आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात आत्मविष्कार २०२४ वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

28 Dec 2024 10:06:59
आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात आत्मविष्कार २०२४ वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

jangli
शहापूर- शहापूर तालुक्यातील मोहिली -अघई येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट (कोकमठाण) संचलित आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलीच्या कृपा आशीर्वादाने व संत परिवारच्या प्रेरणेतून समस्त विश्वस्त मंडळ यांच्या मार्गदर्शनाने आत्मा मालीक इंटरनॅशनल स्कूल व आत्मा मालिक इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या दोन्ही स्कूलचा आत्मविष्कार २०२४ वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक २५,२६ रोजी अत्यंत उत्सहात पार पडले.आत्मविष्कार वार्षिक स्नेहसंमेलनात विध्यार्थी सहभाग घेतला. देव - देवता, संत , महापुरुष देशभक्त या आत्म रूपांचे जगत कल्याणासाठी व स्वरूपाची ओळख करून देणारे आविष्कार विद्यार्थ्यांनी सादर केले.यावेळी प्रमुख उपस्थिती प्रमुख उपस्थिती संकुलातील संत भारत माता, व संत परिवार, माननीय श्री रविजी नाईक साहेब जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी,संस्थेचे सरचिटणीस तथा पुरणगाव शाखेचे अध्यक्ष श्री. हणमंतराव भोंगळेसाहेब, विश्वस्त प्रकाश भारखंडे,विश्वस्त माननीय श्री प्रकाश भट साहेब, संकुलाचे कार्याध्यक्ष तथा विश्वस्त माननीय श्री उमेश जाधव साहेब शहापूर प्रकल्प अधिकारी श्री. राजेंद्र हिवाळेसाहेब, सहाय्यक प्रकल्प अधिकारी दिवाकर काळपांडे साहेब, गट विकास अधिकारी श्री. भाऊसाहेब चव्हाणसाहेब, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. हिराजी वेखंडेसाहेब, शिक्षण विस्तार अधिकारी शिवानी पवार मँडम, ठाणे जिल्हा स्काऊट अँड गाईड संघटक किरण लहाने, ह.ब.प.चिंतामणजी गोधडे महाराज, अंभई शाखेचे अध्यक्ष अभिजित पाटील, आटगावचे प्रसिद्ध उद्योजक अरुण शेलार, पुरणगावचे योगानंद महाराज, माजी आमदार पांडुरंग बरोरा साहेब ,संजय निमसे, मोहिली उपसरपंच निशिगंधा बोंबे,अघईचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दर्शन दळवी, स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य अनंतकाका गायकवाड, प्रवीणतात्या मोरे व भरत सलगर संकुलाचे जनरल व्यवस्थापक श्री उल्हास पाटील , सेवा व जनसंपर्क व्यवस्थापक श्री गुलाब हिरे, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी डी शिंदे, आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य श्री कैलास थोरात, उपप्राचार्या सौ. दीपाली खांडगे, आत्मा मालिक इंग्लीश मिडीयम स्कूलचे प्राचार्य पंकज बडगुजर , सोनी पाशा , शारदा इंग्लीश मिडीयम स्कूल चे प्राचार्य श्री प्रशांत जाधव आदी मान्यवरांना संतप्रसाद देऊन सत्कार करण्यात आला
यावेळी विद्यार्थानी परमपूज्य सद्गुरू विश्वात्मक माऊलींच्या जीवनावर आधारित काही अभिनय गीते, देवी - देवतांची गीते , छञपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, गौतम बुद्ध, गुरुनानक ,संत कबीर,महात्मा गांधी, मंगल पांडे यांचे कार्य,वारकरी परंपरा, मुलींवरील अत्याचार, स्त्रीशिक्षण, सोशल मीडिया व्यसनमुक्ती देशभक्तीपर गीत, योगनृत्य व तारपानृत्य ,सांस्कृतीक नृत्य सादर करत उपस्थीताची मने जिंकली . विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नामांकित विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.याकार्यक्रमात संगीत विभाग स्वरांजली , सुयोग खंडागळे, समाधान काटे ,एकनाथ गोधडे ,समाधान चव्हाण यांनी संगीत आणि गीते सादर केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन साबळे, दिपाली खांडगे,सोनी पाशा ,सोमनाथ कांबळे तर आभारप्रदर्शन प्रा. उल्हास पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संकुलातील संस्थेचे पदाधिकारी शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.
संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी साहेब व समस्त विश्वस्त मंडळ स्थानिक व्यवस्थापन समितीचे कार्याध्यक्ष तथा विश्वस्त उमेश जाधव साहेब यांनी समस्त भाविक व शिक्षक वृंद यांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
Powered By Sangraha 9.0