ना पोस्टर ना बॅनर, मतदारांना चहाही पाजणार नाही !

30 Sep 2023 10:20:45
Maharashtra:
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत आपण कोणतंही बॅनर किंवा पोस्टर लावणार नसल्याचं सांगितलं आहे. त्यासह नितीन गडकरी यांनी आपण मतदाराला चहाही पाजणार नसल्याचं स्पष्ट केल्यानं हा त्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना घरचा आहेर दिल्याची चर्चा करण्यात येत आहे.

ना पोस्टर ना बॅनर, मतदारांना चहाही पाजणार नाही   
Lok Sabha Election 2024 : आगामी निवडणुकीत आपण कोणतंही बॅनर किंवा पोस्टर लावणार नसल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केलं. आपण लाच घेतली नाही आणि कोणाला लाच घेऊ देणारही नाही. इतकचं काय आपण मतदारांना चहाही पाजणार नाही, असंही मंत्री नितीन गडकरी ( Union Minister Nitin Gadkari ) यांनी जाहीर केल्यानं माठं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडं त्यांच्याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांना धाब्यावर नेऊन चहा पाजा, असं वक्तव्य केल्यानं खळबळ उडाली होती. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा हा पक्षातील नेत्यांना घरचा आहेर असल्याची चर्चा आता रंगली आहे. नितीन गडकरी हे काल रात्री वाशिम इथं बोलत होते.
 
काय म्हणाले नितीन गडकरी : वाशिम इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 3 हजार 655 कोटी रुपयांच्या विकासकामांचा लोकार्पण सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते वाशिममध्ये पार पडला. यावेळी नितीन गडकरी यांनी "आगामी निवडणुकीत मी कोणतंही पोस्टर बॅनर लावणार नाही, कोणतंही लक्ष्मीदर्शन कोणाला करणार नाही. मी कधीही लाच घेतली नाही, कोणाला घेऊही देणार नाही, असं नितीन गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केलं. इतकचं काय आपण कोणालाही चहा पाजणार नसल्याचंही नितीन गडकरींनी जाहीर केल्यानं मोठं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मात्र आपण जनतेची कामं प्रामाणीकपणानं करणार आहे", असं त्यांनी यावेळी सांगितलं.
 
चहा पाजायला धाब्यावर न्या म्हणणाऱ्या नेत्यांना घरचा आहेर : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांना चहा पाजण्यासाठी धाब्यावर न्या, असं आपल्या नेत्यांना बजावलं होतं. त्यामुळे पत्रकार विरोधात बातम्या छापणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या वक्तव्यावर मोठा गदारोळ झाला होता. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपण आगामी निवडणुकीत मतदारांना चहाही पाजणार नसल्याचं वक्तव्य केल्यानं मोठं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या नेत्यांना घरचा आहेर दिल्याची चर्चा आता वाशिममध्ये सुरू आहे.सिंचनावर भर दिल्यास मागासलेपण दूर होईल : वाशिम जिल्हा हा विदर्भातील मागास जिल्हा म्हणून ओळखला जातो. नीती आयोगानं 47 निकषानुसार वाशिम जिल्ह्याला मागास जिल्हा म्हणून घोषित केलं आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यामुळे वाशिम जिल्हा चांगलाच चर्चेत आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सिंचनावर भर दिल्यास मागालेपण दूर होईल, असं विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
 
खराब रस्ता पाहून गडकरी संतापले : वाशिम जिल्ह्यात येताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी खराब रस्ता पाहून चांगलेच संतापले. त्यांनी वाशिम जिल्ह्यात सिमेंटचे दर्जेदार रस्ते बांधून देतो. या सिमेंटच्या रस्त्यावर पुढील 50 वर्षे खड्डे पडणार नाहीत, असंही नितीन गडकरी यांनी यावेळी वाशिम जिल्ह्यात एकही राष्ट्रीय महामार्ग नव्हता, मात्र आता 228 किमीचा राष्ट्रीय महामार्ग करण्यात आला आहे. वाशिम जिल्हा आता राष्ट्रीय महामार्गासोबत जोडला गेल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे.
 
वाशिममध्ये 3655 कोटी रुपयांच्या विकासकामांचं लोकार्पण : वाशिम जिल्ह्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 3655 रुपयांच्या विकासकामांचं लोकार्पण करण्यात आलं. त्यासह 595 कोटी रुपयांच्या कामाचं भूमीपूजनही करण्यात आलं. सरकारला 10 वर्ष पूर्ण होण्याआधी वाशिम जिल्ह्यात 10 हजार रुपयांची कामं झालेली असतील, असंही नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितलं. या कार्यक्रमाला खासदार भावना गवळी, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार राजेंद्र पाटणी, लखन मलिक, अमित झनक, तानाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस आदींसह अनेक दिग्गजांची उपस्थिती होती.
 
Powered By Sangraha 9.0