Thane : Bhiwandi ;
भिवंडी तालुक्यातील तलाठी सजा भिनारचे तलाठी श्री. रमेश.आर. सूर्यवंशी यांनी त्यांच्या कार्यालयातच शेतकरी श्री.विनायक गौरू वखारे यांची फाईल फाडून त्यांना शिवीगाळ करून शासनाची दिशाभूल करून एखाद्या उद्योजकाशी जवलीक करण्याचा प्रयत्न केला असल्याचे या त्यांच्या वागण्यावरून समजते.
शेतकऱ्यांनी नियमानुसार ७/१२ मिळावा म्हणून अर्ज केला होता २० दिवस उलटून देखील ७/१२मिळाला नाही म्हणून शेतकरी श्री विनायक गौरू वखारे रा.येवई,ता. भिवंडी जिल्हा ठाणे येथील स्थानिक रहिवासी असल्यामुळे भिनार येथील तलाठी कार्यालयात आपला ७/१२ मिलावा म्हणून गेले होते, व विनंतीपूर्वक आपण दिलेल्या अर्जाविषयी विचारणा केली असता याबाबत उलट तलाठी रमेश सूर्यवंशी यांनी उर्मट भाषा वापरून विनायक वखारे यांना शिवीगाळ करून त्यांच्या हातातील फाईल खेचून घेऊन त्यामधील कागदपत्रे फाडली व ही सर्व कागदपत्रे खोटी आहेत असे सांगितले,
सदर घटनेमुळे विनायक वखारे यांनी ११२ क्रमांक पोलीस आपल्या सेवेसाठी डायल करून पोलिसांना या घटनेबाबत माहिती दिली पोलिसांनी लगेचच आम्ही घटनास्थळी पोहोचतो असे सांगितले हे तलाठ्याने ऐकल्या बरोबर कार्यालयातून पळ काढला, त्यामुळे शेतकरी विनायक वखारे यांनी भिवंडी तालुका पोलीस स्टेशन मध्ये तलाठी रमेश सूर्यवंशी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असुन सदर प्रत माहितीसाठी जिल्हाधिकारी ठाणे उपविभागीय अधिकारी भिवंडी तहसीलदार भिवंडी यांना पाठविण्यात आली आहे.
या घटनेबाबत तलाठ्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही सर्व शेतकरी तहसील कार्यालयासमोर जन आंदोलन करू व या घटनेला जबाबदार तहसील कार्यालयच असेल असा इशारा विनायक वखारे यांनी आपल्या तक्रारी पत्रामध्ये दिला आहे.