''संघिष्ठ भाजपेयींची "राजकीय गोची"

11 Nov 2024 11:02:06
संघिष्ठ भाजपेयींची "राजकीय गोची"

किसन काथोरे
काळ बदलला की संकल्पना - तत्वही बदलतात, कालचा दृष्ट विचार उद्या सूष्ट बनून समोर येतो. खरं काय आणि खोटं काय? यातला फरकच कळू नये, असाही संभ्रम बऱ्याचदा तयार होतो. "राजकारणी" तत्त्वाचही काहीसं असंच झालं आहे. आजच्या ग्लोबल - कॉर्पोरेट परिभाषेत आपल्या राजकीय निष्ठेतील वैचारिक बांधिलकी जोपासणे, हे सामाजिक मागासलेपणाचा लक्षण समजलं जात आहे. त्यामुळेच सध्य:स्थितीला मुरबाड विधानसभा क्षेत्राच्या परिघात जे घडत आहे, ते कालगतीनुसार समजून घेणं; ही तूर्तास, विचारवंत, नीतीवंत, जातीवंतांची मानसिक गरज बनली आहे. कारण, मुरबाडातील विशेषत: सत्ताधीश संघीष्ठ राजकीय चळवळीची निरोगी वाढ होण्याऐवजी प्राप्त परिस्थितीत तिला सूज ना माज आला आहे... हे गतकाळातील लोकसभा आणि वर्तमानातील विधानसभा निवडणुकीच्या "हाल" चालींवरून अधोरेखित करणार आहे. त्यातच, नव्याने भर घातले ती झारीतल्या शुक्राचार्यांनी!
मंडळी, ज्यावेळेस "प्रमोद हिंदुराव" हे (राष्ट्रवादीचे राज्याचे नेते) २०१९ च्या मुरबाड विधानसभा निवडणुकीत आ. कथोरे यांच्या विरोधातील उमेदवार होते. (भले त्यांना त्यावेळेस काही कारणास्तव 'प्रचार यंत्रणा' राबवता आली नाही.) आणि सुभाषदादांची "पवार सेना" ही कथोरेंच्या रेकॉर्ड ब्रेक मताधिक्क्यासाठी इमाने-इदबारे काम करत होती; तर आता म्हणजे २०२४ च्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत "हिंदुराव" हे आमदार कथोरेंना आपल्या राजकीय कुवतीनुसार साथ - संगत देत आहेत. तर उलटपक्षी पवार बाप-लेक कठोरे यांच्या राजकीय कारकीर्दीची "ईतिश्री" करण्यासाठी शड्डू ठोकून बसलेत, अशी चित्रविचित्र राजकीय संक्रमण अवस्थेतील (म्हसपालट) स्थिती... परिस्थिती... माझ्यासह मुरबाडकरांना अक्रम - चक्रम करणारी आहे.
साहजिकच, या संभ्रमावस्थेतील मुरबाडकरांच्या स्मृतीपटलावरील घोलप तात्यांचे राजकीय "गांधी तत्व" आणि विशे सरांचे "वैचारिक सत्व" ची जागा पाटील - कथोरे या विकोपाला गेलेल्या संघर्षाच्या अदृश्य शक्तींनी कधी घेतली? हे समजण्या - उमजण्या अगोदरच सर्वार्थाने समृद्ध अशा संस्कारीत "मुरबाडी" संस्कृतीला अनपेक्षित अशा संक्रमणातून "बदलापूरी" संस्कृतीने पुरते घेरलं आणि पुढे रामभाऊ पातकर, आशिष गोळे, श्रीकांत चिमोटे, शरद म्हात्रेंच्या प्रशिक्षित अविष्कारी अशा "संघिष्ट बदलापूरी संस्कृती" ला सुरुंग लावत मुरबाडी... सुहास मोरे, सुरेश बांगर व्हाया मनोज देसले (मोरे - पदावलीत कायम राहण्यासाठी नीतिमत्तेची मुंडी मुस्कटून आपलं बांधावरचे आयुष्य बारमाई शेतातलं करण्यात माहीर असणारे...) बांगर - काल - परवा देवदर्शन पासून मुरबाड बस स्थानकांपर्यंत हातात दीड भाकरीचा डबा घेऊन कळव्याला वेळेत पोहोचण्यासाठी आपलं धावपळीचा आयुष्य पुढे कथोरे गटाच्या पाठबळावर आणि ठेकेदारीतील चोऱ्या - लबाड्यांच्या जोरावर आता लब्धप्रतिश्ठीतांच्या यादीत नेऊन ठेवणार...) मनोज देसले - यांची कारकीर्द आणि लाईफस्टाईल तर माझ्यासारख्यांच्या मेंदूच्या पटलावरून उतू जायला लावणारी...) अनपेक्षित अशा राजकीय संक्रमणातून नव्याने रुजू झालेल्या बदलापूर संस्कृतीने पूर्त घेतलं किंबहुना गिलंकृत केलं आहे.
त्यामुळे, वर्तमानातील हा फालतू श्रेयवादावर आधारलेला आणि स्व:अस्तित्वालाच घातक ठरणारा सत्ता संघर्षातील अघटीतपणा... निर्धोक आणि उज्वल राजकीय भविष्यासाठी मारक ठरण्याची नांदी ठरत आहे. किंबहुना "माजी" म्हणून उर्वरित आयुष्य व्यथित करणं, हे कल्पनेच्या बाहेरच आहे आणि ह्या भीती आणि धास्तीतील भाकीत वर्तवण्यासाठी आता राजकीय भविष्यवेत्त्याची गरज भासणार नाही. अगदी सहजगत्या प्रस्तुत चालूगिरीच्या प्रवाहित घडामोडींच्या आधारावर माझ्यासारख्या शब्दपुजाऱ्यालाही याबाबत स्वयंस्पष्ट निष्कर्ष काढता येणे दुरापास्त वाटत नाही.
तूर्तास, अस्थिर आणि बेभरवशाच्या तथाकथित अशा विकासाच्या वाऱ्या - वादळाची प्राप्त स्थिती... परिस्थिती... आणि मन:स्थितीला... "पेराल तेच उगवते" या निसर्गाच्या कालचक्रानुसार अनिष्टतेच्या संसर्गाने घेरला आहे. जी वरवर सुदृढ वाटत असणारी वृत्ती- प्रवृत्ती आता अंतर बाह्य रूपाने कर्म- नीतीच्या आधारावर बिघडू लागली आहे. अर्थात आता "शरण जाणं" अपरिहार्यच आहे. कारण, बदललेल्या विशेषत्वाने सत्तासुंदरीचा उपभोग घेण्याच्या पद्धती आणि क्षणोक्षणी जटील गुंतागुंतीचे बनलेले काटेरी आणि जीवघेण्या मार्गांच्या नव्या कल्पना... नव्या व्याख्या... तयार करताना तूर्तास, "मुरबाडकर" दचकत असले तरी जे होतंय त्यात सामान्य कार्यकर्त्यांसह दिखाऊ आणि विकाऊ चमच्यांच्या हिताचं काहीच नसणार आहे, हे मात्र नक्की!
एकूणच काय तर, "मतदार राजा सर्वश्रेष्ठ असतो आणि बोटाला शाही लावून तो जी क्रांती करतो, त्याला तोड नसते." याच मानसिकतेतून मुरबाडी राजकारणातील संकुचित... आत्मकेंद्री... प्रलोभनवादी... एकाधिकारशाही... विचारधारा जोपासणारी मानसिकता संपविण्यासाठी... एक प्रामाणिक, आत्मनिर्भर बनविणारा संपूर्ण परिवर्तनाचा यशस्वी प्रयत्न - प्रयोग "फाट्यावरून आणि काट्यावरून" आपल्या मुरबाडमध्ये होतोय, ही एक समाधानकारक बाब असून त्याद्वारे खऱ्या अर्थाने "अच्छे दिन" येण्याची सु - लक्षणे दिसत आहेत.
 
उचलेगिरी एस. एल. पाटील 
 
 
Powered By Sangraha 9.0