वासिंद खातिवली उड्डाणपूल तथा भुयारी मार्गाची सरकारी प्रक्रिया पूर्ण...!

28 May 2024 18:07:30
 लोकमागणीचा यशस्वी पाठपुरावा..  तब्बल ४४ कोटी रुपयांचा भुयारी मार्ग ..
 
 
Jandut टीम
 वासिंद खातिवली शुभ वास्तू चौरस्त्यावर अपघातात शेकडो लोक मरण पावले तर कित्येकांना कायमचे अपंगत्व आले होते     लोकमागणीचा यशस्वी पाठपुरावा.. .अखेर वासिंद खातिवली उड्डाणपूल तथा भुयारी मार्गाची सरकारी प्रक्रिया पूर्ण...!
 
उड्डाणपूल तथा भुयारी मार्गाची सरकारी प्रक्रिया
 
काही महिन्यांपूर्वी होळी च्या दिवशीच वासिंद येथील गजानन काठोळे सह एकाचा भीषण अपघातामध्ये नाहक बळी गेला होता.अपघातानंतर परिसरातील गावांमध्ये प्रचंड प्रमाणात जनसंतापाची लाट उसळली होती.काही वर्षांपूर्वी या महामार्ग ठिकाणी बंटी बेलवले अपघातात मृत्यू पावला होता.यावेळी उसळलेल्या जनआंदोलनात अनेकांवर फौजदारी कारवाई करण्यात आली होती. स्व.गजानन काठोळे यांच्या दुर्दैवी अपघात मृत्यू नंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.तातडीने खातिवली वासिंद उड्डाणपूल तथा भुयारी मार्ग बांधकाम सुरू करण्यासाठी बेमुदत उपोषणाचा संजय सुरळके यांनी जाहीर करून उपोषण सुरू केले होते.यांच्या सोबत माजी ठाणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष स्वर्गिय विठ्ठलराव भेरे साहेब यांच्या सह वासिंद व खातिवली शुभ वास्तूचे शेकडो महिला युवक व ग्रामस्थांनी सहभाग घेऊन पाठिंबा दिला होता. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नाशिक अधिकारी यांनी गंभीर दखल घेत प्रत्यक्ष उपोषणाला भेट देऊन लेखी स्वरूपात भुयारी मार्ग बांधकाम सुरू करण्यात येणार असल्याचे पत्र दिले होते. तसेच प्रत्यक्ष या खातिवली वासिंद शुभ वास्तू महामार्गावरील दोन्ही बाजूला वेग कमी व नियंत्रित करण्यासाठी सुरक्षा उपाययोजना जलदगतीने केल्या. सुदैवाने या अपघातस्थळी आजमितीला एक ही अपघात घटना घडली नाही. त्यानंतर सातत्याने भुयारी मार्ग बांधकाम सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला गेला.नाशीक कार्यालयात अनेकदा बैठक व चर्चा झाली.
 
प्रशासकिय मंजुरी,निधी उपलब्धता, कंत्राटदार एजन्सीचा आरंभ कार्यादेश संदर्भात काल संध्याकाळी नाशिक कार्यालयात समाज सेवक संजय सुरळके, खातिवली ग्रामपंचायतीचे सरपंच मनोहर भोईर ,शिक्षक नेते एकनाथ तारमळे, कामगार नेते, समाजसेवक ,कौमरेड प्रशांत महाजन नाशिक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारीशी नियोजित बैठकीत सकारात्मक प्रतिसाद मिळाला.राष्ट्रीय महामार्ग अधिकारी दिलीप पाटील यांच्याशी चर्चा करताना पुढील मागणीसाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
 
१) भुयारी मार्ग कंत्राटदार एजन्सीने उड्डाणपूल बांधले जाण्यापूर्वी दोन्ही बाजूला सर्विस रोडला प्राधान्य देण्यात येऊन वासिंद शहराला प्रवेशाकरिता वाहनांसाठी मधूरम होटेल समोर उड्डाणपूललगतच जादा व अतिरिक्त रस्ता जोडून द्यावा. 
 
२) बंटी बेलवले यांच्या अपघाती मृत्यू नंतर झाले ल्या महामार्ग वरील स्थानिक जन आंदोलन मधील सहभागी सर्वाचे गुन्हे तातडीने मागे घ्यावे.
 
३) वेहळोली अपघाती स्थळावर प्रत्यक्ष पाहणी करून उड्डाणपूल तथा अन्य पर्यायांचा तातडीने उपाययोजना करणे.व अन्य सर्व चर्चांमध्ये राष्ट्रीय महामार्ग अधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. काही दिवसांनी राष्ट्रीय महामार्ग अधिकारी, कंत्राटदार एजन्सीचा प्रतिनिधी व समाज सेवक संजय सुरळके, खातिवली ग्रामपंचायतीचे सरपंच मनोहर भोईर, शिक्षक नेते एकनाथ तारमळे,कामगार नेते समाजसेवक कौमरेड तर प्रशांत महाजन यांचे सोबत खातिवली येथे प्रत्यक्ष भेट व पाहणी करण्यासाठी नियोजन केले आहे.
 
Powered By Sangraha 9.0