अवकाळी पावसाचा पहिलाच फटका महाड आगाराला बसला..

16 May 2024 18:12:58
पहिल्याच पावसात महाड एसटी स्टॅन्डला तळ्याचे साम्राज्य
 
 
महाड मिलिंद माने) अवकाळी पावसाचा पहिलाच फटका महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या महाड आगाराला बसला असून पहिल्याच पावसात महाड आगाराला तळ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे तर पहिल्याच पावसात अशी अवस्था असेल तर सात जून नंतर होणाऱ्या पावसात महाड एसटी स्टँड जन्म होण्याची शक्यता प्रवाशांकडून वर्तवली जात आहे.
 
महाड आगार
 
रायगड जिल्ह्यातील महाडे मध्यवर्ती आगार असून कोकणात जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसेस महाड आगारात येतात या ठिकाणी एसटीला लागणारे इंधन तसेच प्रवाशांना चहापाण्याची व्यवस्थेसाठी व व प्रवासातला काही वेळ क्षीण उतरण्यासाठी लोक चहा घेण्यासाठी म्हणून महाड आगारात येतात मात्र महाड आगारातील एसटी कॅन्टीन अनेक दिवसांपासून बंद आहे तर महाआगारातील रस्त्याचे डांबरीकरण न झाल्याने व जागोजागी खड्डे पडल्याने पावसाळ्यात त्याचा त्रास प्रवाशांना होणार आहे याची झलक आज झालेल्या अवकाळी पावसाच्या अर्ध्या तासातच पाहण्यास मिळाली.
 
महाड आगार
 
महाड आगारातील लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या थांब्यांसाठी असणाऱ्या प्रवासी शेडमध्ये जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावर पावसाचे पाणी पूर्णपणे तुंबले होते तर महाड आगारातील कार्यशाळेत जाणाऱ्या रस्त्यावर देखील पाणी तुंबल्याने एसटी बसेस त्या पाण्यातूनच मार्गक्रमण करीत होत्या तर अनेक बसेस पावसाच्या पाण्यातच उभे राहिल्याने त्या पाण्यातून प्रवाशांना बसेस मध्ये प्रवेश घ्यावा लागत होता याबद्दल अनेक प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या गैरकारभाराबाबत शिव्यांची लाखोली वाहिली व मनस्ताप व्यक्त केला जर अवकाळी पडलेल्या पावसामध्ये ही अवस्था असेल तर सात जून नंतर चालू होणाऱ्या पावसामध्ये एसटी महामंडळाच्या बस आगाराची काय अवस्था होईल याची कल्पना न केलेलीच बरी असे उद्गार अनेक प्रवाशांच्या तोंडून ऐकण्यास मिळाले याबाबत एसटी महामंडळाच्या आगार व्यवस्थापकांशी संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
Powered By Sangraha 9.0