सत्ताधारी पक्षातून स्वाभिमानी पक्षाकडे वाटचाल करणारा नेता - उन्मेष पाटील
पथराड ता. धरणगाव जि. जळगाव
मागील काही वर्षात महाराष्ट्राचे राजकारण अत्यंत गलिच्छ झालेलं दिसत आहे. " सत्ता म्हणजे सर्वकाही" हेच वाक्य काही नेतेमंडळीच्या डोक्यात शिरलेले आहे. सत्तेसाठी काही पण करण्यासाठी ते तत्पर आहेत. जळगाव लोकसभा मतदार संघात मात्र सत्तेलाच झुगारून स्वाभिमान बाणाचा स्वीकार करणारे माजी खासदार उन्मेष पाटील हे नाव काही दिवसापासून खूप चर्चेत आले. सलग तीन ते चार दिवस प्रसार माध्यमात त्यांचेच नाव होते. त्यांनी राजकारणाला एक वेगळच वळण देण्याची भाषा मतदारसंघातील जनता करत आहे. विरोधी पक्षातील नेते तसेच अगोदर जनतेलाही हाच प्रश्न होता, की उन्मेष दादांचं जळगाव लोकसभेचे तिकीट कापलं म्हणून ते वेगळ्या पक्षाची वाट पकडत आहेत.
शिवसेना ठाकरे गटाच्या पक्ष प्रवेशाच्या दिवशी ही सर्वांना वाटलं होत की, उन्मेष पाटील आता महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदारसंघातून ते उमेदवार असतील. सगळीकडे चर्चाही होत्या. पण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवार म्हणून उन्मेष पाटील यांचे मित्र करण पवार( पाटील ) यांच्या नावाची घोषणा करून सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला. एक मित्र राजकारणातही काय उदाहरण देऊ शकतो. हे त्या दिवशी सिद्ध झालं. त्यानंतर करण पवारांनी ही पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना एक मित्र काय असतो ? त्याचप्रमाणे तो स्वतःचे राजकीय आयुष्य ही बहाल करू शकतो. हे त्यांनी सांगितले. उन्मेष पाटलांना सत्ताधारी पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून त्यांना उमेदवारीच तसेच शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून ही अलगद त्यांना तिकीट ही मिळालं असतं. पण सत्तेसाठी स्वार्थी विचार त्यांनी केलाच नाही. व सत्तेपेक्षा स्वाभिमानाला त्यांनी महत्व दिले. आजची राजकीय परिस्थिती अशी आहे, की सत्तेसाठी कुटुंब वेगळे होत आहे. पण असे असतानाही रक्ताचा नसला तरी जीवाला जीव देणाऱ्या मित्रासाठी उन्मेष पाटलांनी करण पवार यांना पुढे केले.
पहिल्याच टर्म मध्ये आमदार व खासदार निवडून येणारे उन्मेष पाटील हे जनतेसाठी नेहमी तत्पर असतात. म्हणून जनतेच प्रेम त्यांना नेहमी लाभत असते. मतदारसंघात विविध कामे, विविध प्रकल्प राबवून, मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून जनतेमध्ये एक स्वतःच आदर्श असे स्थान निर्माण केले. काही दिवसापासून महाराष्ट्राचे राजकारण अत्यंत गलिच्छ झालेलं होत. पण तरी या उदाहरणामुळे काही प्रमाणात का होईना ? राजकारणाला एक वेगळी दिशा मिळेल.
ऋषीकेश पाटील.