ये रस्त्यांचे आयुष्य वाढविण्यासाठी टाकाऊ प्लास्टिकचा वापर केला जाऊ शकतो. खरंतर, सिमेंटच्या भट्ट्या आणि पॉवर प्लान्टमध्ये टाकाऊ प्लास्टिक वापरण्याचे चांगले फायदे आहेत.
 
आपल्या सर्वांना माहीत आहे की, लँडफिलसाठी आपण वेगाने जागा व्यापत आहेत. जर प्लास्टिकचा पुनर्वापर करणे निवडले तर आपण लँडफिलची जागा कमी करू शकतो. पुनर्वापर केलेल्या प्रत्येक एक टन प्लास्टिकसाठी अंदाजे सात यार्ड लँडफिलची जागा राखू किंवा वाचवू शकतो.
 
आपण सोप्या गोष्टी करण्याची प्रतिज्ञा करू...
  • सर्व प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करा. यामध्ये बाटल्यांची झाकणे सुद्धा आहेत. कारण, त्या झाकणांचा ऑटो पार्ट्स, बाइक रॅक, स्टोरेज डब्बे, शिपिंग पॅलेट आणि इतरांमध्ये पुनर्वापर केला जाऊ शकतो.
  • बाटल्यांवर ट्रिगर स्प्रे टॉप लावा.
  • प्लास्टिकच्या बाटल्या व कंटेनर रिकाम्या करा आणि चांगल्या साफ करा.
  • पुनर्वापर करण्यासाठी साफसफाई नंतर आपला प्लास्टिकचा कचरा वेगळा करा.
  • प्रचार करा... मित्र आणि कुटुंबीयांशी बोला; जागरूकता पसरवा आणि पुनर्वापराच्या सवयीसाठी प्रोत्साहित करा.
Powered By Sangraha 9.0