India : ISRO ;
चांद्रयान मोहीम यशस्वी झाली. चांद्रयानाने यशस्वी ल्यांडींगही केले. या यानाच्या इंजिन मध्ये लागणाऱ्या Friction Ring हा महत्वाचा पार्ट ज्यांच्या इंजिनियरिंग कारखान्यातून बनवला गेला, ते आहेत मुळचे शहापूरचे उद्योजक श्री.सुरेशजी साने.
सध्या ठाणे येथे वास्तव्यास असलेल्या, शहापूरच्या श्री. सुरेशजी साने यांचा साने ब्रदर्स व एलोरा इंजिनियर्स या नावाने इंजिनियरिंग वर्कशॉप/ कारखाना, माजीवाडा, ठाणे व आसनगाव येथे युनिट आहेत. आसनगाव येथील युनिट श्री.गणेशजी साने हे सांभाळतात. श्री.गणेश साने यांचे वास्तव्य शहापूर येथे आहे.
मागील चांद्रयान मोहिमेतही त्यांनी, यानाच्या इंजिनसाठी याच Friction Ring बनवून दिल्या होत्या.
आज मोहीम यशस्वी झाल्यानंतर, या मोहिमेतील इस्रोच्या टीमने, साने ब्रदर्स यांना विशेष मोबाईल संदेश पाठवून, साने ब्रदर्स यांच्या कौशल्याबद्दल त्यांच्या टीमचे विशेष अभिनंदन करून आभार व्यक्त केले आहेत.
विश्वकर्मा पांचाळ समाजातील, शहापूरचे उद्योजक श्री.सुरेशजी साने व श्री गणेशजी साने यांचा या मोहिमेतील सहभाग हा समस्त शहापुरकरांचा अभिमान आहे. त्यांच्या इंजिनियरिंग कौशल्याचा व कर्तृत्वाचा आम्ही समस्त शहापूरकर सन्मानपूर्वक गौरव करीत आहोत.
🌹🌹🌹🌹🌹
प्रशांत फुले.
भारतीय जनता पार्टी. शहापूर.ठाणे.
श्री पांचाळ समाज मध्यवर्ती मंडळ. मुंबई.
7798736868
🟢🟠
संपर्क:
साने ब्रदर्स.
श्री.सुरेशजी साने. ठाणे.
9930074090
श्री.गणेशजी साने. शहापूर.
9822456774