अभी नही तो कभी नही,जातीसाठी माती खा या भावनिक सादेने अपक्ष उमेदवार सामाजिक स्वास्थ बिघडविण्यास कारणीभुत ठरतोय का?

20 May 2024 10:58:29
 
देशात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आणि अनेकांना खासदारकीचे डोहाळे लागायला सुरुवात झाली. मग दिलेले दान,केलेले काम,त्यांचे फोटो,केलेली मदत,उपचार यांचे भांडवल करून मीच कसा भारी आहे,किती मोठा समाजसेवक आहे,असा समाजसेवेचा फुगवलेला फुगा घेऊन अपक्ष उमेदवार निलेश सांबरे आधी भाजपा मग राष्ट्रवादी काँग्रेस,मग वंचित यांचे तिकिटासाठी उंबरठे झिजवू लागले आणि सरते शेवटी दोन फॉर्म काँग्रेसचे, एक त्यांच्या जिजाऊ पार्टीचा फॉर्म आणि अपक्ष असा त्यांचा प्रवास सुरू झाला.जो आता जातीसाठी माती खा या कुणबी समाजाला भावनिक सादे पर्यंत येऊन पोहोचलेला आहे.या मतदारसंघात भाजपचे कपिल पाटील हे गेल्या दहा वर्षापासून केंद्रीय मंत्री म्हणून सत्ता भोगीत आहेत.परंतु खासदार म्हणून अत्यंत अपयशी असलेल्या मतदारसंघात महाविकास आघाडी साठी अतिशय पोषक वातावरण होते.जागा वाटपामध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सुटली आणि सुरेश बाळ्यामामा म्हात्रे यांना उमेदवारी गेली
 
nilesh sambahre
 
बाळ्या मामा म्हणजे सामान्य माणसाचा आधार.करोना काळात केलेली मदत किंवा अन्य ठिकाणी केलेली मदत या मदतीचे भांडवल ते करीत नाहीत म्हणून जनमानसात मामांचा एक वेगळा आदर आहे.परंतु कुणबी समाज ह्या बहुसंख्य असलेल्याा मतदार संघात निलेश सांबरे यांनी अपक्ष फॉर्म भरून जातिवादाचे कार्ड पुढे केलेले दिसते. मागच्या दोन निवडणुकांचा इतिहास पाहता कुणबी नेते विश्वनाथ पाटील यांनी दोन वेळा हेच जातीचे कार्ड वापरण्याचा प्रयत्न केला,परंतु यश तर आलेच नाहीत उलट समाज विखुरला जाऊन सामाजिक स्वास्थ तर बिघडले ना समाजाची प्रगती झाली ना,प्रबोधन झाले उलट या सर्वा पासून समाज अधिक लांब गेला.कुणबी समाजाचे वैशिष्ट्य पाहता जातीय राजकारणाने पेटून उठणारा हा समाज आहे.परंतु या जातीय राजकारणाचा समाजाला कायम फटकाच बसला आहे.स्वतःच्या तुंबड्या भरणे आणि स्वार्थासाठी कुणबी मतदारांचा वापर केला जातो हा आज वरचा इतिहास आहेआणि विद्यमान निलेश सांबरे हाच किताब परत गिरवीत आहेत.प्रत्येक पक्षाने यांना तिकीट का नाकारले हे देखील पाहिले पाहिजे,यांचे समाजसेवा एवढेच चांगली आहे तर यांनी काँग्रेसचे फार्म का भरले हे देखील तपासले पाहिजे.परंतु आता कुठेच डाळ शिजत नाही म्हणून कुणबी कुणबी फॅक्टर करून समाजाची दिशाभूल निलेश सांबरे करीत आहेत.
 
समाजामध्ये जातिवादी वातावरण पेटवून त्यावर स्वतःची पोळी भाजण्याचे काम त्यांनी चालवले आहे .जे निलेश सांबरे समाजात काम करणारे अनेक संघटना आहेत.त्या संघटनांकडे कधी फिरकले देखील नाही.सांबरे हे मूळचे ठेकेदार आहेत,आणि एक ठेकेदार म्हणून ठाणे आणि पालघर जिल्ह्यात ते अतिशय अपयशी ठेकेदार आहेत. आपले अपयश लपवण्यासाठी त्यांनी अनेक कंपन्यांच्या सी.एस.आर.फंड शासनाच्या विविध योजनां मधून जी काय समाजसेवा ते दाखवीत आहेत ती केली आणि त्या बदल्यात ते समाजाकडून मत मागत आहेत.लोकसभा निवडणूक म्हणजे संसदेत आपल्या मतदार संघाचा प्रतिनिधित्व करणाऱ्या मतदार संघाचा प्रथम नागरिक असतो.तो नागरिक हा सर्व जाती धर्म पंथाचा असतो.कुण्या एका जातीचा नसतो.सामान्य माणसाच्या जीवनाशी निगडित असलेले कायदे धोरण यावर तो बोलणार असतो.परंतु सांबरे यांचा आता जातीवादी प्रचार करू पाहतात.अन्य जातींचा अनादर करताना दिसत आहेत,कुणबी समाजातील नवतरुण मंडळीला प्रबोधनाचे दिशा देण्याचे धडे देण्याऐवजी जातिवादाचे प्रक्षेपक वातावरण निर्माण केले जात आहे.क्षणिक फायद्यासाठी ते तरुण वर्ग समाज यांना खालील लोटत आहेत.आधीच कुणबी समाज हा आपले हक्क अधिकार आरक्षण याबाबतीत अत्यल्प साक्षर आहे.
 
समाजात या गोष्टींवर अजूनही प्रबोधन झालेले नाही,परंतु समाज प्रबोधनाच्या या गोष्टी बाजूला सारून तरुणाई चा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी केला जात आहे.मागील दोन-तीन महिन्यांमध्ये राज्यात आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न पेटला होता.मराठा कुणबी आरक्षणाच्या दरम्यानएक समाज बांधव म्हणून सामऱ्यांनी ब्र शब्दाची प्रतिक्रिया कुठेही दिलेली ऐकिवात नाही.आपला समाजावर एवढे मोठे गडांतर येत असताना हा समाजसेवक कुठे गेला होता आणि आता यांना समाज दिसतो. समाजातील तरुण वर्गाने यांच्या भुल थापांना बळी पडू नये.सांबरे करीत असलेल्या आणि हिशोब मांडीत असलेली जी काही समाजसेवा आहे त्या बदल्यात ते मतं मागत आहेत.या समाजसेवेचा जर खोलात तपास केला तर शासनाच्या अनेक योजना अनेक कंपन्यांचे सी.एस.आर.फंड च्या माध्यमातून ही सेवा बऱ्याच अंशी होत आहे,परंतु त्यांनी नेमलेले पगारी काम करणारी मुलं हे सर्व या गोष्टींचे भांडवल करून आम्ही किती मोठे समाजसेवक आहेत याचे बोगस चित्र उभे केले जात आहे.त्यांच्याच मतदार संघात त्यांना जनाधार म्हणून नाही.जातीच्या राजकारणाने कुणाचेच भले झाले नाही.तुम्ही जेव्हा समाजात समाजकार्य करता वावरता तेव्हा तुम्ही समाजातील सर्व जाती पंथ यांच्याशी बांधील असता आणि आता स्वतःसाठी जर तुम्ही स्वतःच्या जातीला आव्हान करीत असाल तर ते समाजासाठी देखील खूप मारक आहे.सांबरे व्यवसायाने ठेकेदार आहेत.ऑन रेकॉर्ड त्यांनी दाखवलेली संपत्ती ही डोळेे दीपावणारी आहे. त्यांनी घेतलेली अनेक कंत्राट ठाणे,पालघर जिल्ह्यात ही अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाचे आहेत.
 
जनतेच्या पैशाचा असा अपव्यय मीच समाजसेवेचा केवळ बुरखा अंगीकारलेला आहे.आपली ठेकेदार म्हणून असलेली जबाबदारी बद्दल ते काहीच बोलत नाहीत. अनेक तरुण गोरगरिबांचे लहान मोठे व्यवसायिक जे गाड्या चालवतात त्यांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.अनेकांचे अपघात होऊन आपले जीवही गमावले आहे.मग आपल्याच बांधवांना होणारा त्रास त्यांना का समजत नाही कुणाला तरी दिलेल्या दानाचे भांडवल करून सांबरे स्वतःच्या फायद्यासाठी समाजाचा वापर करीत आहेत,मुळात ज्या समाजाला संविधान एक अधिकार मिळावेत यासाठी त्यांनी काहीच केलेले नाही.त्यांच्या या भावनिक साधेचा परिणाम भविष्यात समाजाला भोगाव लागेल हाच आतापर्यंतचा इतिहास आहे..
 
 
Powered By Sangraha 9.0