बँक ऑफ इंडिया रायगड विभागाने जिल्ह्यामध्ये कृषि दिन साजरा करत केले २५ कोटींचे कर्ज वाटप...

जनदूत टिम    24-Jul-2023
Total Views |
Raigad ; 
बँक ऑफ इंडिया तर्फे दरवर्षी जुलै महिना किसान माह म्हणून साजरा केला जातो .बँक राष्ट्रीयीकरण दिवसाचे औचित्य साधून१९ जुलै हा दिवस शेतकरी, कष्टकरी यांना समर्पित "किसान दिवस "म्हणून साजरा केला जातो.

बँक ऑफ इंडिया रायगड विभागाने जिल्ह्यामध्ये कृषि दिन साजरा करत केले २५ कोटींचे कर्ज वाटप 
 
या दिवसाचे औचित्य साधून जिल्ह्याची अग्रणी बँक,बँक ऑफ इंडिया रायगड विभाग आणि साकव पेण प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा आमटेम येथे किसान दिवस साजरा करण्यात आला.

बँक ऑफ इंडिया रायगड विभागाने जिल्ह्यामध्ये कृषि दिन साजरा करत केले २५ कोटींचे कर्ज वाटप 
 
यावेळी बँक ऑफ इंडिया चे कार्यकारी संचालक,श्री.एम कार्तिकेयन, श्री.एस के रॉय महाप्रबंधक एन बी जी पश्चिम 1, श्री.मुकेश कुमार विभागीय प्रमुख , श्री.जॉन लोबो, उप विभागीय प्रमुख, ,श्री.विजयकुमार कुलकर्णी जिल्हा अग्रणी प्रबंधक, साकव संस्थेचे उपाध्यक्ष डॉ धुमाळ, सचिव अरुण शिवकर, मंजुळा ताई, लक्ष्मण तांबोळी आमटेम सरपंच आमटेम, परशुराम मोकल सरपंच डोलवी तसेच माविम् चे पदाधिकारी, उमेद चे पदाधिकारी, बँकेचे शाखाधिकरी, साकवचे बचत गटातील महिला, महिला आर्थिक विकास महामंडळ( माविम) महिला, उमेद मधील महीला तसेच सूक्ष्म व लघु उद्योग कर्जचे लाभार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
यावेळी बँक ऑफ इंडिया मार्फत एकूण 25 कोटी रू चे कर्ज वाटप करण्यात आले यामधे बचत गट, किसान क्रेडिट कार्ड,किसान वाहन खरेदी, गृह कर्ज इत्यादी साठी कर्ज वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना कार्यकारी निर्देशक श्री कार्तिकेयन साहेबांनी पाऊस असताना सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल बचत गटातील महिलांचे आणि साकव संस्थेचे विशेष कौतुक केले. यावेळी त्यांनी मार्गदर्शन करतांना सर्व महिलांनी बँकेत स्वतःचे खाते उघडावे आणि प्रधान मंत्री सुरक्षा बिमा योजना, प्रधान मंत्री जीवन ज्योती बीमा योजना, अटल पेन्शन योजना,या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
 
त्याच बरोबर बचत गटातील महिलांना जास्तीत जास्त 20 लाख कर्ज घेऊन वेळेत परतफेड करण्याचे आवाहन केले. तसेच बँक अग्रणी जिल्ह्याची जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडत असल्याने समाधान व्यक्त केले.
श्री.एस के रॉय यांनी मार्गदर्शन करतांना सांगीतले की गेल्या वर्षी बँकने रु.46 कोटी चे कर्ज वाटप फक्त बचत गटांना केले होते आणि यावर्षी 100 कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी माविम आणि उमेदचे विषेश आभार मानले तसेच साकव संस्था बँकेबरोबर जोडल्याने आनंद व्यक्त केला.
 
श्री.मुकेशकुमार यांनी बँक ऑफ इंडिया ग्राहकांच्या बँकेच्या गरजा पुर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
यावेळी साकव संस्थेचे सचिव अरुण शिवकर यांनी बँक ऑफ इंडिया आणि साकव संस्था यांचे खुप जुने नाते असुन आजच्या कार्यक्रमाने आणखीनच घट्ट झाल्याचे सांगितले. तसेच साकव संस्था ही महिलांच्या कर्जाच्या वसुलीसाठी निश्चित पणे बँके बरोबर राहणार असुन एकही बचत गट थकीत राहणार नाही याची खात्री दिली तसेच उरलेले बचत गट सुद्धा क्रेडिट लिंक व्दारे बँकेशी जोडणार असल्याच सांगितले.
 
कार्यक्रमात प्रदीप अप्सुंदे नाबार्ड आणि सागर वाडकर तालुका कृषी अधिकारी यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन बँकेच्या कृषि विभागाचे सुधिर गायकवाड यांनी केले . हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बँकेचे कर्मचारी, अधिकारी, आमटेम चे ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले.