आश्रम शाळेतील 170 मुलांना जेवणातून विषबाधा !

28 Aug 2023 11:33:36
Maharashtra : सांगली ;
जत तालुक्यातील उमदी येथे समता आश्रम शाळेतील मुलांना विषबाधा होऊन प्रकृती बिघडल्याचा प्रकार रविवारी रात्री घडला आहे. एकाच वेळी 170 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यानं एकच धावपळ उडाली.

आश्रम शाळेतील 170 मुलांना जेवणातून विषबाधा 
 
त्यानंतर रात्रीच्या सुमारास विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांना माडग्याळ येथील ग्रामीण प्राथमिक उपचार केंद्रात दाखल करण्यात आले. तर यातील काही मुलांची प्रकृती अधिक बिघडल्यानं त्यांना सांगली व मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या सर्व मुलांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे.

आश्रम शाळेतील 170 मुलांना जेवणातून विषबाधा 
 
उमदी येथील असणाऱ्या समता आश्रम शाळेत सुमारे 200 हून अधिक विद्यार्थी शिकत आहेत. यामध्ये 5 वर्षांपासून 15 वर्षांपर्यंत मुला-मुलींचा समावेश आहे. नेहमीप्रमाणे रात्री आश्रम शाळेकडून मुलांना जेवण देण्यात आलं. मात्र, रविवारी रात्री देण्यात आलेल्या जेवणानंतर मुलांना एकाच वेळी अचानक उलटी, मळमळ आणि जुलाब सुरू झाले.50हून अधिक मुलांवर उपचार सुरू- एकाच वेळी सुमारे 170 मुलं आणि मुलींना त्रास होऊ लागल्यानं आश्रम शाळा प्रशासनाकडून उपलब्ध असणाऱ्या वाहनातून रात्रीच्या सुमारास माडग्याळ येथील ग्रामीण प्राथमिक उपचार केंद्रात दाखल करण्यात आलं.
 
मात्र, याठिकाणी आरोग्य यंत्रणा अपुरी असल्यानं काही विद्यार्थ्यांना जत येथील ग्रामीण प्राथमिक रुग्णालयात पाठवण्यात आलं. तर सुमारे 50 हून अधिक मुलांची प्रकृती अधिक बिघडल्यानं त्यांना मिरज आणि सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मुलांना जेवण आणि बासुंदी देण्यात होती. त्यातून ही विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र एकाच वेळी 170 मुलांना झालेल्या विषबाधा घटनेनं एकच खळबळ उडली आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आदेश- या प्रकरणाची जिल्हाधिकारी प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. विषबाधा नेमकी कशामुळे झाली याचा तपास करून 24 तासात अहवाल देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी समाज कल्याण विभागाला देण्यात आल्या आहेत.
 
आश्रमशाळांमधून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अन्नाच्या दर्जाबाबत साशंकता व्यक्त होत आहे. भंडारामधील येरली येथे असलेल्या खासगी आदिवासी आश्रमशाळेतील ४१ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना 25 ऑगस्टला घडली होती. या विद्यार्थ्यांना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
  • जतकरांची मदतीसाठी धावाधाव :
रात्री बारा वाजता तालुक्यातील अनेक सोशल मीडिया ग्रुप वर उमदी येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा, असा मेसेज व्हायरल झाला होता. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी याकरिता मदतीची गरज आहे, प्रत्येकाने मदत करावी, असे आवाहन केले. ही घटना समजताच उमदी, माडग्याळ, जतसह पूर्व भागातील कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रत्येकाने पाणी, प्राथमिक उपचारासाठी औषधे, वाहने याची मदत केली आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून जनतेने अत्यंत चांगली मदत केली आहे.
  • असून अडचण, नसून खोळंबा’ माडग्याळ ग्रामीण रुग्णालयाची अवस्था :
घटनास्थळापासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या माडग्याळ ग्रामीण रुग्णालयात विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्य सहाय्यक, औषध निर्माता, कर्मचारी यांचा तुटवडा जाणवला. त्याचबरोबर अपुरी औषधे होती. परिणामी विद्यार्थ्यांना व सामाजिक कार्यकर्त्यांना मदत करताना दमछाक झाली होती. बिकट अवस्थेत ग्रामीण रुग्णातील व्यवस्था ही ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी दिसून आली. यामुळे माडग्याळ ग्रामीण रुग्णालयातील कारभारावर जनतेतून रोष व्यक्त होत आहे.
  • सर्वांची प्रकृती स्थिर, अफवा पसरू नये :
सद्यस्थितीत आश्रम शाळेतील विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. यामुळे कोणीही चिंताजनक असल्याची अफवा पसरवू नये, असे आवाहन संबंधित आरोग्य यंत्रणेने केले आहे. दाखल केलेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी
माडग्याळ ग्रामीण रुग्णालय – ३५,
मिरज – २६,
कवठेमंहकाळ – ४२,
जत -८०
 
Powered By Sangraha 9.0