ठाणे जिल्ह्यातील जेष्ठ आमदार तुतारी हाती घेणार..!!

04 Oct 2024 14:29:59
ठाणे जिल्ह्यातील जेष्ठ आमदार तुतारी हाती घेणार..!!

किसन कथोरे
किसन कथोरे
किसन कथोरे
मुरबाड विधानसभेचे लोकप्रिय.आमदार किसन कथोरे साहेब यांनी आपला स्वाभिमानी बाणा दाखवून भाजाचा राजीनामा देऊन तुतारी हाती घ्यावी..!!
विकासाचे वारे किसन कथोरे असे ब्रीद वाक्य प्रसिद्ध करून आमदार.किसन कथोरे साहेब यांची ओळख सांगितली जाते.तसेच त्यांच्या कार्यकाळाचा अभ्यास करता ते प्रचंड स्वाभिमानी देखील असल्याचे आपल्याला स्पष्ट दिसते.पण भाजप सारख्या पक्षात आमदार किसन कथोरे यांची जी घुसमट सुरू आहे.त्यांना डावळण्याचे उपक्रम सातत्याने सुरू असतात त्यामुळे आमदार किसन कथोरे यांनी भाजप पक्षाला सोडचिठ्ठी द्यावी ही स्थानिक समाज बांधवांची तसेच कार्यकर्त्यांची तीव्र इच्छा देखील आहे.
१) २०१९ मधे विधानसभा अध्यक्ष निवड करतांना अनेक वरिष्ठ मंडळी असताना देखील भाजप ने आमदार किसन कथोरे यांचे फॉर्म भरले होते.अध्यक्ष पद भाजप ला मिळणारच नव्हते हे १०१% खात्री होती म्हणून त्यांनी वरिष्ठ कोणाचे फॉर्म भरून अपमान करण्यापेक्षा किसन कथोरे यांचे फॉर्म भरणे उचित मानले होते.
२) प्रशासनाचा उत्तम अभ्यास असून आणि तीन वेळा आमदार असून सुद्धा आमदार किसन कथोरे साहेब यांना भाजपने मंत्रिपद दीले नाही.
३) भिवंडी लोकसभा उमेदवार साठी आमदार किसन कथोरे साहेबांचा नावाचा साधा विचार देखील व्हावा नाही हे दुर्दैव आहे.
४) भिवंडी लोकसभेत आज किसन कथोरे यांच्या सारखा उमेदवार असता तर आज कदाचित निकाल वेगळा पहायला मिळाला असता.
५) पक्षाच्या इज्जत खातिर बदलापूर प्रकरणात किसन कथोरे यांनी अतिशय चुकीचे वक्तव्य केले होते.जे कार्यकर्त्यांना आवडले नव्हते.पक्षाने असे चुकीचे वक्तव्य करायला लावणे चूक आहे.
६) मुरबाड नगरपंचायत मधे देखील राजकीय हस्तक्षेप केला जातो.निर्णायक ताकद असलेले आमदार असताना सुध्दा साध्या नगरपंचायत मधे १००% जबाबदारी पक्ष आमदार साहेबांकडे देत नाही हे चुकीचे आहे.
७) मुरबाड रेल्वे प्रक्रियेबाबत आमदार किसन कथोरे साहेब यांना खूप लांब ठेवले जात आहे असे एकंदर सद्या दिसते.
८) मुरबाड विधानसभेत १ लाख मते लोकसभेला मिळून सुद्धा वरिष्ठ व्यक्ती कडून आमदार साहेब यांनी काम केले नसल्याचे जाहीर म्हणणे चूक आहे.
९) मुरबाड च्या विकासा साठी जिल्हा नियोजन निधी मार्फत जास्तीत जास्त निधी आमदार साहेब खर्च करत होते.पण पक्षातील च लोक,नेते यांनी तो निधी कमी केला.त्यावरून वाद देखील केले.जे अतिशय चुकीचे आहे.
१०) आताच बदलापूर मीटिंग मधे आमदार किसन कथोरे समर्थक,पदाधिकारी यांना डावलण्यात आले व विधानसभा उमेदवार साठी किसन कथोरे यांना प्राथमिकता देऊ नये असा एकंदर वातावरण बनविले गेले होते अशी चर्चा आहे?
वरील अनेक बाबींचा अभ्यास करता.आमदार.किसन कथोरे साहेब यांना पक्षात विधानसभेत देखील पूर्ण राजकीय स्वतंत्र नाही.निर्णय क्षमता असून देखील त्यांना ती ताकद पक्षाने दिली नसल्याचे पहायला मिळते.पक्षाची आमदार किसन कथोरे यांना क्षमते पेक्षा कमी लेखणे हे अपमानास्पद आहे.
म्हणून आमच्या सारख्या कार्यकर्त्यांचे साहेबांना एकच सांगणे आहे.आपण आपल्याला डावलण्यात येणाऱ्या पक्षात.आपल्या अधिकारांना बाधा आणणाऱ्या पक्षात आपण राहू नये.आपण अपक्ष लढावे किंव्हा कोणत्याही पक्षात जाहीर प्रवेश करावा आम्ही सर्व कार्यकर्ते कायम आपल्या सोबत आहोत.

किसन कथोरे
Powered By Sangraha 9.0