नाराज शिवसैनिक आणि भारतीय जनता पार्टीचे जुने कार्यकर्ते कपिल पाटील यांच्या विरोधात उभे राहणार..!!

07 May 2024 20:08:31
नाराज शिवसैनिक आणि भारतीय जनता पार्टीचे जुने कार्यकर्ते कपिल पाटील यांच्या विरोधात उभे राहणार...!!
 
सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती असताना शिवसैनिकांनी कपिल पाटील यांना प्रचंड विरोध केला होता, हे आपणाला माहित आहे. परंतु मातोश्रीचा आदेश घेऊन प्रकाश पाटील शिवसेनेच्या पुढाऱ्यांपर्यंत गेले आणि आपल्याला आदेश मानावाच लागेल असा निरोप दिला. युती धर्मपालन कपिल पाटील यांचा प्रचार आपल्याला करावा लागेल ही जाण शिवसैनिकांमध्ये निर्माण केली खरे तर त्यावेळीही शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी होती.

praksh patil
 
कोणत्याही परिस्थितीत कपिल पाटील यांना सहकार्य करायचे नाही अशी भूमिका जाहीरपणे शिवसेनेच्या मीटिंगमध्ये घेण्यात आली होती आणि त्या मीटिंगमध्ये कपिल पाटलांच्या विरोधात सर्वच पदाधिकारी एकमताने बोलत होते याचे प्रमुख कारण आहे ठाणे जिल्हा परिषदेत विविध पदांवर काम करत असताना कपिल पाटील यांनी शिवसैनिकांना प्रचंड त्रास दिला होता. त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल करण्यासंदर्भात जिल्हा परिषदेतील कामांमध्ये त्यांना बाजूला ठेवणे शिवसैनिकांची आर्थिक कोंडी करणे अशा विविध प्रकाराने शिवसैनिकांना त्रास देण्याची भूमिका कपिल पाटील यांनी घेतली होती. कपिल पाटील यांनी दिलेला त्रास शिवसैनिक कधीच विसरले नाहीत.
 
त्याच दृष्टिकोनातून 2014 पासून कपिल पाटील यांना विरोध सुरू आहे. मात्र मातोश्रीच्या आदेशामुळे 2014 आणि 2019 निवडणूक मध्ये शिवसैनिकांनी कपिल पाटील यांना निवडून आणण्यास सहकार्य केले खरे सांगायचे तर भिवंडी लोकसभा मतदारसंघात 2014 स*** भारतीय जनता पार्टी पेक्षा शिवसेनेची ताकद जास्त होती. परंतु जागावाटपत ती बीजेपीला गेल्यामुळे ना इलाज होता 2014 पासून भिवंडी लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेकडून लढवली जावी अशी शिवसैनिकांची अपेक्षा होती.

shinde
 
खरे तर शिवसेनेमध्ये ठाणे जिल्ह्यात प्रकाश पाटील यांच्या म्हणण्याला प्रचंड वाढवला आहे प्रकाश पाटील यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी अशी भूमिका भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भिवंडी शहापूर मुरबाड कल्याण सर्व तालुक्यांमधील पदाधिकाऱ्यांनी घेतली होती जर भिवंडी लोकसभा मतदारसंघात प्रकाश पाटील यांना उमेदवारी दिली जात नसेल तर ती कल्याण लोकसभा मतदारसंघात द्यावी अशी मागणी ही त्यावेळी काही शिवसैनिकांनी केली होती, परंतु ती मागणी एकनाथ शिंदे यांच्यामुळे शक्य होऊ शकली नाही आणि पुन्हा या मतदारसंघात कपिल पाटील यांचीच वर्णी लागली आता शिवसेना फुटी मुळे आणि राष्ट्रवादी तुटीमुळे भिवंडी लोकसभा मतदारसंघात युतीची ताकद आणखी वाढली असे म्हणणे युतीमधून व्यक्त केले जात आहे.
 
त्यामुळे यावेळी कपिल पाटील यांना सहज विजय साध्य करता येईल असे दाखवण्याचा प्रकार केला जात आहे. परंतु ती बाब पूर्णपणे असत्य आहे शिवसैनिकांमध्ये आजही कपिल पाटील यांच्या बद्दल प्रचंड नाराजी आहे. जी भूमिका कपिल पाटील 2014 पूर्वी घेत होते तीच भूमिका आजही कायम आहे.शिवसैनिकांना निवडणुकीपुरते वापरायचे आणि बाजूला फेकायचे याच उद्देशाने कपिल पाटील काम करत असताना दिसून येतात ते फक्त शिवसैनिकांनाच वापरून घेतात असे नाही तर भारतीय जनता पार्टीतील कार्यकर्ते पदाधिकारी यांनाही त्याच पद्धतीने वापरून घेतात आणि काम झाले की बाजूला करतात, असा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांचाही अनुभव आहे.
 

kalip patil
 
जेव्हा फायद्याचा विषय होतो तेव्हा कपिल पाटील कुणाचेच नसतात ही भावना सेना भाजप आणि राष्ट्रवादी अशा तिन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झालेले आहे. शिवसैनिक तर त्यांच्यावर प्रचंड नाराज आहेत. नुकताच शहापूर मधील शिवसेना जिल्हाप्रमुख मारुती धिरडे यांनीही जग जाहीरपणे कपिल पाटील यांना विरोध दर्शवला होता. खरे तर त्यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिकांच्या भावना बोलून दाखवल्या होत्या असे बोलले जाते परंतु त्यानंतर वरिष्ठ पातळीवरून त्यांना गप्प बसवण्यात आले.असे असले तरी शिवसैनिक प्रकाश पाटील यांचे काम करणे या निवडणुकीत अशक्य आहे मागील दोन वेळेला आपण काम केले परंतु तरी देखील आपल्याकडे पाहण्यासाठी कपिल पाटील यांना वेळ नाही, आपली कामे ते करत नाहीत, त्यामुळे यावेळी उघड नाही परंतु अजून कपिल पाटील यांना विरोध ठेवून या निवडणुकीत त्यांचा पराभव कसा होईल हे पाहण्याचा प्रयत्न शिवसैनिकांकडून केला जात आहे.
 
यामध्ये आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील कपिल पाटील यांच्यावर प्रचंड नाराज आहेत कोणताही कार्यकर्ता अथवा पदाधिकारी उघड बोलत नसला तरी कार्यकर्त्यांना मिळत असलेला दुजाभाव उघड होत आहे. भारतीय जनता पार्टीचे भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सर्व जुन्या कार्यकर्त्यांना बाजूला फेकण्यात कपिल पाटील यशस्वी झाले आहेत जुन्या कार्यकर्त्यांना बाजूला सारून आपल्या मर्जीतील नव्या कार्यकर्त्यांना पुढे पुढे करण्याचा त्यांच्याकडून जो प्रयत्न केला जात आहे त्याला जुन्या कार्यकर्त्यांचा प्रचंड प्रमाणात विरोध आहे असे जुने कार्यकर्ते यावेळी कपिल पाटील यांना धडा शिकवण्याची भाषा करू लागले आहेत.
 
आपले अस्तित्व टिकून ठेवायचे असेल तर कपिल पाटील यांना बाजूला सारणे आवश्यक आहे कपिल पाटील हे भारतीय जनता पार्टीच्या विचारांचे नेते नाहीत त्यांची विचारसरणी राष्ट्रवादी सारखीच आहे त्यामुळे भविष्यात भिवंडी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी टिकवायची असेल तर कपिल पाटील यांना बाजूला सारणे अत्यंत आवश्यक आहे या भावनेने भारतीय जनता पार्टीतील नाराज गटाचे कार्यकर्ते काम करत असलेले दिसून येते.
 
तिसरी महत्त्वाची गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेस भिवंडी लोकसभा मतदारसंघांमध्ये नगण्य अवस्थेत आहे. या पक्षाचे सद्यस्थितीत अस्तित्व दिसून येत नाही शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा हे जरी राष्ट्रवादी पक्षाचे असले तरी मुलात त्यांचेच अस्तित्व नगण्य झाले आहे. त्यांना कोणीही विचारेना असा झाला आहे ही परिस्थिती अत्यंत बिकट स्वरूपाची आहे. त्यामुळे युतीमधील कार्यकर्त्यांची एक मोठ्या प्रमाणातील गट कपिल पाटील यांच्यावर नाराज आहे. फक्त शिवसैनिक नाही तर भारतीय जनता पार्टी मधील कार्यकर्तेही नाराज असल्याने ते उघड पणाने कपिल पाटील यांना जरी विरोध करणार नसले तरी या निवडणुकीत त्यांच्या समर्थनार्थ काम करणार नाहीत ही बाब उघड झाली आहे त्याचा फटका मतदानावर नक्कीच होणार आहे आणि असे झाले तर कपिल पाटील यांच्या विजय रोखण्यात असे कार्यकर्ते यशस्वी होतील असे म्हणायला हरकत नाही.
 
@ फक्त शिवसैनिक नाही तर भारतीय जनता पार्टी मधील कार्यकर्तेही नाराज...?

@ दोनवेळा खासदार झालेले कपिल पाटील हे अजूनही भारतीय जनता पार्टीच्या विचारांचे नेते नाहीत...!!

@ शिवसैनिकांना निवडणुकीपुरते वापरायचे आणि बाजूला फेकायचे याच उद्देशाने कपिल पाटील काम करत असतात...

@ ठाणे जिल्हा परिषदेत विविध पदांवर काम करत असताना कपिल पाटील यांनी शिवसैनिकांना प्रचंड त्रास दिला...!!!!
Powered By Sangraha 9.0