राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, (SCERT) महाराष्ट्र, पुणे तर्फे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून सुनील म्हसकर यांची निवड

02 Dec 2024 10:24:43
 
sunil
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, (SCERT) महाराष्ट्र, पुणे तर्फे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून सुनील म्हसकर यांची निवड…
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT),महाराष्ट्र, पुणे तर्फे शालेय शिक्षण स्तरावर अभ्यासक्रम व पाठ्यक्रम निर्मिती अभ्यासगट विकसन विभाग समितीवर सुनील म्हसकर सर यांची मराठी विषय तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून राज्यातून निवड करण्यात आलेली असून संपूर्ण ठाणे जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब आहे.
सुनील म्हसकर सर हे शेतकरी उन्नती मंडळ काल्हेर संचलित सिताराम रामा पाटील विद्यालय व रामदास दुंदा केणे कनिष्ठ महाविद्यालय, आमणे ता. भिवंडी येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
सुनील म्हसकर हे एक उपक्रमशील असे हाडाचे शिक्षक असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ते नेहमी झोकून काम करत असतात. शिक्षणक्षेत्रात त्यांचा २७ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे.त्यांची प्रज्ञावंत साहित्यिक व निष्काम सेवाव्रती म्हणूनही विशेष ओळख असून ते शारदासुत या टोपणनावाने साहित्य लेखन करतात. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक व साहित्यिक कार्याची विशेष ख्याती असून आजतागायत त्यांस दोनशेहून अधिक सन्मान व पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. मराठी विषय तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून राज्यातून निवड झाल्याबाबत सुनील म्हसकर सर म्हणाले की, “सर्वप्रथम मला ही सुवर्णसंधी देऊ केली त्याबाबत मी माननीय संचालक, SCERT पुणे यांचे आणि शेतकरी उन्नती मंडळ काल्हेर, ता.भिवंडी या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय राजू पाटील साहेब यांचे विशेष आभार व्यक्त करतो. माझी निवड झाल्याबाबत मला अत्यंत आनंद झाला असून शासनाने मला दिलेली जबाबदारी मी अधिक उत्तम प्रकारे पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल.”
सुनील म्हसकर सर यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0