मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातच ठाणेकर अग्निसुरक्षा पासून असुरक्षित !!

01 Feb 2024 18:50:40
Maharashtra : Thane ;
 
 
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातच ठाणेकर अग्निसुरक्षा पासून असुरक्षित !!
 
 
ठाणे महापालिका प्रशासनाकडून 26 लाख ठाणेकरांच्या जीवितास धोका ठामपा अग्निशामन विभागाला 835 कर्मचाऱ्यांची गरज असताना 209 कर्मचाऱ्यांवर चालवला जातोय अग्निशामन विभागाचा कारभार त्यात ठाणे शहरात अग्निशमन व शहर विभाग 50 माळ्याच्या पुढे देत आहे मोठमोठ्या प्रकल्पांना मंजुरी पण अग्निशामन सुरक्षिततेबाबत नागरिकांन पुढे प्रश्नचिन्ह ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलात, कर्मचाऱ्यांच्या तुटवड्यामुळे, ठाणेकर नागरिकांची अग्निसुरक्षा धोक्यात आली आहे. यामुळे करदात्या-कष्टकरी ठाणेकर नागरिकांची अग्निसुरक्षा धोक्यात आली आहे. यासंदर्भात, माहितीच्या अधिकारात मिळालेली माहिती अशी आहे की, ठामपाच्या अग्निशमन दलाला एकूण ८३५ कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना, अग्निशमन दलाचा कारभार अवघ्या २०९ कर्मचाऱ्यांवर चालवला जात असल्याची माहिती उघड झाली आहे.
 
eknat shinde sabheb
 
ठाणे महानगरपालिका परिक्षेत्रात, एकूण ८ फायर स्टेशन्स आणि ४ बिट फायर स्टेशन्स आहेत. त्यापैकी, अग्निशमन केंद्र अधिकाऱ्यांच्या ७ जागा तर, सहाय्यक केंद्र अधिकाऱ्यांच्या सुमारे ५० जागा रिक्त आहेत. चालक/यंत्रचालकांच्या २२४ पैकी १९४ जागा रिक्त असून, फायरमन्सच्या ४५० जागांपैकी, तब्बल ३५० जागा रिक्त असल्याची धक्कादायक माहिती उघड झालेली आहे. परिणामी, अवघ्या २०९ अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांवर ठाणे शहराची सुरक्षा अवलंबून आहे. ही बाब, मुख्यमंत्री महोदयांच्या ठाणे शहरासाठी भूषणावह तर नाहीच, उलट ती लाजिरवाणी आहे. एकीकडे ठाणे शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे सुरु असताना, दुसरीकडे ठाणेकरांचे जीवनमान मात्र, धोकादायक बनले आहे. मुंबईचे धाकटे भावंडं अशी ओळख असलेल्या ठाणे शहराची लोकसंख्या, गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढलेली आहे. मोठ्याप्रमाणात निर्माण झालेल्या निवासी-संकुलांमुळे, त्याचा ताण प्रशासकीय व्यवस्थेवर पडल्याने, आज घोडबंदरसारख्या उच्चभ्रूंच्या परिसरात, पाणीटंचाईसारखी भीषण समस्या भेडसावत आहे. त्यातच ५०/५० माजली उंच इमारती उभारलेल्या असल्याने, अग्निशमन दलात कर्मचाऱ्यांचा तुडवड्यामुळे, अवघ्या ठाणेकर नागरिकांची सुरक्षा अधांतरी आहे. ठाणे महानगरपालिका प्रशासनाकडून गगनचुंबी इमारतींना परवानगी देताना, अग्निसुरक्षेबाबत मात्र, प्रश्नचिह्न निर्माण झाले आहे, याची आपण गांभीर्याने नोंद घ्यावी. दुर्दैवाची बाब म्हणजे, महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब हे, ठाणे शहराचे सुपुत्र असताना आणि त्यांचा मतदारसंघ याच ठाणे शहरात असतानाही, त्यांच्याच ठाणे शहरातील सर्वसामान्य नागरिक अग्निसुरक्षेपासून वंचित राहत आहेत. या संपूर्ण पार्श्वभूमीवर, दुर्दैवाने ठाणे शहरात अग्निप्रलयाची एखादी दुर्घटना घडली आणि कर्मचाऱ्यांच्या तुटवड्यामुळे जीवितहानी झाली तर, त्याला सर्वस्वी ठाणे महापालिका प्रशासन, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून आपण स्वतः आणि महाराष्ट्राचे 'ठाणेकर' मुख्यमंत्री महोदय हेच जबाबदार असतील, याची आपण नोंद घ्यावी.

Thane mahanagar palika
 
ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलात, कर्मचाऱ्यांचा मोठ्याप्रमाणात तुटवडा निर्माण झाल्याची माहिती, माहितीच्या अधिकाराखाली उघड झाली असून, 'धर्मराज्य पक्षा'च्या वतीने अभिजीत बांगर
आयुक्त : ठाणे महानगरपालिका, ठाणे.
यांस... महेशसिंग ठाकूर,
उपाध्यक्ष : धर्मराज्य पक्ष, ठाणे लोकसभा यांनी निवेदनाद्वारे सूचित केले आहे.
Powered By Sangraha 9.0