महाड मध्ये जल जीवन चे निकृष्ट दर्जाची कामे !

28 Aug 2023 12:39:01
Raigad : Mahad ; 
महाड तालुक्यात 134 ग्रामपंचायत असून 188 महसुली गावांसाठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 133 नळ पाणीपुरवठा योजनांची होत असलेली गावनिहाय लाखो रुपयांची कामे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वरदस्थामुळे निकृष्ट व बोगस दर्जाची झाल्याने सन 2024 मध्ये तरी महाड तालुका टँकर मुक्त होण्याची शक्यता धूसर असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहण्यास मिळत आहे.

महाड मध्ये जल जीवन चे निकृष्ट दर्जाची कामे सुरूच
 
राष्ट्रीय जलजीवन मिशन योजनेअंतर्गत प्रतिव्यक्ती 55 लिटर पाणी मिळावे यासाठी सन 2021 -22 पासून या योजनेच्या कामाला सुरुवात झाली महाड तालुक्यात 134 ग्रामपंचायती व 188 महसुली गावे असून शहरी भागाची लोकसंख्या 41 हजार 236 तर ग्रामीण भागाची लोकसंख्या एक लाख 38 हजार 955 आहे तर महाड तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ 796.67 चौरस मीटर आहे

महाड मध्ये जल जीवन चे निकृष्ट दर्जाची कामे सुरूच
 
महाड तालुक्यातील बहुतांशी भागातील गावे दुर्गम व डोंगराळ भागात वसलेली आहेत मात्र जलजीवन मिशन योजनेअंतर्गत कामे करताना मे महिन्याच्या अखेरपर्यंत नळ पाणीपुरवठा योजनेसाठी घेतलेल्या उद्भव विहिरीतील पाणी पुरेल का याची खातरजमा . अंदाजपत्रक बनविणाऱ्या पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने न करता अनेक ठिकाणी ुढार्‍यांच्या सल्ल्याने विहिरी बांधण्याची कामे केली गेली आहेत.
 
कोकणात मार्चपासून शेतीसाठी राब लावणे किंवा जंगलात वनवे लावण्याचे प्रकार वारंवार घडत असतात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेसाठी वापरण्यात आलेले पाईप हे फायबर युक्त प्लास्टिकचे आहेत तसेच ते जमिनीत एक मीटर खोलीवर ट** आवश्यक असतानाही अधिकारी वर्गांच्या दुर्लक्षितपणामुळे अनेक गावात नळ पाणीपुरवठा योजनेची कामे करताना तांत्रिक बाबीची अंमलबजावणी न करताच केली गेली आहेत अनेक गावात या नळ पाणीपुरवठा योजनेसाठी टाकण्यात आलेले पाईप हे जमिनीच्या वर उघड्यावर आलेले दिसत आहेत फायबर युक्त प्लास्टिकचे पाईप हे उन्हाळ्यातील. कोकणातील 45 डिग्रीच्यावर तापमानात असणाऱ्या कोकण प्रदेशात हे चालू शकणार नाहीत असे असताना देखील कंपनीच्या हितासाठी व अधिकारी व ठेकेदार मंडळींना मिळणाऱ्या कमिशन पोटी हे पाईप खरेदी करून वापरण्यात आले आहेत.
 
जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनांसाठी टाकण्यात. फायबर युक्त प्लास्टिकचे पाईप दोन वर्षातच निकामी होतील भविष्यात या प्लास्टिकच्या पायपाला तडे जाऊन ते अनेक ठिकाणी पाण्याच्या प्रेशरने फुटण्याची शक्यता आहे अशावेळी त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न अनेक गावातील ग्रामस्थ प्रशासनाला विचारत आहेत?
 
महाड तालुक्यातील अनेक गावे दुर्गम डोंगराळ भागात असताना वर्षानुवर्ष या गावांना जाणवणारी पाणीटंचाई याबाबत लोकप्रतिनिधींना काही घेणेदेणे पडलेले नाही तीच अवस्था अधिकारी वर्गाची आहे कोणत्याही गावाची नळ पाणीपुरवठा योजना करताना ती नियोजनबद्ध व तांत्रिकदृष्ट केलेलीच नाही केवळ करोडो रुपये खर्च करायचे व आपल्या पदाधिकाऱ्यांना त्याच्यावरती पोट भरण्यासाठी ही योजना असल्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून अनेक गावातील नळ पाणीपुरवठा योजनांची कामे मूळ ठेकेदार ऐवजी उपटेकेदाराकडून करण्यात आली आहेत महाड तालुक्यातील बहुतांशी गावात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण झाल्यानंतर त्याबाबत देखभाल दुरुस्ती कोणी करायची याचा मोठा गहन प्रश्न येत्या काळात महाड तालुक्या सह रायगड जिल्ह्यात निर्माण होणार आहे निकृष्ट दर्जाच्या नळ पाणीपुरवठा योजनांची कामे करणाऱ्या तक्रारदाराला दमदाटी करण्याची देखील प्रकार तालुक्यातील ग्रामीण भागात मे महिन्याच्या सुमारास घडले आहेत तक्रार करून देखील पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे
 
जल जीवन मिशन योजनेअंतर्गत महाड तालुक्यातील मंजूर कामे व त्याची अंदाजीत रक्कम व ठेकेदाराचे नाव पुढील प्रमाणे;
  • कोथुर्डे नळ पाणीपुरवठा योजना86,38,478. राज इंटरप्राईजेस प्रोप्रायटर विजय साळुंखे मुक्काम सारळ तालुका अलिबाग
  • तळोशी नळ पाणीपुरवठा योजना56,41,229. श्रीशैल शंकर आप्पा आरती सरेकर आळी चवदार तळे महाड
  • रावतळी नळ पाणीपुरवठा योजना64,015,48. शैलेश संभाजी पाटील पोयनाड तालुका अलिबाग
  • नागाव नळ पाणीपुरवठा योजना60,33,082. हरीश वालमजी राठोड प्रभात कॉलनी महाड
  • सिंगर कोंड नळ पाणीपुरवठा योजना 23,70,595. शुभम शिवाजी मोरे सद्गुरु पार्क पेण
  • पंधेरी नळ पाणीपुरवठा योजना 47,60,909. तोंडाई कन्स्ट्रक्शन सचिन मस्के करंजखोल महाड
  • राजीवली नळ पाणीपुरवठा योजना 2,20,0474. शुभम शिवाजी मोरे सद्गुरु पार्क तालुका पेण
  • राजेवाडी नळ पाणीपुरवठा योजना 1,48,74,690. बेबन कन्स्ट्रक्शन प्रोप्रायटर नदीम खलील बेबन मुक्काम पोस्ट रामराज तालुका अलिबाग
  • केंद्रोली नळ पाणीपुरवठा योजना 69,87740. शुभम शिवाजी मोरे सद्गुरु पार्क तालुका पेण
  • किये वाडकर पठार नळ पाणीपुरवठा योजना 61,83,508. चक्रपाणी परशुराम म्हात्रे मुक्काम पोस्ट पोयनाड तालुका अलिबाग
  • नडगाव तर्फे पुढील नळ पाणीपुरवठा योजना 3,49,0498. हरीश वालमजी राठोड प्रभात कॉलनी महाड
  • वाळवण खुर्द नळ पाणीपुरवठा योजना 45,97,401. आर एम कन्स्ट्रक्शन प्रोप्रायटर मजहर देशमुख नडगाव तालुका महाड
  • रानवडी नळ पाणीपुरवठा योजना 23,79,993. शैलेश संभाजी पाटील पोयनाड तालुका अलिबाग
  • कांबळे तर्फे महाड नळ पाणीपुरवठा योजना 1,11,74,927. चक्रपाणी परशुराम म्हात्रे मुक्काम पोस्ट पोयनाड तालुका अलिबाग
  • किंजळोली बुद्रुक नळ पाणीपुरवठा योजना 95,88,112. रोहित रवींद्र पाटील शेखाचेगाव नारंगी तालुका अलिबाग
  • टेंभुर्ली नळ पाणीपुरवठा योजना 1,000,20,90. आर एम कन्स्ट्रक्शन प्रोप्रायटर मजहर देशमुख नडगाव पोस्ट नरवण तालुका महाड
  • काचळे नळ पाणीपुरवठा योजना 49,40,424. शैलेश संभाजी पाटील मुक्काम पोस्ट पोयनाड तालुका अलिबाग
  • तळीये नळ पाणीपुरवठा योजना 93,12,348. जयेश मंगेश माळी मुक्काम संत सावळा माळी मार्ग विद्यानगर अलिबाग
  • स्वर्गीय मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजना निजामपूर आदिवासी वाडी, निजामपूर, अमडोशी, शिंदेवाडी, वाघोली आदिवासी वाडी येथील शाळांना मेटॅलिक टॅंक बांधणे 30,043,34. वारी पुंतुस प्रोप्रायटर विजयकुमार आसाराम काकडे मुक्काम वेशवी तालुका अलिबाग
  • स्वर्गीय मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवून योजना अंतर्गत सुतार कोंड, गामेडी, दाभोळ, पायरी कोंड ,मांडले, नेराव, हिरकणी वाडी, तळीय, टेट घर येथील अंगणवाड्यांना मेटॅलिक टॅंक बांधणे 54,078,02. वारी पुंतुस प्रोप्रायटर विजयकुमार आसाराम काकडे मुक्काम वेशवी तालुका अलिबाग
  • चांडवे नळ पाणीपुरवठा योजना 59,61,024. श्रीशैल शंकराप्पा आसंगी मुक्काम शिव समर्थ नगर सरेकर आळी चवदार तळे महाड
  • किंजल घर नळ पाणीपुरवठा योजना 69,28,521. हरीश वालंमजी राठोड प्रभात कॉलनी महाड
  • मुठवली नळ पाणीपुरवठा योजना 32,90,036. वेळ फ्रंट कन्स्ट्रक्शन प्रोप्रायटर शैलेंद्र धांदर फळे मुक्काम विद्यानगर अलिबाग
  • लाडवली नळ पाणीपुरवठा योजना 1,11,60,564. आर एम कन्स्ट्रक्शन प्रोप्रायटर मजहर देशमुख मुक्काम पोस्ट नडगाव तालुका महाड
  • टेमघर नळ पाणीपुरवठा योजना 60,41,578. सोहम कन्स्ट्रक्शन प्रोप्रायटर संजय नारायण तांडेल कासार पट पोस्ट साई तालुका पनवेल
  • अप्पर पुढील नळ पाणीपुरवठा योजना 1,086,95,07. गजराई कंट्रक्शन प्रोप्रायटर दीपक महानुरे मुक्काम साईनगर तालुका माणगाव
  • धामणे नळ पाणीपुरवठा योजना 72,90249. शैलेश शंकराप्पा आरगे मुक्काम सरेकर आळी चवदार तळे महाड
  • बेबलघर नळ पाणीपुरवठा योजना 21,15 693. आर एम कन्स्ट्रक्शन प्रोप्रायटर मजहर देशमुख नडगाव पोस्ट नरवण तालुका महाड
  • कोल नळ पाणीपुरवठा योजना 1,028,94,33. संजय एकनाथ चव्हाण काटे तळी रोड पोलादपूर
  • वडवली नळ पाणीपुरवठा योजना 36,99,172. आर एम कन्स्ट्रक्शन प्रोप्रायटर मजहर देशमुख मुक्काम नडगाव पोस्ट नरवण तालुका महाड
  • पाणी नळ पाणीपुरवठा योजना 24,88,673. के पी कन्स्ट्रक्शन प्रोप्रायटर राजेश नारायण पाटील मुक्काम श्री गाव तालुका अलिबाग
  • कडसरी लिंगाणा नळ पाणीपुरवठा योजना 1,74,38,10. केपी कन्स्ट्रक्शन प्रोप्रायटर राजेश नारायण पाटील मुक्काम श्री गाव तालुका अलिबाग
  • रुपवली नळ पाणीपुरवठा योजना 1,12 ,62634. दत्ता शिवाजी पवार मुक्काम पोस्ट गालसुरे तालुका श्रीवर्धन जिल्हा रायगड
  • भोराव नळ पाणीपुरवठा योजना 32,36,049. आर एम कन्स्ट्रक्शन प्रोप्रायटर मजहर देशमुख मुक्काम नडगाव पोस्ट नरवण तालुका महाड
  • सव नळ पाणीपुरवठा योजना 47,9334,42. हरीश बालाजी राठोड प्रभात कॉलनी महाड
  • दहिवड नळ पाणीपुरवठा योजना 1,33 ,87,211. सोहम कन्स्ट्रक्शन प्रोप्रायटर संजय नारायण तांडेल मुक्काम कासार पोस्ट पोस्ट साई पनवेल
  • मांगरूळ तर्फे देवघर नळ पाणीपुरवठा योजना 94,68,,497 . लौकिक संजय शिंदे पोस्ट मागरूळ तालुका महाड
  • उंदेरी नळ पाणीपुरवठा योजना 22,48,077. सुनील शंकर कारंडे नंदनवन निवास अंबोली अपार्टमेंट महाड
  • वारंगी नळ पाणीपुरवठा योजना 99,16,500. रोहन राजेश टेमकर पोस्ट पोयनाड तालुका अलिबाग
  • फाळकेवाडी नळ पाणीपुरवठा योजना 50,31,643. सह्याद्री कंट्रक्शन प्रोप्रायटर गणी बाबासाहेब धामणकर मुक्काम पोस्ट पोलादपूर
Powered By Sangraha 9.0